आता विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच पदव्युत्तर पदवी घेण्याची गरज नाही चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या व त्यामध्ये 75 टक्के मिळाल्यास मिळवा पीएचडीला थेट प्रवेश!
चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम (Four year undergraduate course)जे विद्यार्थी करत आहेत किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ते विद्यार्थी थेट पीएचडीला प्रवेश (Direct entry to Ph.D)घेऊ शकणार आहे. शिवाय यूजीसी नेटसाठीही अर्ज करू शकणार आहे. यासाठी त्यांना आता पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्याची गरज भासणार नाही,असे माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम . जगदीश कुमार (Chairman of University Grants Commission M. Jagdish Kumar)यांनी दिली.
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC ) ने त्यात एक अट ठेवली आहे. पीएचडीच्या प्रवेशासाठी उच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना आता चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमात किमान ७५ टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी मिळवावी लागेल. ही प्रणाली या वर्षीपासून लागू केली जाईल, अशी माहिती UGC अध्यक्ष प्रोफेसर एम जगदीश कुमार यांनी आपल्या X अकौंटवरून दिली आहे
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी UGC ही महत्त्वाची पावले उचलली आहेत. SC, ST, OBC (नॉन-क्रिमी लेयर), अपंग आणि EWS विद्यार्थ्यांना देखील पीएचडी प्रवेशामध्ये पाच टक्के किंवा त्याच्या समतुल्य श्रेणीची सूट मिळेल. यामुळे चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी आता थेट UGC NET साठी अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये, चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतील.
दरम्यान, चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाने आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. UGC NET साठी, त्यांना विषयाच्या आवश्यकतेतून सूट देण्यात आली आहे. म्हणजेच आता तो कोणताही विषय निवडू शकणार आहे. यापुढे त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले विषय निवडणे बंधनकारक असणार नाही. मात्र, पीएचडी साठी अर्ज करतानाच त्यांना त्यासाठीचे विषय ठरवावे लागणार आहेत.
यूजीसी अध्यक्षांच्या अधिकृत ट्विटर हँडल वर जाण्यासाठी.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments