केंद्रपुरस्कृत उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन २०२२-२७ पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) दि. १७ मार्च २०२४
केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम (NBSK) सन २०२२-२७ अंतर्गत राज्यामध्ये दि.१७ मार्च २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षेचा निकाल दि. ०६/०५/२०२४ रोजी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या (NIOS) www.nios.ac.in or https://results.nios.ac.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला आहे. सदर परीक्षेच्या निकालाची सांख्यिकीय माहिती खालीलप्रमाणे आहे.
१) निकाल प्राप्त करणे
अ) वैयक्तिक निकाल प्राप्त करण्यासाठी Path
www.nios.ac.in or https://results.nios.ac.in ला भेट देणे Examination/Result Click here for Result Saksharta Karyakram Marksheet Cum Certificate Year, Month आणि Captcha टाकून Submit बटनावर click करावे ULLAS Nav Bharat Enrollment Number, Print
ब) जिल्हाचा एकत्रित निकाल प्राप्त करण्यासाठी Path
www.www.nios.ac.in or https://results.nios.ac.in ला भेट देणे Examination/Result Click here for Result ULLAS Nav Bharat Saksharta karyakram Marksheet cum Certificate Districtwise State, District, Year, Month, Captcha टाकून Submit बटनावर click करावे, हव्या असलेल्या जिल्हयाची यादी pdf स्वरुपात प्राप्त होईल. त्यामध्ये अनुक्रमांक, बैठक क्रमांक, नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, वय, निकालाची तारीख, भागनिहाय गुण, एकूण गुण आणि निकाल असे रकाने असतील.
किंवा
उल्लास अॅपवरील Home page वरील Certification या आयकॉनवर क्लिक करुन राज्य, जिल्हा, वर्ष, महिना, निवडून स्क्रीनवरील Captcha त्याखालील चौकटीत टाईप करुन Submit बटनावर click करावे.
२) निकाल प्राप्त करण्यासाठी अडचण येत असल्यास :
निकाल प्राप्त करुन घेण्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी, साक्षर कुटुंबिय, स्वयंसेवक अथवा शिक्षकांनी नवसाक्षरांना मदत करावी.
NIOS च्या संकेतस्थळावर ULLAS-Nav Bharat Sakshar Karykram 2024 असे नमूद असलेल्या Tab वर वैयक्तिक किंवा जिल्हानिहाय एकत्रित निकाल प्राप्त करावयाच्या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर उघडणा- या विंडोजमध्ये अचूक माहिती भरावी. Submit बटनावर Click केल्यास निकाल प्राप्त होईल. FLNAT परीक्षेवेळी केंद्र संचालकांनी १४ अंकी बैठक क्रमांक अचूकपणे परीक्षार्थ्यांना देणे आवश्यक आहे. त्यातील पहिले ११ अंक हे संबंधित परीक्षा केंद्र शाळेचा UDISE क्रमांक असून उर्वरित तीन अंक हे त्या केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या परीक्षार्थ्यास ००१, ००२, ००३,... असे दिलेले क्रमांक आहेत. बैठक क्रमांक देतेवेळी अथवा निकालाच्या Excel Sheet मध्ये माहिती भरतेवेळी चूक झाली असल्यास असे बैठक क्रमांक योजना संचालनालय स्तरावर दुरुस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे चुकलेले, दुबार झालेले बैठक क्रमांक दुरुस्त करुन निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
३) परीक्षेस उपस्थित असूनही निकाल प्राप्त होत नसल्यास निकालासाठी उपरोक्त दिलेली कार्यपद्धती अनुसरावी. जिल्ह्याच्या एकत्रित ऑनलाईन निकालपत्रकातही निकाल आढळून येत नसल्यास खात्री करून परीक्षा केंद्र संचालकांमार्फत परीक्षार्थ्यांनी पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. त्यासाठी स्वयंसेवक अथवा शिक्षकांनी मदत करावी.
१) परीक्षाध्योंने लेखी अर्ज केंद्र संचालकांकडे द्यावा. त्यात परीक्षार्थ्यांचे नाव, परीक्षा क्रमांक, परीक्षा दिनांक, परीक्षा केंद्राचे नाव अचूक असावे.
२) केंद्र संचालकांनी सदर अर्ज, परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थ्याच्या स्वाक्षरीपटाची छायाप्रत (अर्जदाराचे नाव, स्वाक्षरी नमूद असलेली), तपासलेल्या उत्तरपत्रिकेच्या प्रथम पृष्ठाची छायाप्रत, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यामार्फत मा. शिक्षण संचालक (योजना), १७, डॉ.
आंबेडकर रोड, पुणे १ या पत्त्यावर निकाल प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत पाठवावी. त्यासोबत गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या स्वाक्षरीचे पत्र असणे आवश्यक आहे. संचालनालय स्तरावरुन पडताळणी करुन निकाल प्रसिद्धीबाबत पुढील कार्यवाही ३० दिवसात करण्यात येईल.
४) गुणपत्रक / प्रमाणपत्राबाबत
केंद्रशासनाने संकेतस्थळावर ऑनलाईन गुणपत्रक/प्रमाणपत्र दि.०६/०५/२०२४ रोजी माहितीसाठी उपलब्ध करुन दिलेले आहे. सदरील वैयक्तिक गुणपत्रक/प्रमाणपत्राची संकेतस्थळावरुन ऑनलाईन print घेता येईल. मात्र गुणपत्रक/प्रमाणपत्राची प्रमाणित हार्ड कॉपी जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यामार्फत सर्व संबंधितांना विहित मार्गाने यथावकाश वितरीत करण्यात येईल. याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांना स्वतंत्र पत्राने कळविण्यात येत आहे.
५) सुधारणा आवश्यक (Need Improvement) शेरा प्राप्त असाक्षरांना संधी.
केंद्रशासनामार्फत असाक्षरांसाठीची FLNAT परीक्षा प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये माहे मार्च व सप्टेबर अशी दोन वेळा आयोजित केली जाते. सदर निकालानुसार सुधारणा आवश्यक (Need Improvement) शेरा प्राप्त असलेल्या असाक्षरांना सप्टेंबर २०२४ तसेच फेब्रुवारी/ मार्च २०२५ मध्ये पुन्हा FLNAT परीक्षेस बसता येईल. ६) FLNAT उत्तीर्ण नवसाक्षरांना पुढील संधी-
➤ केंद्रपुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम अंमलबजावणीबाबतचा शासन निर्णय दिनांक १४/१०/२०२२ नुसार खालीलप्रमाणे नवसाक्षरांना पुढील संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
१) नवसाक्षरांना पूर्वतयारी स्तर (इ. ३ री ते ५ वी), मध्य स्तर (इ. ६ वी ते ८ वी) व माध्यमिक स्तर (इ. ९ वी ते १२ वी) या स्तरावरील पुढील मूलभूत शिक्षण SIOS व NIOS यांच्या मार्फत उपलब्ध आहे. २) नवसाक्षरांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित होण्यासाठी व्यवसाय शिक्षण व कौशल्य विकास विभागामार्फत
संधी उपलब्ध आहेत. तसेच कला, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, क्रीडा, मनोरंजन तसेच स्थानिक स्वारस्य असलेले विषय यांचा समावेश असलेले निरंतर शिक्षणाची संधी उपलब्ध आहे. ३) नवसाक्षरांना त्यांच्या वयोगटानुसार इ ५ वी इ ८ वी च्या परीक्षेस SIOS व NIOS मार्फत बसण्याची संधी आहे.
> महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची भूमिका, विषय योजना व इतर तरतूदीबाबतचा शासन निर्णय दिनांक २१/१२/२०१८ नुसार नवसाक्षरांना इ ८ वी उत्तीर्ण झाल्यानंतर सदर मुक्त विद्यालय मंडळामार्फत आयोजित इ. १० वी च्या परीक्षेस प्रविष्ठ होता येईल. सदर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी हे राज्य मंडळाच्या इ. १० वी प्रमाणपत्र परीक्षांशी समकक्ष राहतील.
उत्तीर्ण परीक्षार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक,
शिक्षण संचालनालय (योजना) तथा
सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण,
महाराष्ट्र राज्य, पुणे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments