प्राथमिक शिक्षण संचालनालयातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत दिनांक 9 मे 2024 रोजी निर्मित केलेल्या परिपत्रकानुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत दुर्गम भागातील शाळांची माहिती सादर करणे बाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना आढावा बैठक नवी दिल्ली येथील निर्देश दि. ३०.०४.२०२४.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येत्तो. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभाची दैनंदिन माहिती प्रत्येक शाळेने शिक्षण विभागाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. केंद्रशासनाने देखील मध्यान्ह भोजनाचा लाभ वितरीत केलेनंतर त्यासंबंधीची नोंद विहित वेळेत पोर्टलवर शाळेद्वारे होणे आवश्यक असल्याचे निर्देश दिलेले आहेत. तथापि अनेक शाळा दुर्गग भागात स्थित असल्यामुळे कोणत्याही प्रकारची दूरध्वनी संदर्भातील कनेक्टीव्हीटी नसल्यामुळे संबंधित शाळांना नियमितपणे योजनेचा लाभ दिलेल्या विद्यार्थ्यांची नोंद करणेकरीता अडचण येत असल्याचे अनेक जिल्ह्यांनी वेळोवेळी कळविले आहे.
केंद्र शासनाने दिनांक ३०.०४.२०२४ रोजी घेतलेल्या राज्यांच्या आढावा बैठकीतील निर्देशांच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यांकडून अशा दुर्गम शाळांची यादी घेऊन केंद्र शासनास सादर करणे वावत कळविले आहे. सबब आपणास निर्देश देण्यात येत आहेत की, सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यामध्ये इंग्रजीमध्ये शाळांची यादी दि. १५,०५, २०२४ पर्यंत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वाक्षरीने अशा शाळांची यादी संचालनालयास अचूकपणे सादर करण्यात यावी, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार यांचेमार्फत संबंधित शाळेच्या ठिकाणी कनेक्टीव्हीटी आहे किंवा नाही याची खातरजमा करण्यात येणार आहे. सबव सर्व माहिती अचूक आणि खात्रीपूर्वक विहित वेळेत सादर होईल याची दक्षता घ्यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई यांना २. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
परिशिष्टासह संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments