EDC Election Duty Certificate निवडणूक कार्य प्रमाणपत्र - असलेल्या मतदारांसाठी मतदान केंद्रावरील मतदानासाठी कार्यपद्धती..


EDC Election Duty Certificate निवडणूक कार्य प्रमाणपत्र  असलेल्या मतदारांसाठी मतदान केंद्रावरील मतदानासाठी कार्यपद्धती..


EDC- निवडणूक कार्य प्रमाणपत्र...


चुनाव का पर्व DESH KA GARV


Election duty Certificate म्हणजे निवडणूक कार्यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या कर्मचा-यास त्या मतदान केंद्रावर मतदानासाठी देणेत आलेले निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र. तसेच जे कर्मचारी निवडणूक कार्यासाठी नियुक्त आहेत परंतु त्यांचे कर्तव्य प्रत्यक्ष मतदान केंद्रावर नाही असे कर्मचारी उदा. सेक्टर ऑफीसर इ. या कर्मचा-यांना त्यांचे नाव असलेल्या मतदान केंद्रावर जाणे शक्य नसल्याने त्यांना नजिकच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी देण्यात आलेले प्रमाणपत्र म्हणजे निवडणूक कार्य प्रमाणपत्र.

* EDC असलेल्या मतदारांकडून मतदान कसे करून घ्यावे यासाठी मतदान केंद्राध्यक्षाने अवलंबावयाची कार्यपद्धती ....

1. संबंधित कर्मचारी यांचेकडे मुळ निवडणूक कार्य प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. मुळ निवडणूक कार्य प्रमाणपत्र असल्याशिवाय त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही याची स्पष्ट कल्पना संबंधित कर्मचारी यांना द्यावी.

2. मतदान केंद्राध्यक्षाकडे EDC घेऊन आलेले मतदाराकडे असलेले निवडणूक कार्य प्रमाणपत्र केंद्राध्यक्षाने तपासुन घ्यावे, त्यावर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची मुळ शाईची स्वाक्षरी आणि शिक्का आहे हे तपासावे.

3. तसेच संबंधित कर्मचारी यांचेकडे EDC बरोबरच मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ओळखीच्या 12 पुराव्यांपैकी एक पुरावा असणे बंधनकारक आहे.

4. वरीलप्रमाणे दिलेल्या सूचनांचे पालन होत असल्याची खात्री करून मतदान केंद्राध्यक्षाने अशा मतदारास मतदान यंत्रावर मतदानाची परवानगी द्यावी.

5. मतदानास परवानगी दिल्यावर मतदार यादी कार्य प्रतीमध्ये (Working Copy) शेवटच्या क्रमांकाच्या मतदारानंतर पुढील अनुक्रमांक देऊन या मतदाराची नोंद करावी. नोंद करतांना मतदाराचे पुर्ण नाव आणि EDC चा अनुक्रमांकासह नोंद करावी. 6. मतदार नोंदवही (Voter Register 17-A) मध्ये सदर नोंद घेऊन रकाना क्र. 2 मध्ये EDC चा अनुक्रमांक नमुद करावा. शेरा रकान्यामध्ये EDC Voter असे लिहावे व त्यानंतर मतदानासाठी परवानगी द्यावी.

7. याबाबत मतदान केंद्राध्यक्षांनी त्यांची दैनंदिनी आणि नोंदविलेल्या मतांचा हिशोब (नमुना 17C) मध्ये योग्य त्या ठिकाणी EDC मतदारांची संख्या नमुद करावी.

8. मतदान केंद्राध्यक्षांनी EDC मतदारांकडून प्राप्त केलेले EDC चे 12-B प्रमाणपत्र पिवळ्या रंगाच्या असंविधानिक (मोठे पिवळे पाकीट क्र. 4/1) पाकीटातील छोटे पिवळे पाकीट क्र. 4/4 मध्ये टाकून लिफाफा सिलबंद करावा.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.