राज्यात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी)
अंमलबजावणीस येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरवात होताना दिसेल. पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकवायला हवे याचा अभ्यासक्रम तयार झाला आहे. त्यानुसार बालवाड्या आणि अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळतील. त्याची छपाई बालभारतीमध्ये सुरू आहे,' अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शनिवारी दैनिक सकाळ च्या व्यासपीठावरून दिली.
'सकाळ' आयोजित 'सकाळ विद्या स्कूल एक्स्पो २०२४'चे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, 'राज्यात आजवर तीन ते सहा वर्ष वयोगटातील पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी ठोस आराखडा नव्हता. आता तयार झालेल्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होईल.'
'एनईपी'च्या अंमलबजावणीबाबत ते म्हणाले, "एप्रिल २०२४ आले तरीही या पातळीवर प्रत्यक्ष दिसण्यासारखे काय झाले किंवा त्यादृष्टीने बदल कधी होणार असे प्रश्न अनेकजण सतत विचारतात. हे धोरण टप्प्या-टप्याने पुढे जाणार आहे. २०३० पर्यंत या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. याची सुरवात पूर्वप्राथमिक स्तरावरून होईल. लवकरच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल.
तीन ते आठ वर्षे वयोगटातील मुलांची आकलनशक्ती, बौद्धिक क्षमता विलक्षण असते. त्यामुळे या वयातील मुलांच्या क्षमतांना अधिक वाव मिळावा असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे."
शिक्षणातील विद्यार्थ्यांचा 'लर्निंग आउटकम' या पुढील काळात नोंदविला जाणार आहे. शैक्षणिक 'क्रेडिट' बरोबरच कला, क्रीडा, कार्यानुभव याअंतर्गत मिळालेल्या 'क्रेडिट'ला महत्त्व असेल, असेही गोसावी यांनी आवर्जून नमूद केले.
सकाळ'ने आयोजित केलेला शैक्षणिक उपक्रम चांगला आहे. हा उपक्रम नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत घेतल्यास अधिकाधिक पालकांना पाल्यांसाठी योग्य शाळा निवडण्याच्या प्रक्रियेत मदत होईल. अशा उपक्रमाबद्दल 'सकाळ'चे अभिनंदन. अशा पद्धतीने समाज एकत्र आला तर देशात शैक्षणिक क्रांती घडेल.
- शरद गोसावी, राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक.
शिक्षण विभागाची आगामी पावले
■ प्राथमिक शिक्षणात मातृभाषेवर भर राहणार
■ ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीत प्रवेश मिळणार
■ पुढील वर्षापासून ३१ मार्चपर्यंत सहा वर्षे पूर्ण होतील अशा विद्यार्थ्यांना पहिलीत प्रवेश
■ शाळा प्रवेशात विद्यार्थ्यांच्या वयाबाबत १० ते १५ दिवसांचा फरक असल्यास निर्णय घेण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना असणार.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments