धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी निगमित केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या बदली प्रक्रिया राबविण्याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शासन निर्णय दि.21/06/2023 नुसार जिल्हाअंतर्गत बदलसाठी जे शिक्षक पूर्वी पासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देणे बाबत नमुद केले आहे.
त्यानुसार जे प्राथमिक शिक्षक बदलीसाठी इच्छुक आहेत त्यांची नावे गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत विनंती बदलीच्या नियमानुसार दिनांक 30/04/2024 पर्यंत Excel Sheet मध्ये व एक प्रत उलट टपाली सादर करावी.
तसेच यापुर्वी ज्या प्राथमिक शिक्षकांनी परस्पर या कार्यालयात विनंती बदलीसाठी अर्ज केले आहेत ते विचारात घेण्यात येणार नसल्या बाबत कळविण्यात यावे.
शिक्षणाधिकारी (प्राथ)
जिल्हा परिषद धुळे
प्रतः- 1) मा. सभापती शिक्षण व आरोग्य समिती, जिल्हा परिषद, धुळे यांना माहितीसाठी सविनय सादर.
2) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांना माहितीसाठी सविनय सादर.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments