जिल्हा अंतर्गत बदली सन 2023-24 विनंती बदलीसाठी करावयाचा अर्ज व सूचना

ज्या  जिल्हा परिषदांचे जिल्हा अंतर्गत बदलीसाठी आदेश निर्गमित झाले आहे अशा जिल्हा परिषदांची बदली प्रक्रिया पुढीलप्रमाणे होईल अशी शक्यता आहे. 

आणि ज्या जिल्हा परिषदांनी आदेश निर्गमित केली नाही अशा जिल्हा परिषद मधील कार्यरत शिक्षकांनी देखील पाठपुरावा करून 21 जून 2023 च्या शासन निर्णयाप्रमाणे नवीन पवित्र पोर्टल भरती नियुक्तीच्या पूर्वी विनंती समुपदेशनाने बदलीसाठी आग्रही भूमिका घेणे आवश्यक आहे. 


जिल्हा अंतर्गत बदली सन 2023-24


🛑🛑महत्वाचा सूचना🛑🛑

    आज दिनांक 8 मार्च 2024 रोजी झालेल्या VC मधील सूचनेनुसार जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सन 2023 24 ( विनंती बदली) अंतर्गत खालील बाबींचा कटाक्षाने विचार करावा.


१. विशेष संवर्ग भाग १ - अंतर्गत पात्र व विनंती अर्ज करणाऱ्या शिक्षकांची माहिती Cadre -1 असा शेरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे

2. विशेष संवर्ग भाग २ -अंतर्गत पात्र व विनंती अर्ज करणारा शिक्षकांची माहिती Cadre -2 असा शेरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे

3. बदली अधिकार प्राप्त - अवघड क्षेत्र अंतर्गत पात्र व विनंती बदलीसाठी अर्ज करणाऱ्या शिक्षकांची माहिती Entitled असा शेरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे

4. बदली पात्र बदली पात्र-शिक्षकांमधून विनंती बदली मागणी करणाऱ्या शिक्षकांची माहिती Eligible असा शिरा नमूद करून प्रपत्र मध्ये भरण्याची आहे

5. इतर वरील चारही संवर्गामध्ये न येणाऱ्या परंतु विनंती बदली मागणी करणाऱ्या शिक्षकांची माहिती Other असा शेरा नमूद करून भरण्याची आहे . 


🛑 सदरची प्रक्रिया ग्रामविकास विभागाकडील प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शनानुसार पार पाडली जाणार असल्याने त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या सद्यस्थितीतील अद्ययावत रिक्त पदांनुसार समुपदेशनाद्वारे विकल्प स्वीकारले जातील. सद्यस्थितीत विकल्प देण्याची आवश्यकता नाही.


🛑 सोईची जागा नसेल तर नकार देता येईल... विनंती बदली मागितली आहे म्हणून आधीच रिक्त पद दाखवले जाणार नाही अगर त्याचा समावेश आधीच केला जाणार नाही ...जो शिक्षक विनंतीने अन्य शाळा मागेल त्याला ती शाळा दिल्यानंतर त्याची मुळ शाळा रिक्त पदात समाविष्ट करण्यात येईल समुपदेशन वेळी रिक्त असणारी शाळाच दाखवली जाईल व ती मागता येईल.


🛑 सदर बदली फक्त समुपदेशनावेळी उपलब्ध असलेल्या रिक्त असलेल्या पदांवर होईल... कोणालाही खो देऊन /आपसी बदली करण्यात येणार नाही.


🛑 पुरविणेत आलेल्या GOLDEN FILE मध्येच फक्त विनंती बदली अर्जदार शिक्षकांची माहिती वरील सूचनांप्रमाणे सादर करणेची आहे*


🛑 उद्या दुपारी 12 पर्यंत शिक्षकांकडून अर्ज प्राप्त करून घेऊन सदरची माहिती उद्या सायं 4 पर्यंत खास दुतामार्फत या कार्यालयास सादर करणेची आहे.


🛑 तसेच विषय शिक्षक पदोन्नती माहिती देखील उद्या दुपारी 1 पर्यंत शिक्षकांनी केंद्रस्तर तर ४ वाजेपर्यंत ग. शि. यांनी एकवटी व कागदपत्रांसह या कार्यालयास सादर करणेची दक्षता घ्यावी.


🛑 कोणत्याही संघटना लोगो असणारे अर्ज स्वीकारला जाणार नाही... संघटनांनी सुद्धा अनधिकृतपणे प्रशासनाच्या परवानगी शिवाय कोणतेही प्रपत्रे परस्पर पाठवून गोंधळ निर्माण करु नये... सर्व गशिअ व केंद्रप्रमुख यांनी असे फॉर्म स्विकारू नयेत....असे फॉर्म सादर करणारे शिक्षक अपात्र ठरविण्यात येतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

🛑 केंद्रस्तर/ तालुकास्तरावर विनंती बदली व पदवीधर पदोन्नती माहिती संकलन, छाननी इ.साठी सक्षम मनुष्यबळ व तंत्र स्नेही व्यक्ती इ.दोन्ही यंत्रणा वेगळी असावी. जेणेकरून काम करताना विलंब अथवा गोंधळ होणार नाही असे नियोजन करावे.



शिक्षणाधिकारी (प्राथ)

जिल्हा परिषद सांगली

वरील सूचना जिल्हा परिषद सांगली साठी आहे इतर जिल्ह्यांमध्ये देखील कमी अधिक प्रमाणात काही सूचना लागू होऊ शकतात. 



सर्व संवर्गासाठी अर्ज पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

कालमर्यादित ,अतितात्काळ

प्रति, 
सर्व गटशिक्षणाधिकारी 
जि प नाशिक 

विषय -शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्व बदली प्रक्रियेबाबत.

संदर्भ - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक सं 2023/प्र क्र .174/TNT -1,दिनांक-6 मार्च 2024 मा तुषार महाजन उपसचिव ,महाराष्ट्र शासन .

उपरोक्त संदर्भीय आदेशान्वये ,शिक्षक भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्यास आदेशित केले आहे .त्याअनुषंगाने आपल्या अधिनस्थ सर्व शिक्षकांस सदर बदल्यांची प्रक्रिया राबविली जाण्याची सूचना देण्यात यावी . त्याअनुषंगाने गटपातळीवर अस्तित्वात असलेल्या शिक्षक बदली साठीच्या प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधितांचे बदलीसाठीचे अर्ज संकलित करून अहवालासह इकडील कार्यालयास कळविण्यात यावे यासाठी आवश्यक असलेले पत्र वेळपरत्वे आपणांस देण्यात येईल याची नोंद घ्यावी .
                               डॉ नितीन बच्छाव
                          शिक्षणाधिकारी प्राथमिक
                            जिल्हा परिषद नाशिक


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.