E-Kuber Pranaali Update - ई-कुबेर प्रणालीबाबत ग्रामविकास विभागाचे महत्वपूर्ण अपडेट

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 7 मे 2024 रोजी  संचालक लेखा व कोषागारे मुंबई यांना इ कुबेर प्रणाली बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) वेतन देयकांचे प्रदान यापुढे ई-कुबेर प्रणालीव्दारे करावयाचे असल्याने पंचायतराज सेवार्थ टीमने सदर प्रणालीतील कर्मचा-यांची माहिती ई-कुबेर प्रणालीशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात केलेली आहे.


२. याबाबत पंचायतराज सेवार्थ टीमने ई-टेस्टींगसाठी फाईल आपणाकडे पाठविली असून यासोबत मॅपिंगसाठी व बीम्स इंटीग्रेशन मध्ये कोणते अपडेट करण्याची आवश्यकता आहे याची माहिती आपले स्तरावरुन देणे आवश्यक आहे.


३. पंचायतराज सेवार्थ प्रणाली ही ई-कुबेर प्रणालीशी संलग्न करण्यासाठी व वरील सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता होण्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने सदर बाबींची पुर्तता होईपर्यंत पंचायतराज सेवार्थ प्रणाली मार्फत होणारी जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांच्या (शिक्षक कर्मचारी वगळून) वेतन देयके ही प्रचलित पध्दतीनेच स्वीकारण्याच्या सूचना सर्व जिल्हा कोषागार अधिका-यांना आपले स्तरावरुन देण्यास आपणांस विनंती करण्यात येत आहे.


आपला,

 (रा.प्र. भोईर)

उप सचिव तथा सहसंचालक, महाराष्ट्र शासन



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

1 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.