महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 24 मे 2024 रोजी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नती बाबत पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत.
केंद्रप्रमुख पदावरील पदोन्नतीबाबत.
संदर्भः शासन निर्णय समक्रमांक दि.२७.०९.२०२३
अर्जदार श्री. राजू पांडे यांचा दि. २२.०५.२०२४ चा अर्ज यासोबत पाठविण्यात येत आहे.
०२. केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरीता, जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षका (प्राथमिक) या पदावर किमान ६ वर्ष अखंडित सेवा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून सेवाज्येष्ठता च गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांची पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल, अशी संदर्भीय शासन निर्णय दि.२७.०९.२०२३ अन्वये तरतूद विहित करण्यात आलेली आहे. यास्तव केंद्रप्रमुख पदावर पदोन्नतीकरीता सेवाज्येष्ठता यादी तयार करताना सहायक शिक्षकाची प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर झालेला नियुक्ती दिनांक विचारात घेणे आवश्यक आहे. याअनुषंगाने कार्यवाही होत नसल्याबाबत अर्जदार यांनी शासनास कळविले आहे. तरी अर्जदार यांचे अर्जात नमूद केलेली बाब याची खातरजमा करण्यात येऊन, याबाबत शासन निर्णय दि.२७.०९.२०२३ मधील तरतूदीनुसार कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संबंधित जिल्हा परिषदांना देण्यात याव्यात
दत्तात्रय शिंदे
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments