जिल्हांतर्गत विनंती बदली विषयी
या बदल्या 7 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयात अनुसरून होणार आहेत.
या बदल्यांमध्ये कोणीही विनंती बदली साठी अर्ज करू शकतो.(शिक्षण सेवक सोडून)
या बदल्या फक्त सध्या रिक्त असणाऱ्या पदांवर होणार आहेत. त्यातील काही शाळांतील पदे समीकरणात असणार आहेत, त्यामुळे अशा शाळांतील पदे समुपदेशनावेळी दाखवली जाणार नाहीत.
या बदल्या मध्ये खो पद्धत असणार नाही. म्हणजे तुम्हाला समुपदेशनावेळी सोयीची शाळा नसेल तर तुम्ही बदली नाकारू शकता. पण तुम्ही बदली स्वीकारला तर तुमची रिक्त जागा खालील शिक्षकांना दाखवली जाईल.
बदली समायोजन प्रक्रिया जिल्हा स्तरावर संवर्ग निहाय होणार आहेत.
संवर्ग १ व २ चा लाभ घेणाऱ्या शिक्षकांनी आपले पुरावे बदली अर्जासोबत जोडायचे आहेत.
पदवीधर / विषय शिक्षकांची बदली विषयनिहाय रिक्त पदांवर होणार आहे.
संवर्ग १, २, बदली अधिकार पात्र व बदलीपात्र चा लाभ घेण्यासाठी सदर शासन निर्णयातील निकषांची पूर्तता करावी लागेल.
जिल्हांतर्गत बदली 7 एप्रिल 2021 चे नवीन शासन धोरणानुसार संवर्ग १,२ , बदली अधिकार पात्र व बदलीपात्र शिक्षकांचे निकष खालीलप्रमाणे........
विशेष संवर्ग शिक्षक भाग १ निकष
शासनाचे निश्चित केलेल्या नवीन जिल्हा अंतर्गत धोरणानुसार संवर्ग 1 मध्ये खालील शिक्षक विशेष संवर्ग भाग 1 म्हणून ओळखले जातील.
1.8.1 पक्षाघाताने आजारी शिक्षक (paralysis)
1.8.2 दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14-1-2011 मधील नमूद प्रारूप प्रमाणे सक्षम प्राधिकारी याचे प्रमाणपत्र आवश्यक)
मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ) तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक
1.8.3 हृदय शस्त्रक्रिया झालेली शिक्षक
1.8.4 जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलिसिस सुरू असलेले शिक्षक
1.8.5 यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक
1.8.6 कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक
1.8.7 मेंदुचा आजार झालेले शिक्षक
1.8.8 थलेसेमिया विकार ग्रस्त मुलांचे पालक / जन्मजात गुणसूत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदाहरणार्थ मिथाइल मॅलोनिक ऍसिडिमिया (MMA) शास्त्रीय प्रकार)(mutase defiency व इतर आजार) (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ)
1.8.9 माजी सैनिक तसेच आजी / माजी सैनिक व अर्ध जवानांच्या पत्नी / विधवा
1.8.10 विधवा शिक्षक
1.8.11 कुमारिका शिक्षक
1.8.12 परितक्त्या / घटस्फोटित महिला शिक्षक
1.8.13 वयाची 53 वर्षे पूर्ण झालेले शिक्षक
1.8.14 स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्रसैनिक हयात असेपर्यंत)
खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक
1.8.15 हृदय शस्त्रक्रिया झालेली
1.8.16 जन्मापासून एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसिस सुरू असलेले
1.8.17 यकृत प्रत्यारोपण झालेले
1.8.18 कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले
1.8.19 मेंदूचा आजार झालेले
1.8.20 थलेसेमिया विकार ग्रस्त असलेली.
........................................................................
विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 बदली निकष
जर सेवेत आसलेल्या पती पत्नी कार्यरत असलेल्या सध्या नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून 30 किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांचा दर्जा प्राप्त होतो.
संवर्ग 2 चे निकष व प्राधान्यक्रम -
1.9.1 पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर
1.9.2 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर
1.9.3 पती-पत्नी दोघेही एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर
1.9.4 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्यशासनाच्या स्वायत्त संस्थेचा
कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका / नगरपालिका.
1.9.5 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी
1.9.6 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक/ कर्मचारी असेल तर
........................................................................
बदली अधिकार प्राप्त शिक्षक (संवर्ग-3) बदली निकष
बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करावयाची सेवा तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.
........................................................................
बदली पात्र शिक्षक व्याख्या (संवर्ग-4)
बदलीपात्र शिक्षक म्हणजे ज्या
शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा 10 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा 5 वर्षे पूर्ण झालेली आहे असे शिक्षक.(दुर्गम क्षेत्रात सलग 10 वर्ष सेवा झालेले शिक्षक सुद्धा बदली पात्र ठरतात.)
बदली मार्गदर्शन कक्ष,
वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने विनंती जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबविली जात आहे.
जिल्हा अंतर्गत बदली सन 2023-24
🛑🛑महत्वाचा सूचना🛑🛑
आज दिनांक 8 मार्च 2024 रोजी झालेल्या VC मधील सूचनेनुसार जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सन 2023 24 ( विनंती बदली) अंतर्गत खालील बाबींचा कटाक्षाने विचार करावा.
१. विशेष संवर्ग भाग १ - अंतर्गत पात्र व विनंती अर्ज करणाऱ्या शिक्षकांची माहिती Cadre -1 असा शेरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे
2. विशेष संवर्ग भाग २ -अंतर्गत पात्र व विनंती अर्ज करणारा शिक्षकांची माहिती Cadre -2 असा शेरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे
3. बदली अधिकार प्राप्त - अवघड क्षेत्र अंतर्गत पात्र व विनंती बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांची माहिती Entitled असा शेरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे
4. बदली पात्र बदली पात्र-शिक्षकांमधून विनंती बदली मागणी करणाऱ्या शिक्षकांची माहिती Eligible असा शिरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे
5. इतर वरील चारही संवर्गामध्ये न येणाऱ्या परंतु विनंती बदली मागणी करणाऱ्या शिक्षकांची माहिती Other असा शेरा नमूद करून भरण्याची आहे
🛑 सदरची प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडील प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शनानुसार पार पाडली जाणार असल्याने त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या सद्यस्थितीतील अद्ययावत रिक्त पदांनुसार समुपदेशनाद्वारे विकल्प स्वीकारले जातील. सद्यस्थितीत विकल्प देण्याची आवश्यकता नाही.
🛑 सोईची जागा नसेल तर नकार देता येईल... विनंती बदली मागितली आहे म्हणून आधीच रिक्त पद दाखवले जाणार नाही अगर त्याचा समावेश आधीच केला जाणार नाही ...जो शिक्षक विनंतीने अन्य शाळा मागेल त्याला ती शाळा दिल्यानंतर त्याची मुळ शाळा रिक्त पदात समाविष्ट करण्यात येईल समुपदेशन वेळी रिक्त असणारी शाळाच दाखवली जाईल व ती मागता येईल.
🛑 सदर बदली फक्त समुपदेशनावेळी उपलब्ध असलेल्या रिक्त असलेल्या पदांवर होईल... कोणालाही खो देऊन /आपसी बदली करण्यात येणार नाही.
🛑 पुरविणेत आलेल्या GOLDEN FILE मध्येच फक्त विनंती बदली अर्जदार शिक्षकांची माहिती वरील सूचनांप्रमाणे सादर करणेची आहे.
🛑 उद्या दुपारी 12 पर्यंत शिक्षकांकडून अर्ज प्राप्त करून घेऊन सदरची माहिती उद्या सायं 4 पर्यंत खास दुतामार्फत या कार्यालयास सादर करणेची आहे.
🛑 तसेच विषय शिक्षक पदोन्नती माहिती देखील उद्या दुपारी 1 पर्यंत शिक्षकांनी केंद्रस्तर तर ४ वाजेपर्यंत ग. शि. यांनी एकवटी व कागदपत्रांसह या कार्यालयास सादर करणेची दक्षता घ्यावी.
🛑 कोणत्याही संघटना लोगो असणारे अर्ज स्वीकारला जाणार नाही... संघटनांनी सुद्धा अनधिकृतपणे प्रशासनाच्या परवानगी शिवाय कोणतेही प्रपत्रे परस्पर पाठवून गोंधळ निर्माण करु नये... सर्व गशिअ व केंद्रप्रमुख यांनी असे फॉर्म स्विकारू नयेत....असे फॉर्म सादर करणारे शिक्षक अपात्र ठरविण्यात येतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
🛑 केंद्रस्तर/ तालुकास्तरावर विनंती बदली व पदवीधर पदोन्नती माहिती संकलन, छाननी इ.साठी सक्षम मनुष्यबळ व तंत्र स्नेही व्यक्ती इ.दोन्ही यंत्रणा वेगळी असावी. जेणेकरून काम करताना विलंब अथवा गोंधळ होणार नाही असे नियोजन करावे.
शिक्षणाधिकारी (प्राथ)
जिल्हा परिषद सांगली
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments