शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून इयत्ता पहिली दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार का? की २०२५-२६ पासून? बालभारतीचे अधिकृत पत्र.

 दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती मधून निर्गमित परिपत्रकानुसार पाठ्यपुस्तकांच्या रचनेतील बदलाची माहिती अधिकृत पुस्तक विक्रेते शैक्षणिक संस्था व इतर संबंधितांना कळविण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे. 

सदर परिपत्रकानुसार राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यानुसार इयत्ता पहिली व दुसरीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल हा शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून होणार नसून शैक्षणिक सत्र 2025 26 पासून होणार आहे. 


शासन निर्णयान्वये शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भान झालेल्या बदलाबाबतची माहिती या परिपत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.


१) संदर्भीय परिपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ (जून २०२३) पासून पथदर्शी स्वरूपात इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके एकूण ४ भागात उपलब्ध करून दिली आहेत. तसेच या संदर्भाने आवश्यक त्या सूचना आपणास कळविण्यात आलेल्या आहेत.

२) शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ (जून २०२४) पासून राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित व अंशतः अनुदानित तसेच खाजगी व विना अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुजराती, कन्नड, तेलुगु, सिंधी, तमिळ व बंगाली या माध्यमांसाठी तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करून एकात्मिक स्वरुपातील पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. या पाठ्यपुस्तकांमध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार वह्यांची पृष्ठे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. सबब शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी एकूण दहा माध्यम व सेमी इंग्रजी विषयांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील.

३) इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील. 

४) शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडी तसेच इयत्ता १ ली व इयत्ता २ रीसाठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ (जून २०२४) हे इयत्ता १ ली व इयत्ता २ री या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहील. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी.

तरी वरीलप्रमाणे पाठ्यपुस्तकांची रचना व बदलाबाबतची नोंद राज्यातील सर्व अधिकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतर सर्व संबंधितांनी घ्यावी.


कृष्णकुमार पाटील

संचालक, 

पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे-४


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.