🔹 इयत्ता आठवी व इयत्ता पाचवीच्या निकालाबाबत नवीन नियमावली शासन निर्णयानुसार (शैक्षणिक सत्र 2023-24 चा इयत्ता पाचवी व आठवीचा निकाल कसा तयार करावा?)
🔹महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 29 मे 2023 व शासन निर्णय दिनांक 7 डिसेंबर 2023 नुसार इयत्ता पाचवी व आठवीसाठी नापास करण्याचे धोरण जाहीर केले आहे. सदर आदेशानुसार इयत्ता पाचवी व आठवी साठी निकालासाठी नवीन नियमावली पुढील प्रमाणे.
🔹 इ. ५ वी ८ वी प्रथम सत्रात सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन केले आहे. त्यानुसार निकालपत्रक तयार केले गेले आहे.
🔹द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन, वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित घेण्यात आली आहे.
🔹 इ. ५ वी - मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास १-२ लेखी परीक्षा ४० गुण + तोंडी परीक्षा १० गुण असे एकूण ५० गुण
🔹 इ.८ वी- मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र लेखी परीक्षा ५० गुण + तोंडी १० गुण असे एकूण ६० गुण
🔹 इयत्ता ५ वी व ८ वी कार्यानुभव, चित्रकला, शारीरिक शिक्षण प्रचलित सर्वकश मूल्यमापन श्रेणी देणे
इयत्ता ५ वी सर्व विषय ५० प्रमाणे एकूण २५० गुण.
उत्तीर्ण गुण प्रत्येक विषय ३५% प्रमाणे १८ गुण.
सवलतीचे गुण १० आहेत. तीन विषयात सवलत देता येईल. एका विषयात जास्तीत जास्त 5 गुण देता येतील.
🔹 *इ. ८ वी*- सर्व विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र एकूण गुण ६०×६ = ३६०
सवलतीचे गुण-१० आहेत. तीन विषयात सवलतीचे गुण देता येतील. एका विषयात जास्तीत जास्त 5 गुण देता येतील.
🔹प्रगती पुस्तक द्यायचे नाही-
गुणपत्रक (कार्ड) द्यावे लागणार आहे.
कार्डावर वर्णनात्मक नोंदी करू नयेत.
शेरे- उत्तीर्ण / अनुत्तीर्ण / पुनर्रपरीक्षेस पात्र.
परीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल.
पुनर्रपरीक्षा: अनुत्तीर्ण विषयाची पुनर्रपरीक्षा घ्यावी. कार्या, शा. शि, कला या विषयाची पुनर्रपरीक्षा घेता येणार नाही. पुनर्रपरीक्षेचा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३ दिवस आधी जाहीर करणे आवश्यक. पुनर्रपरीक्षेस सवलतीचे गुण ग्राह्य धरता येईल. साबळ कारण असल्यास फेरपरीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यास येईल.
🔹 इयत्ता 5 वी आणि इ. 8 वीचे PAT परीक्षेचे गुण ऑनलाईन भरून त्याची प्रिंट कॉपी शाळा फाईलला लावून ठेवावी.
🔹इयत्ता 5 वी आणि इ. 8 वीसाठी शाळास्तरावर किंवा मुख्याध्यापक संघाने काढलेल्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवर आधारित वार्षिक निकाल तयार करावा. यासाठी PAT चे गुण धरू नये.
🔹इयत्ता 6 वी आणि 7 वी साठी दुसऱ्या सत्राचा प्रचलित पद्धतीने निकाल तयार करताना मराठी, इंग्रजी व गणित या विषयांचे PAT परीक्षेचे गुण घ्यावेत. उर्वरित हिंदी, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयासाठी शाळेने अथवा मुख्याध्यापक संघाने तयार केलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्राप्त गुण घ्यावेत. इयता 6 वी आणि 7 वीचा निकाल प्रचलित पद्धतीने तयार करावा.
🔹 तिसरी ते आठवी पर्यंतच्या सर्व वर्गाचे PAT परीक्षेचे गुण ऑनलाईन भरायचे आहेत.
🔹 इयता 5 वी आणि 8 वीचा निकाल तयार करण्यासंदर्भात इतर महत्वाच्या सूचना
🔹 इ 5 वी आणि इ. 8 वीचा प्रथम सत्राचा आकारिक व संकलित मिळून 100 गुणांचा निकाल आपण तयार केलाच आहे....
तसाच 100 गुणांचा निकाल प्रचलित पद्धतीने दुसऱ्या सत्राचाही तयार करावा.
त्याचबरोबर नवीन शासन निर्णयानुसार PAT परीक्षेचे चे गुण वगळून शाळेने घेतलेल्या वार्षिक परीक्षेच्या आधारावर दुसरे एक स्वतंत्र निकाल पत्रक तयार करावे.
याचा अर्थ दुसऱ्या सत्रात दोन प्रकारचे निकाल पत्रक तयार होतील- एक प्रचलित व दुसरे सुधारित पद्धतीचे.
🔹 शासनाने नवीन गुणपत्रकात नमूद केलेल्या विषयांचे गुण या दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या प्रकारच्या सुधारित निकाल पत्रकावरून घ्यावेत.
🔹 म्हणजे आपल्याला प्रथम व द्वितीय सत्राचे निकाल पत्रक प्रचलित पद्धतीने तयार करायचेच आहेत. शिवाय दुसऱ्या सत्राचे आणखी एक निकाल पत्रक सुधारित मूल्यमापन पद्धतीने तयार करावयाचे आहे. विद्यार्थ्याला गुणपत्रक दिल्यानंतर ही तीन निकालपत्रके आपल्या शाळेकडे रेकॉर्ड म्हणून शिल्लक राहतील.
[सुधारित गुणपत्रकाचे (निकाल कार्डाचे) स्वरूप बदलले आहे. त्याचा नमुना यापूर्वीच व्हायरल झाला आहे. हा नमुना शासन मान्य असल्यामुळे त्यात कोणताही मूलभूत बदल करू नये.]
🔹 इयत्ता 5 वीला उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला 50 पैकी (लेखी+तोंडी मिळून) 18 गुण घ्यावयाचे आहेत. तर इ. 8 वी साठी 60 पैकी (लेखी+तोंडी मिळून) 21 गुण घ्यावयाचे आहेत. याशिवाय ग्रेस गुणांची सोय आहे.
🔹 इयत्ता 8 वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला नेहमीप्रमाणे RTE नुसार प्रमाणपत्र द्यावयाचे आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पूनरपरीक्षा घेऊन तो उत्तीर्ण झाल्यावर त्याला प्रमाणपत्र द्यावे.
🔹 विद्यार्थ्याला पहिल्या सत्राचे प्रगती पत्रक देणे आवश्यक नाही.
🔹 हिंदी विषयाच्या प्रश्नपत्रिका शासनाने पुरवल्या नसल्या तरी शाळेने या विषयाची प्रश्नपत्रिका इतर विषयांप्रमाणे शासनाच्या विहित नमुन्यानुसार तयार करून घ्यावेत. (म्हणजे इयत्ता 5 वीसाठी 40+10 आणि इयत्ता 8 वीसाठी 50+10 पॅटर्न प्रमाणे)
🔹 इयत्ता 8 वी सामाजिक शास्त्रे विषयांतर्गत कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाची प्रश्नपत्रिका नजरचुकीने इति 30 गुण + भूगोल 20 गुण अशी एकूण 50 गुणांची छापली गेली आहे. परंतु तोंडी परीक्षेचे प्रश्न छापले गेलेले नाहीत.
विषयी शिक्षकांनी आपल्या स्तरावर प्रश्न तयार करून 10 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी.
म्हणजे 50+10=60 गुणांचा पॅटर्न पूर्ण होईल.
🔹कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयाची श्रेणी पहिल्या व दुसऱ्या सत्राच्या निकाल पत्रकातील गुणांच्या सरासरीवरून घ्यावी. (100+100=200/2)
🔹 इ. 1 ली ते 8 वी चे मूल्यमान 20 ऑगस्ट 2010 च्या परिपत्रकानुसार म्हणजेच RTE कायद्यानुसार निश्चित केले गेले आहे. 'आकारिक मूल्यमापन' हा या कायद्यातील तरतूदींचा आत्मा आहे. त्यामुळे त्यात कोणताच मूलभूत बदल करता येत नाही. पालकांची तक्रार व विद्यार्थ्यांना धाक हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून किरकोळ बदल करून नवीन सुधारित मूल्यमापन पद्धती आणली आहे.
🔹 यंदा तांत्रिक अडचणीमुळे काही विषय शिक्षकांना दोनदा पेपर तपासावे लागले आहेत. पुढील वर्षी मात्र अशी वेळ येणार नाही.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
Sir do you have any authentic GR related to this?
ReplyDeleteYes..
Delete