संकलित चाचणी -२ (PAT-३) तसेच इयत्ता ५ वी, ८ वी व ९ वी वार्षिक परीक्षेसाठी अंमलबजावणी करणेकरिता सूचना कळविणे बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद देणे दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केले आहे.
तथापि, संकलित मूल्यमापन चाचणी २ PAT ३ (५ वी, ८ वी व ९ वी इयत्तांच्या वार्षिक परीक्षा) साठीच्या सविस्तर सूचना प्रस्तुत कार्यालयाकडून देण्यात येत आहेत.
* संकलित मूल्यमापन चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना :
१. शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र / दुपार सत्र नुसार उपरोक्तप्रमाणे आपल्या स्तरावरून वेळेचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात येत आहे. तथापि दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणेद चाचणी घेण्यात यावी, यात कोणताही बदल करण्यात येवू नये. तसेच प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांची तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/स्वाध्याय ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी, विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.
२. इयत्ता ३ री ते ९ वी करिता भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी-१ लेखी, तोंडी, स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्याबाबत शाळास्तरावरून नियोजन करण्याबाबत कळविण्यात यावे, कोणत्याही शाळेत भाषा, गणित व इंग्रजी (तृतीय भाषा) या विषयांची दुबार संकलित चाचणी-२ (PAT ३) होणार नाही याची दक्षता घ्यावी.
३. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित (१०० टक्के अनुदानित) शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी २ (PAT ३) चे आयोजन करण्यात येणार आहे.
४. संकलित मूल्यमापन चाचणी -२ (PAT ३) करिता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात आल्या आहेत.
५. तालुकास्तरावर पोहचविण्यात आलेल्या सर्व चाचणी पत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त चावणी पत्रिका ठेवाव्यात, तसेच चाचणी पत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने मिजणार नाहीत व सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी.
* चाचणी पत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे.
ई. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी व तालुका समन्वयकांनी यांनी इयत्ता ३ री ते ९ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा होताना स्वतः उपस्थित राहून आवश्यक पुरवठा झाला असल्याची खातरजमा करूनच विषय, माध्यम व इयत्तानिहाय गड्ढे मोजूनच गड्ढे /प्रती कमी किंवा जास्त असतील तर तसे पोहोच पावतीवर स्पष्टपणे नमूद करून पोहोच द्यावी.
उ. तालुका समन्वयकांनी सदर चाचणी पत्रिका समक्ष मोजूनच आवश्यक तेवढ्या मुख्याध्यापकांच्या ताब्यात द्यावयाच्या आहेत. तसेच झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही चाचणी पत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
ऊ. शाळा स्तरावरील चाचणी पत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्यावी.
८ चाचणी पत्रिकाचा मोबाईल मधून फोटो काढणे, समाजमाध्यमाद्वारे इतरांना पाठविणे असे गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. प्रश्नपत्रिकांची गोपनियता काटेकोरपणे पाळण्यात यावी. गोपनीयता भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
९ तालुका स्तरावर चाचणी पत्रिका ताब्यात घेणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे व त्याचे शाळानिहाय वाटप करणे तसेच चाचणीचे कामकाज सुरळीतपणे होण्याची सर्वस्वी जबाबदारी तालुका समन्वयकाबरोबरच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची राहील.
१० जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक) जिल्हा परिषद (सर्व) यांची संकलित चाचणी २ (PAT ३) आयोजनाबाबत सर्वस्वी जबाबदारी असेल.
११ शिक्षणाधिकारी यांचेकडून प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे चाचणी पत्रिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे चाचणी पत्रिका कमी पडल्यास अथया XEROX काढण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचे देयक कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाही त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) शिक्षण निरीक्षक / प्रशासन अधिकारी (मनपा/नपा) यांची असेल याची नोंद घ्यावी, तसेच सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील याची जबाबदारी शिक्षणाधिकारी/प्राचार्य DIET यांची वैयक्तिकरित्या राहील.
१२ संकलित चाचणी-२ (PAT ३) कालावधीत सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. एखादा विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी त्याची परीक्षा घेण्यात यावी.
१३ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांच्या दिव्यांग प्रकारावरून शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा, आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किया विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी
१४ प्रस्तुत संकलित चाचणी २ (PAT ३) बाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac in या देवसाईटवर परीक्षेपूर्वी उपलब्ध असेल. उत्तरसूची परीक्षेदिवशी संध्याकाळी वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यानुसार उत्तरपत्रिका तपासण्यात याव्यात.
१५ शिक्षक सूचना व उत्तरसूची ही फक्त शिक्षकासाठी आहे, ती विद्यार्थ्यांना देऊ नये, विद्यार्थ्यांना फक्त चावणी पत्रिका देण्यात याव्यात.
१६ संकलित चाचणी २ (PAT ३) ची गुण नोंद प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर दिलेल्या अध्ययन निष्पत्तीनिहाय रकान्यात भरावी.
१७ संकलित चाचणी -२ मधील गुणांच्या आधारे शिक्षकांनी विद्यार्थीनिहाय कृतिकार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करावी.
• चाचणी कालावधीत करावयाच्या शाळा भेटीबाबत -
१. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या शाळानिहाय भेटीचे दिनांकासहित नियोजन प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिका यांनी एकत्रितरित्या बैठक घेऊन करावे.
२. जिल्हास्तरावरून केलेले नियोजन संबधित तालुक्यांना कळवावे. प्रत्येक तालुक्यांनी जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना दिलेल्या भेटीच्या शाळा वगळून उर्वरित शाळांसाठी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक, विषय साधन व्यक्ती व विशेष तज्ज्ञ यांच्या शाळा भेटीचे नियोजन करावे.
३. संकलित चाचणी-२ कालावधीत राज्यातील १०० टक्के शाळाभेटी होतील यासाठी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, व शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिकाव पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी.
४. तपासणी केलेल्या १०% उत्तरपत्रिकांची RANDAMLY तपासणी करण्याचे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी करावे.
उपरोक्त नियोजनानुसार दिलेल्या वेळेत सर्व नमूद इयत्तांची चाचणी होईल याप्रमाणे नियोजन करण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. तथापि, अपवादात्मक किंवा स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काही बदल करायचे असल्यास संबधित शिक्षणाधिकारी यांनी या कार्यालयाची परवानगी घेवूनच वेळापत्रकात बदल करावे.
वरीलप्रमाणे आपल्या अधिनस्त संबंधित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचेपर्यंत संकलित चाचणी -२ च्या अनुषंगाने योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचना द्याव्यात.
संकलित चाचणी -२ चे गुण हे विद्या समीक्षा केंद्र (VSK) येथे नोंदवण्यात येणार आहे. त्याकरिता संबंधित शाळेच्या शिक्षकांनी चाचणी तपासून त्याचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचे मार्फत उपलब्ध पोर्टलवर विहित कालावधीत भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी.
04/04/25 (राहूल रेखावार भ्रा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
परिपत्रक पीडीएफ डाउनलोड
इयत्ता पाचवी आठवी व नववीच्या वार्षिक परीक्षेबाबत महत्वपूर्ण सूचना.
इयत्ता १ ली व २ री साठी सर्व विषयांच्या व इ. ३ री ते ९ वी अन्य विषयांच्या संकलित चाचणी २ / लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीनुसार मूल्यमापन करावे.
इयत्ता ९ वी साठी PAT शिवाय अन्य विषयांसाठी वेळापत्रक यासोबत देण्यात आलेले नाही ते शाळास्तरावरून ठरविण्यात यावे.
वेळापत्रकात नमूद न केलेल्या (कलाशिक्षण, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, इत्यादी) श्रेणी विषयांच्या मूल्यमापनाचे नियोजन शाळास्तरावर करण्यात यावे.
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित शाळांना PAT अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकांचा वापर करूनच त्या विषयाची संकलित चाचणी २ घ्यावयाची आहे. इतर विषयांसाठी शाळास्तरावर प्रश्नपत्रिका तयार करून संकलित चाचणी २ घेण्यात यावी.
तथापि, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गांसाठी वार्षिक परीक्षा शासन निर्णय दि. ०७/१२/२०२३ मधील तरतूदीनुसार स्वतंत्रपणे शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका स्वतः तयार करून घ्यावयाची आहे. PAT-३ अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाही.
टीप-इ. ५ वी व इ. ८ वी मधील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी दोन प्रश्नपत्रिका सोडावाव्या लागतील. त्यानुसार नियोजन करावे. इयत्ता पाचवी व आठवी वगळता अन्य इयत्तांकरिता कोणत्याही विषयांची दुबार परीक्षा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
संपूर्ण मार्गदर्शक पीपीटी पीडीएफ डाउनलोड.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे कार्यालयातून निर्गमित दिनांक 31 मार्च 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार दिनांक 30 मार्च 2024 रोजी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये संकलित मूल्यमापन चाचणी 2 बाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
नियतकालिक मूल्यमापन चाचणी २ अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी चे आयोजन दिनांक ०४ ते ०६ एप्रिल २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित शाळांमध्येएकूण दहा माध्यमांसाठी इयत्ता तिसरी ते आठवी करीता प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा पुरवठा राज्यस्तरावरून करण्यात येत आहे.
संदर्भ क्र.५ नुसार संकलित मूल्यमापन २ चे आयोजन वेळापत्रकाप्रमाने करण्यात यावे. संदर्भ क्र.२,३ व ४ नुसार प्रस्तुत कार्यालयामार्फत मागविलेल्या नमुन्यात जिल्ह्यांकडून प्राप्त सांख्यिकीय माहितीनुसार प्रश्नपत्रिका छपाई व वितरण करण्यात आले आहे.
याअनुषंगाने जिल्ह्यांकडून नियतकालिक मुल्यांकन चाचणी PAT ३) अंतर्गत संकलित मूल्यमापन - २ करीता प्राप्त तसेच कमी अथवा जास्त प्रश्नपत्रिका मिळाल्याबाबत मागणी संदर्भात दि. ३०.०३.२०२४ रोजी VC द्वारे सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था याची बैठक आयोजित करण्यात आली होती. मा. संचालक यांनी सदर बैठकीत खालीलप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.
जिल्ह्यांनी सोबत दिलेल्या EXCEL sheet मध्ये दिलेल्या नमुन्यात इयत्ता, विषय व माध्यम निहाय कमी अथवा जास्त झालेल्या प्रश्नपत्रिकांची संख्या नमूद करून SOFT कॉफी व हार्ड कॉफी साक्षांकित करून evaluationdept@maa.ac.in या मेल वर दिनांक ०१.०४.२०२४ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवण्यात यावी. या नंतर प्राप्त संख्यांचा विचार केला जाणार नाही. तसेच कमी पडलेल्या प्रश्नपत्रिका आपल्या स्तरावरून गोपनीयता बाळगून झेरॉक्स करून शाळाना पुरविण्यात याव्यात. अनावश्यक झेरॉक्स काढल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शासकीय कार्यपद्धतीनुसार कमीत कमी दराने झेरॉक्स करून त्याचे देयक शिक्षणाधिकारी यांनी एकत्रित सादर करावे.
काही ठिकाणी जास्त प्रश्नपत्रिका प्राप्त झाल्या असतील तर आपले स्तरावरून जेथे कमी असतील तेथे पोचवाव्यात.
संकलित मूल्यमापन २ साठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका या फक्त शासकीय शाळा, खाजगी अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या शाळांसाठीच पुरविण्यात आलेल्या आहेत. सदर प्रश्नपत्रिका विनाअनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळांसाठी पुरविण्यात आलेल्या नाहीत.
PAT ३ अंतर्गत या कार्यालयाकडील दि.२८/१२/२०२३ च्या पत्राप्रमाणे जिल्ह्यांकडून करण्यात आलेल्या मागणी पेक्षा प्रश्नपत्रिका कमी प्राप्त झाल्या असतील तरच झेरॉक्स देयक मान्य केले जाईल.
तसेच सदर झेरॉक्स देयक दिनांक १५.०४.२०२४ पर्यंत सदर कार्यालयास प्रत्यक्ष सादर करावेत.
गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
तरी उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करून आवश्यक माहिती दिलेल्या नमुन्यात सादर करावी व सदर संकलित चाचणी नियोजित दिनांकास होईल याची दक्षता घ्यावी. निवडणुकीबाबत काही ठिकाणी प्रशिक्षण असण्याची शक्यता आहे. तेथे फक्त वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय परीस्थितीनुरूप स्वानिक प्रशासनाने घ्यावा.
सोबतः नियतकालिक मुल्यांकन चाचणी (PAT ३) अंतर्गत संकलित मूल्यमापन - २ करीता प्राप्त तसेच कमी अथवा जास्त प्रश्नपत्रिका मिळाल्याबाबत मागणीची EXCEL sheet.
(शरद गोसावी)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र पुणे.
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments