लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने PAT परीक्षा वेळापत्रक बदलणेबाबत SCERT चे नवीन निर्देश.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा निर्जनीक दिनांक दोन मार्च 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने PAT परीक्षा वेळापत्रक बदलणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील लोकसभा निवडणूक विषयक प्रशिक्षण दिनांक. ०१/०४/२०२४ ते १५/०४/२०२४ या कालावधित आयोजित केलेले असल्याचे कळविले आहे. तसेच सदर पत्रात PAT परीक्षेच्या वेळापत्रकात बदलणेबाबत सूचित करण्यात आले आहे.. परंतु दिनांक ४, ५ व ६ एप्रिल २०२४ या कालावधीत PAT परीक्षेचे आयोजन राज्यात एकाच वेळी सर्वत्र केले आहे. तसेच माहे एप्रिल २०२४ च्या दुस-या आठवड्यात इयत्ता ५ वी व ८ वी करिता वार्षिक परीक्षेचे आयोजन शासन निर्णय ०७ डिसेंबर २०२३ नुसार करणेत आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत संकलित मूल्यमापन २ ( PAT, ३) परीक्षेचे वेळापत्रक बदलणे शक्य नाही.

तथापि सकाळच्या सत्रात सदर परीक्षेचे आयोजन करून शिक्षकांनी निवडणूक प्रशिक्षणास उपस्थित रहावे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये परीक्षेच्या कालावधीत शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षण असल्यास त्या दिवशीचा त्या शाळेचा पेपर दिनांक ०८/०४/२०२४ रोजी घेण्याबाबत परवानगी विशेष बाब म्हणून देण्यात येत आहे.

सदर सूचना आपल्या स्तरावरून आपल्या अधिनस्त शाळांना देण्यात याव्यात.


(शरद गोसावी)

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे - ३०



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.