अखेर तारीख ठरली, आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया..
अखेर आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तारीख ठरली असून, १६ ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
वंचित व दुर्बल घटकांतील मुला-मुलींसाठी शिक्षण हक्क कायदा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम २००९ अन्वये कलम १२ (एफ) (सी) नुसार व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद शासनाने केली आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यातील आरटीई पात्र शाळांना नोंदणी बंधनकारक होती. त्यानुसार आरटीई पात्र शाळांनी नोंदणी केली आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याबाबतचे पत्र सोमवारीच जारी केले असून, त्यानुसार १६ एप्रिलपासून आरटीईअंतर्गत शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे..
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीताची प्रक्रिया सुरु करणेबाबत.
दरवर्षी प्रमाणे सुधारित अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ नुसार सन २०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियअंतर्गत दिनांक १६/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. तरी याबाबत व्यापकस्तरावर मोफत प्रसिद्धी देण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे- १.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments