दहावी-बारावीचा निकाल लोकसभेपूर्वीच!
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बारावीचा, तर चौथ्या आठवड्यात दहावीचा निकाल!
मे महिना सुरू होताच वेध लागतात ते राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालांचे. यंदा दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांचे निकाल मे महिन्यातच जाहीर करण्याच्या दृष्टीने राज्य मंडळातर्फे वेगाने हालचाली सुरू आहेत. बारावीचा निकाल तिसऱ्या आठवड्यात; तर दहावीचा निकाल चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्याची चिन्हे आहेत.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांसाठी राज्यातून एकूण ३१ लाख २३ हजारांहून अधिक विद्याथ्यर्थ्यांनी यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख १३ हजार ९०९; तर दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाख नऊ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. हे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक सध्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा मे अखेरपर्यंत दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा राज्य मंडळाचा मानस असून, त्यादृष्टीने गतीने पावले उचलली जात आहेत.
यंदा बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसन्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने राज्य मंडळातर्फे कामकाज सुरू आहे. यंदा दहावीचा निकालही मेमध्येच जाहीर करण्याचा राज्य मंडळाचा मानस आहे, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
शरद गोसावी, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
मंडळातर्फे बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान घेण्यात आली. दहावी-बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. आता निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
यंदा निकाल का लवकर जाहीर होतोय ?
प्रलंबित मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी मोठा बहिष्कार टाकला नाही. शिक्षकांकडून बारावीच्या परीक्षा प्रक्रियेप्रमाणेच दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांचे गुण ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्यात आले. उत्तरपत्रिका तपासणीचे काम मुदतीत पूर्ण होण्यासाठी समन्वय साधून वेळोनेळी बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे निकाल तयार करण्याला वेग आला.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासून पूर्ण झाल्या आहेत. हे काम लवकर होण्यासाठी शिक्षक आणि नियामकांनी सहकार्य केले. आता निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या, तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असं राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments