महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 3 मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
लोकसभा निवडणूक-२०२४ च्या निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या करण्यास अनुमती देण्याची विनंती भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांना करण्यात आली होती. त्यास अनुसरुन भारत निवडणूक आयोगाने संदर्भाधीन दि.०१.०५.२०२४ च्या पत्रान्वये निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या करण्यास निवडणूक आयोगाची काही अर्टीसह हरकत नसल्याचे कळविले आहे. सदर पत्राची प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी यासोबत पाठविण्यात येत आहे.
आपली,
(लिना संखे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
निवडणूक आयोगाच्या परिपत्रकासह वरील शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments