समग्र शिक्षा अंतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयातून दिनांक एकोणवीस एप्रिल 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये 'महावाचन उत्सव' माहिती संकलित करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
संदर्भ
:- १. महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण- २०२३/प्र.क्र. ३६०/ एसडी-४ दि. २२/११/२०२३.
२. या कार्यालयाचे मार्गदर्शक सुचना जा.क्र. मप्राशिप/सशि/वाच/काअ/ २०२३-२४/३२३६ दि. ०४/१२/२०२३.
३. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/१७३ दि.१६/०१/२०२३.
४. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/३६२ दि.०२/०२/२४.
५. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/४४१ दि.०९/०२/२४.
महावाचन उत्सवाच्या कार्यवाहीबाबत संदर्भीय पत्र क्र. १ अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच संदर्भीय पत्र क्र. २ अन्वये महावाचन उत्सव या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेला आहेत.
राज्यातील सर्व शाळांमध्ये "महावाचन उत्सव" हा उपक्रमांतर्गत विषय / थिम राबविण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कोणत्याही घटनेतून मिळालेली सर्वात मोठी प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनातील कोणतेही तीन पैलू व त्यामधून मिळालेली शिकवण यांचा समावेश करण्याबाबतची थिम सर्व जिल्हा व महानगरपालिकांमध्ये राबविण्याबाबत संदर्भीय पत्र क्र. ३ अन्वये अवगत करण्यात आले होते. सदर पत्रामध्ये विद्यार्थ्यांनी पृष्ठाच्या शीर्षस्थानी विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, शाळेचे नाव आणि तालुका, जिल्हा याचा उल्लेख करुन शाळेच्या मुख्यापकांनी आपल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून एका पानांचे लेखन दि. ३१ जानेवारी १०२४ पर्यंत गट शिक्षणाणिकारी यांच्याकडे जमा करावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने सदर थिम आपल्या जिल्ह्यात राबविताना आपल्या जिल्ह्यातील एकूण शाळा संख्या, एकूण विद्यार्थी संख्या आणि सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्यांची माहिती भरण्याकरीता Google link देण्यात आली होती. या Google link मध्ये माहिती भरुन दि. ०८/०२/२०२४ पर्यंत पाठविण्याबाबत सूचना
संदर्भीय पत्र क्र. ४ अन्वये देण्यात आल्या होत्या. अनुषंगाने त्या आपल्या जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमात सहभागी शाळा व सहभागी विद्यार्थी संख्या दर्शविणारी link मधील माहिती सोबत जोडण्यात येत आहे.
तरी, आपल्या जिल्ह्यास / महानगरपालिकेस वारंवार या कार्यालयाकडून दूरध्वनीद्वारे / Whatapp द्वारे / VC द्वारे माहिती भरण्याबाबत सूचना देऊनही आपल्या जिल्ह्यातील माहिती दिलेल्या Link भरण्यात आली नाही. आपल्या जिल्ह्याची / महानगरपालिका यांची माहिती असमाधानकारक असून आपणांस दि. २४/०४/२०२४ पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे. याकरीता आपण व्यक्तीशः लक्ष घालून दि. २४/०४/२०२४ पर्यंत आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी केलेल्या लेखनाची माहिती शाळांकडून संकलित करुन Link मध्ये अचूक माहिती भरावी.
(समीर सावंत)
राज्य प्रकल्प समन्वयक तथा सह संचालक (प्रशासन) म.प्रा.शि.प., मुंबई.
प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तव रवानाः-
१. मा. आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
२. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
३. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग.
४. प्रशासन अधिकारी (शिक्षण) / शिक्षणाधिकारी महानगरपालिका सर्व.
५. शिक्षण निरिक्षक, (उत्तर / दक्षिण/पश्चिम), मुंबई.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments