पवित्र पोर्टल द्वारे झालेल्या शिक्षक भरती अंतर्गत रुजू झालेल्या साठी शिक्षण अधिकारी यवतमाळ यांचे महत्वाचे पत्र.
जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांचे वेतन सीएमपी/ई-कुबेर प्रणाली मार्फ़त थेट शिक्षकांच्या बँक खात्यात जमा करणे बाबत मान्यता देण्यात आलेली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत पवित्र पोर्टल च्या माध्यमातुन निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवक यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. सबंधित शिक्षण सेवकाला मानधन शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत अदा करणे आवश्यक असल्याने सबंधित शिक्षण सेवकाचा शालार्थ वेतन प्रणाली अंतर्गत मुख्याद्यापक लॉगिन (DDO-1) मधुन माहीती भरुण शालार्थ आयडी मिळण्याबाबत प्रस्ताव आपल्या कार्यालयामार्फत शिक्षण विभाग लेखा शाखा जि.प. यवतमाळ येथे सादर करण्यात यावा. सबंधित कर्मचारी यांची नियुक्ती ही २००५ नंतर असल्याने शालार्थ प्रणाली मधे माहिती DCPS/NPS या आज्ञावली मधुनच भरण्यात यावी. प्रस्ताव सादर करताना सोबत जोडावयाचे सर्व दस्तएवज जोडुन असल्याबाबत खात्री करुनच प्रस्ताव जिल्हा कार्यालयात सादर करण्यात यावा. प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्रे.
१) प्रथम नियुक्ती आदेश
२) मुख्याद्यापक लॉगिन (DDO-1) मधुन माहीतीची प्रिंट
३) पंचायत समिती रुजु अहवाल
४) शाळेचा रुजु अहवाल
५) मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांचे फिटनेस प्रमाणपत्र
६) सेवा पुस्तक पहिले पान व वेतन निश्चिती नोंद झेरोक्स
७) शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या झेरॉक्स
८) आधार, पॅन, बँक पासबुक झेरॉक्स आणि नॉमिनी आधार कार्ड झेरॉक्स.
उपरोक्त सर्व कागदपत्रे जोडुन नवनियुक्त शिक्षण सेवकांचे शालार्थ आयडी मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावेत.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments