SSC Result 2024 Maharashtra Update - दहावीचा निकाल कधी जाहीर होणार दिनांक निश्चित या तारखेला होणार निकाल जाहीर? निकाल पाहण्यासाठी अधिकृत लींक.

 पुण्याहून एका सुप्रसिद्ध वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमी नुसार दहावी निकालाबाबत महत्वपूर्ण माहिती मिळाली आहे.



निकाल पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक खालील लिंक वर क्लिक करून आपण आपला महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहू शकता.

https://hscresult.mahahsscboard.in/


दहावीचा निकाल पाहण्यासाठी लिंक.

https://sscresult.mahahsscboard.in/


दोन विषयात अनुत्तीर्ण झालेल्यांनाही अकरावी प्रवेश!!

■ इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत दोन विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या कला शाखेत प्रवेश घेता येतो. पण, जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेत किंवा मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षेत त्या विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण विषयात पास व्हावेच लागते. त्याशिवाय त्याला पुढे इयत्ता बारावीला प्रवेश घेता येत नाही.

 

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता इयत्ता दहावीच्या निकाल जाहीर करण्याची बोर्डाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यार्थ्यांना ग्रेस पासिंगसाठी दिलेल्या चित्रकला, क्रीडा, लोककलेच्या गुणांची पडताळणी बोर्डाकडून सुरू आहे. येत्या सोमवारी (ता. २७) दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार असल्याचे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचा २७ मे रोजी निकाल जाहीर होईल. असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे बोर्डाचे अधिकारी आता दिवसरात्र बसून निकाल जाहीर करण्याच्या तयारीत गुंतले आहेत. इयत्ता दहावीच्या जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली होती. 'बेस्ट ऑफ फाईव्ह'नुसार दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. १२ ते १५ जून दरम्यान राज्यातील बहुतेक अकृषिक विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. राज्य लवकर लगेचच आहे.


या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र बोडनि बारावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत काही दिवस अगोदरच जाहीर केला आहे. आता दहावीच्या विद्यार्थ्यांचाही निकाल जाहीर होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होण्याची संधी दीड महिन्यात मिळणार!






इयत्ता दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात तर बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात घोषित करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. ताज्या माहितीनुसार बारावीचा निकाल मंगळवारी (ता. २१)  जाहीर होणार आहे.


सोमवारी (ता. २०) बारावीचा निकाल जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, राज्य मंडळाकडून निकाल जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी पत्रक प्रसिद्ध केले जाते. रविवारी साप्ताहिक सुटीमुळे असे परिपत्रक काढणे अशक्य आहे. परिणामी, सोमवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता मावळली आहे. राज्य मंडळाच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल तयार करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. तसेच, अद्याप निकालाची अंतिम तारीख निश्चित झालेली नाही. परंतु, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यापूर्वी बारावीचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे स्पष्ट झाले आहे. पुढील दोन दिवसांत निकालाच्या टेस्टिंगचे काम पूर्ण होऊ शकते. त्यामुळे निकाल जाहीर होण्याची शक्यता नाकारता आहे. राज्य मंडळाकडून निकालाच्या घोषणेचे पत्रक केव्हा प्रसिद्ध केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


निकाल पाहण्यासाठी डायरेक्ट लिंक खालील लिंक वर क्लिक करून आपण आपला महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल पाहू शकता.

https://hscresult.mahahsscboard.in/


दहावीचा निकाल पाहण्यासाठी लिंक.

https://sscresult.mahahsscboard.in/



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

13 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.