दिनांक २६/०४/२०२४
शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक
शिक्षक भरती २०१७ साठी सन २०१९ मध्ये जाहिरात दिलेल्या पैकी ज्या जिल्हा परिषदेच्या ५०% रिक्त पद भरतीची कार्यवाही झाली आहे त्या पदभरतीच्या वेळी राखून ठेवण्यात आलेल्या ५० % जागाबाबत शासनाकडे पुढील प्रक्रिया करण्यास आवश्यक प्रस्ताव व माहिती सादर करण्यात आली आहे. यावर शासन स्तरावरून निर्णय झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल.
अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल असे काल्पनिक मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. भरती प्रक्रिया न्याय्य व कोणत्याही खोडसाळपणाला थारा न देता पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे संभ्रम अथवा निराशा पसरवणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहावे.
ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.
दिनांक २५/०४/२०२४
शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक
दिनांक २५/०२/२०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभियोग्यताधारकांना यथाशीघ्र नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भात मा. केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास दिलेली परवानगी विचारात घेता, मा प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांचेकडून निर्देश दिले जात आहेत. पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व तत्समपदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. सन २०१७ भरती मधील दिनांक २९/११/२०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थागनादेश उठवणेच्या दृष्टीने सिविल एप्लीकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.
उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती, निर्णय प्रक्रिया अथवा नियम याची जुजबी माहिती सुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे पासून सावध राहावे.
ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments