यावर्षी उन्हाळी सुट्टीतही शालेय पोषण आहार सुरू राहणार? प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत शिक्षण संचालकांचे परिपत्रक

 दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना स्वतंत्र कक्ष प्राथमिक शिक्षण संचालनालयातून निर्गमित परिपत्रकानुसार राज्यात जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.


राज्यातील तालुक्यांमध्ये माहे जून ते सप्टेंबर कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांमध्ये संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या भागाकरीता शासनाने विविध सवलती लागू केलेल्या आहेत.


संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १० मध्ये नमूद केल्यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यामधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना (पीएम-पोषण योजना) दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्यात यावी. उक्त शासन निर्णयान्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर-

मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.


प्रति,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नंदुरबार, धुळे, जळगांव, बुलढाणा, जालना, छ. संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली.




दुष्काळग्रस्त व सदृश्य तालुक्यांची यादी पुढीलप्रमाणे.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.