प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य कार्यालायतुन निर्गमित दि. ०५.०४.२०२४ रोजीच्या परिपत्रका नुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
मंत्रालयात व सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम सन 2024 मध्ये आयोजित करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक 27.12.2023 च्या परिशिष्टानुसार कळविण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारतीय लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करण्याबरोबरच त्यांनी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्टया मौलीक असे योगदान भारतीय समाजाला दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आधुनिक भारत घडविण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची समाजाला व विशेषतः शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याशी संबंधीत विषयावर परिसंवाद, त्यांच्या विचारधारांवर आधारित ग्रंथोत्सव, निबंधस्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच त्यांच्या कार्याशी संबंधीत इतर नाविन्यपूर्ण उपक्रम / कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
संदर्भाधीन शासन निर्देशानुसार कार्यवाही करण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना सूचना देण्यात याव्यात.
प्रति,
1. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
2. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प. (सर्व)
3. शिक्षण निरीक्षक, बृहमुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)
4. प्रशासन अधिकारी (मनपा) (सर्व)
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे- 1
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments