PM Poshan Annual/Monthly Deta Entry Updates - माननीय शिक्षण संचालकांच्या प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कामकाजाबाबत व्हीसी द्वारे सूचना व परिपत्रक

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालयातून निर्गमित दिनांक 23 एप्रिल 2024 च्या परिपत्रकानुसार शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खालील दोन विविध पोर्टलवर शाळा, तालुक्यांना माहिती भरणे आवश्यक आहे.


9. pmposhan-mis.education.gov.in


२. education.maharashtra.gov.in


उक्त नमूद दोन पोर्टलवर शाळा व तालुक्यांनी खालील माहिती भरणे अनिवार्य आहे.


अ. Annual Data Entry

आ. Monthly Data Entry

इ. MDM daily attendance


सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता योजनेस पात्र प्रत्येक शाळेची एम.आय.एस पोर्टलवर Annual Data Entry बाबत माहितीचा नमुना शाळांकडून अचूकपणे भरून घेऊन दि. ३०.०४.२०२४ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करावयाचा आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक महिन्याच्या अखेरीस पोर्टलवर भरावयाचा मंथली एमआयएस डाटा संबंधित महिन्याच्या पुढील महिन्यातील दि. ०५ पर्यंत अद्यावत करावयाचा आहे. माहे एप्रिल, २०२४ करीताचा मंथली एमआयएस डाटा दि. ०५.०५.२०२४ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करण्यात यावा, तद्नंतर सदरची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार नाही, याबाबत केंद्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत.


सबब सर्व शिक्षणाधिकारी व लेखाधिकारी पीएमपोषण यांना निर्देशित करण्यात येते की, आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची Annual Data Entry व monthly mis data entry त्वरीत पूर्ण करुन घ्यावी व विहित दिनांकाच्या आत सर्व ऑनलाईन कामकाज पूर्ण होईल याकरीता आवश्यक ते निर्देश सर्व तालुक्यांना निर्गमित करणेत यावेत तसेच प्रस्तुत बाबत उचित सनियंत्रण करुन विहित कालमर्यादेत सर्व कामकाज पूर्ण करुन घ्यावे.




मा. संचालक कार्यालय यांची दिनांक 12/04/2024 ची व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे दिलेल्या सूचनानुसारप्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कामकाजाबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.


प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत खालील प्रमाणे २९/०४/२०२४ पर्यंत शाळांकडून माहिती घेवुन कामकाज पुर्ण करण्यात यावे.


1) सन 2015-16 ते सन 2019-20 मधील लेखापरिक्षण मुदृयांची पूर्तता शाळांकडून करून घेण्यात यावी. 2) Trgmdm पोर्टलवरील शाळांचा Annual Data entry form शाळांकडून भरुन घेऊन माहीती अद्यावत करण्यात यावी.


3) ज्या शाळांनी माहे मार्च 2024 मध्ये विद्यार्थ्यांना केळी/इतर फळे यांचा लाभ दिला असल्यास 1/- फरक देण्यात येवु नये. तसेच ज्या शाळांनी माहे मार्च 2024 मध्ये अंडयांचा लाभ दिला आहे अशा लाभार्थ्यांची संख्या शाळांकडून अहवाल घेवुन निश्चित करणे.


4) माहे एप्रिल 2024 मध्ये Sarl Portal व Trgmdm मधील शाळा संख्या जुळविण्यात यावी. 5) नविन स्वयंपाकी तथा मदतनीस संख्या यांचे बँक खाते क्रमांक PFMS मध्ये मॅपिंग करण्यात यावी.


6) माहे जुन व जुलै 2024 ची धान्य मागणी 26/04/2024 अखेर सादर करण्यात यावी.


शिक्षणाधिकारी (प्राथ.) 

जिल्हा परिषद रत्नागिरी




Annual Data entry form PDF Download

Download


Monthly Data entry form PDF Download

Download


School Level Health Data From PDF download

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.