कॅप' अंतर्गत प्रवेश प्रक्रियेचा कालावधी
■ 'कॅप' अंतर्गत नियमित पहिली फेरी राज्य मंडळाच्या दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होईल आणि ती १० ते १५ दिवस चालेल. त्यानंतर नियमित दुसरी फेरी आणि तिसरी फेरी प्रत्येकी सात ते आठ दिवस राबविण्यात येईल. त्यानंतर दोन विशेष फेऱ्या होतील. प्रत्येक प्रवेश फेरीसोबत कोट्यांअंतर्गत प्रवेश समांतर सुरू असतील. त्यानंतरही आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष फेऱ्या, दैनंदिन गुणवत्ता फेऱ्या होतील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी यंदा होणार नाही.
■ इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी संकेतस्थळ :
प्रवेश प्रक्रियेचा तपशील
कार्यवाहीचे टप्पे : कालावधी
■ ■ विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष ऑनलाइन नोंदणी करणे, अर्जाचा भाग एक भरणे, अर्ज प्रमाणित करून घेणे : २४ मेपासून सुरू (दहावीच्या निकालापर्यंत)
■ उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी : २२ मेपासून
■ 'कॅप' फेरीसाठी अर्जाचा भाग दोन भरणे, महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविणे : दहावीचा निकालानंतर सुरू
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी आणि अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारी (ता. २४) सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होईल. या दिवसापासून अर्ज प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. यंदा तीन नियमित फेऱ्या आणि दोन विशेष फेऱ्या होतील, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे देण्यात आली.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५मध्ये राज्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवडसह मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमधील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमार्फत होतील. त्यानुसार 'मॉक डेमो' नोंदणी अंतर्गत बुधवारी (ता. २२) आणि गुरुवारी (ता. २३) डमी अर्ज भरण्याचा सराव विद्यार्थी-पालक करू शकतील. शुक्रवारपासून प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होईल. पहिली विशेष फेरी झाल्यानंतर महाविद्यालयांना अकरावीचे वर्ग सुरू करता येतील, अशी माहिती अकरावीच्या केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्य सचिव आणि प्रभारी विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. ज्योती परिहार यांनी दिली.
'मॉक डेमो' नोंदणीद्वारे पोर्टलवर डमी लॉगिन सुविधा असेल. शुक्रवारपासून (ता. २४) पोर्टलवर प्रत्यक्ष अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध असेल.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments