फॉर्म-1 ते फॉर्म-4 आयटीआर भरण्यासाठी कोणासाठी कोणता फॉर्म? जाणून घ्या...
आयटीआर भरण्यासाठी कोणता फॉर्म वापरावा, तो कसा भरावा याची अनेकांना कल्पना नसते. परिणामी आयटीआर भरताना अनेकांचा गोंधळ उडतो.
सध्या आयटीआर भरण्यासाठी लोकांची लगबग चालू आहे. पण आपण नेमका कोणता आयटीआर फॉर्म (ITR Form) भरवा, हेच अनेकांना समजत नाही. आयटीआरचे एकूण चार फॉर्म आहेत. हे चार फॉर्म वेगवेगळ्या उत्पन्नगटासाठी असतात. याच पार्श्वभूमीवर आयटीआरचे हे चार फॉर्म कोणी भरावे, त्यासाठीची काय अटी असतात हे जाणून घेऊ या...
आयटीआर फॉर्म-1 कोण वापरतं?
आयटीआर फॉर्मच्या एकूण चार फॉर्मधील पहिला फॉर्म हा आयटीआर फॉर्म- 1 म्हणून ओळखला जातो. या फॉर्मला सिम्पल फॉर्मदेखील म्हटले जाते. नोकरी करणारे लोक आयटीआर भरण्यासाठी हा फॉर्म भरतात. हा सर्वांत जास्त फाईल केला जाणारा फॉर्म आहे. आयटीआर फॉर्म-1 हा पर्सनल टॅक्सपेअर्साठी आहे. ज्या लोकांच्या उत्पन्नाचा स्त्रोत हा पगार, पेन्शन, होम असेट्स आहे, ते लोक हा फॉर्म भरतात.
आयटीआर फॉर्म-1 भरण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात. 50 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी हा फॉर्म नाही. या फॉर्मअंतर्गत आयटीआर भरायचा असेल तर शेतीतून येणारे उत्पन्न हे पाच हजार रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे.
आयटीआर फॉर्म- 2 कोण भरतं
50 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणारे लोक आयटीआर फॉर्म-2 चा उपयोग करू शकतात. कंपनीचे संचालक असाल किंवा संबंधित आर्थिक वर्षात नॉन-लिस्टेड इक्विटी शेअरर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर आयटीआर फॉर्म-2 भरता येईल. ज्यांना एकापेक्षा अधिक घरं आहेत आणि या घरांच्या माध्यमातून ते पैसे कमवतात, विदेशातूनही जे पैसे कमवतात, विदेशात असलेल्या संपत्तीचे मालक आहेत ते आयटीआर फॉर्म-2 भरू शकतात. यामध्ये नोकरी, पेन्शन असणाऱ्या लोकांचाही समावेश आहे.
आयटीआर फॉर्म-3 कोण भरतं
जे उद्योजक आहेत, ते आयटीआर फॉर्म-3 भरतात. छोटा उद्योग असणारे उद्योजकही या फॉर्मच्या माध्यमातून आयटीआर भरतात. फ्रीलान्सर कलाकार, सहकलाकारदेखील आयटीआर फॉर्म-3 अंतर्गत आयटीआर भरतात.
आयटीआर फॉर्म-4 भरण्यासाठी अट काय
आयटीआर फॉर्म- 4 हा सुगम फॉर्म म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या व्यक्तीचा उद्योग 50 लाख रुपयांपेक्षा अधिक आणि 2 रुपयांपर्यंत आहे ते आयटीआर फॉर्म-4 भरतात.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments