राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शैर्भाणक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्या दोघांच्या स्वाक्षरी निर्गमित झालेल्या परिपत्रकानुसार 2024 मधील उन्हाळी सुट्यांबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
संदर्भ: शासन परिपत्रक क्रःसंकिर्ण-2023/प्र.क्र.105/एस.डी.4, दि. 20/04/2023,
उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्रार्थामक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.
1. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार, दि.02 में, 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
2. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शेक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
3. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दि.15 जून, 2024 रोजी सुरु करण्यात याव्यात.
4. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा 30 जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दि.01 जुलै, 2024 पासून सुरु करण्यात याव्यात.
वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक
(प्राथमिक शिक्षण संचालनालय)
म.रा., पुणे.
( संपत सुर्यवंशी)
शिक्षण संचालक
(माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय) म.रा., पुणे.
1. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव सविनय सादर. 2. मा. आयुक्त, शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कायर्यालय, मध्यवर्ती इमारत, पुणे-01 यांना माहितीस्तव सविनय सादर
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments