ZPFMS Update 2024 - जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२३-२४ अखेर करावयाच्या कामकाजाबाबत ग्रामविकास विभागाचा आदेश

 महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२३-२४ अखेर करावयाच्या कामकाजाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


दि.०२.०४.२०२४ रोजीच्या पत्रान्वये शासनाने जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२३-२४ अखेर करावयाच्या कामकाजाबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विहित मुदतीत सर्व जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांनी कार्यवाही करणे अपेक्षित होते. तथापि, बहुतांश अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवा लोकसभा निवडणूकीच्या कामासाठी अधिग्रहित केल्या असल्याने तसेच दि. ३१.०३.२०२४ रोजी सादर केलेल्या देयकांचे कोषागार कार्यालयाकडून अद्याप धनादेश प्राप्त न झाल्याने लेखांकन प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची विनंती अनेक जिल्हा परिषदांकडून शासनास प्राप्त झाली आहे.


वरील बाब विचारात घेऊन संदर्भाकित दि. २.०४.२०२४ रोजीच्या पत्रातील मुद्दा क्र. १ व २ येथील लेखांकन प्रक्रियेकरिता खालील प्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. याव्यतिरिक्त उपरोक्त पत्रान्वये अन्य लेखाविषयक बाबींकरिता विहित केलेल्या कालमर्यादेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.


जिल्हा परिषद स्तर व पंचायत समितीस्तरः-

१. कोषागारातून प्राप्त होणारे रकमांचे लेखांकन पुर्ण करणे त्यानुषंगाने देयकांची जमा व खर्चाची ताळमेळ पुर्ण करण्याची कार्यवाही ही दिनांक २९ एप्रिल, २०२४ पर्यंत पुर्ण करण्यात यावी.

२. जिल्हा परिषदेतील वित्त विभागाने व पंचायत समितीतील वित्त विभागाने लेखांकन पुर्ण करण्याची कार्यवाही ही दिनांक ३० एप्रिल, २०२४ पर्यंत पुर्ण करावी.



(प्रशांत पाटील)

उपसचिव, महाराष्ट्र शासन


वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.