शिक्षक भरती दुसरा टप्पा अपडेट - पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यात या अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून घेणार?

२०२२ च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, आणि दहा टक्के कपात ही बाकी राहीलेली सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून दिनांक २३.१०.२०२३ पर्यत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र (कोरोना काळातील २ वर्षाची शिथिलता सोबत) असलेले अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करुन घेणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शिक्षण आयुक्त यांना पुढील प्रमाणे  अभिप्राय मागविला आहे. 




महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत १. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, २. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व) ३. शिक्षणाधिकारी, महानगरपालिका (संबंधित)४. शिक्षण निरिक्षक, (पश्चिम/उतर/दक्षिण), बृहन्मुंबई ५. प्रशासन अधिकारी, मनपा/नप (संबंधित) यांना पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत. 

संदर्भ : शासन पत्र क्रमांक संकीर्ण-२०२४/प्रक्र ६६१/टिएनटी-१ दिनांक १०/०९/२०२४

संदर्भीय पत्रान्वये पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त आहेत, त्यानुसार शिक्षक पदभरतीबाबतची कार्यवाही करावयाची आहे. (प्रत संलग्न)

१. बिंदुनामावलीतील त्रुटींबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून शहानिशा करणेबाबत मा. मंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार १० टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदांचे नियुक्ती प्राधिकारी यांनी बिंदुनामावली अद्ययावत असल्याबाबत तसेच यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून तसे प्रमाणित करून १० टक्के रिक्त पदभरतीबाबत कार्यवाही करावयाची आहे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडला आहे)

२. भरतीप्रक्रियेमधील अपात्र, गैरहजर व रूजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरणे हा भरतीप्रक्रियेचाच एक भाग आहे. यानुसार यापुढील सर्व भरती प्रक्रियेमध्ये अपात्र, गैरहजर व रूजू न झालेल्या उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे उर्वरित उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत, त्यामुळे या पदांची देखील माहिती तयार ठेवावी, जेणेकरून सदर रिक्त पदे नव्याने येणा-या जाहिरातीच्या वेळी विचारात घेता येतील.

३. शासन निर्णय दि.१०/११/२०२२ मधील तरतुदींनुसार पोर्टलवर जाहिराती घेण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्यातील जाहिराती घेवून पदभरतीची कार्यवाही येणार असल्याने आपल्या अधिनस्थ शैक्षणिक संस्थांना याबाबत अद्ययावत बिंदुनामावलीनुसार रिक्त पदे तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात याव्यात. जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत कळविण्यात सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे.

४. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरीता अधिनियम, २०२४ राज्यात दिनांक २६/०२/२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले निर्देश व सूचना विचारात घेवून नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (एसईबीसी) या प्रवर्गाकरीता आरक्षण विचारात घेवून पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी.

पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीची कार्यवाही करावयाची असल्याने, सदरची कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यात यावी व पवित्र पोर्टलवर जाहिरातीची सुविधा दिल्यानंतर तात्काळ त्यानुसार यापुर्वी जाहिरातींसाठी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही करावी.


(सूरज मांडरे. भा.प्र.से.)

आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे


प्रतिलिपी :

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ या माहितीस्तव सविनय सादर. २. मा.शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे

३. मा. शिक्षण संचालक, (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, म.रा.पुणे




वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा. 

Download


दिनांक ०७/०९/२०२४


शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनांसाठी सूचना 'मुलाखतीसह' हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी चाचणी परीक्षेतील गुणवतेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 07/08/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

"मुलाखत अध्यापन कौशल्य यांसाठीची कार्यवाही व्यवस्थापनांकडून करण्यास दिनांक 09/08/2024 ते 31/08/2024 असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे.

सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी, निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक

संस्था/व्यवस्थापनस्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी

करण्यासाठी दिनांक 07/09/2024 पर्यंत पोर्टलवर सुविधा देण्यात आली होती.

परंतु पोर्टल वरील निवड प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करणे व निवड केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे तपासून घेणे ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी अजून कालावधी देणे आवश्यक आहे.

वरीलप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दिनांक 13/09/2024 पर्यंत मुदत वाढविण्यात येत आहे.

पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतर व निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे शिक्षणाधिकारी यांचे कडून पडताळणी केल्यानंतर संस्थास्तरावरून प्रत्यक्ष नियुक्त आदेश निर्गमित करता येतील.

"मुलाखतीसह" या प्रकारातील "मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीच्या नोंदी दिनांक 13/09/2024 नंतर व्यवस्थापनस्तरावरून करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.



दिनांक ०१/०९/२०२४


शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनांसाठी सूचना 'मुलाखतीसह' हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक ०७/०८/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

"मुलाखत अध्यापन कौशल्य यांसाठीची कार्यवाही व्यवस्थापनांकडून करण्यास दिनांक ०९/०८/२०२४ ते ३१/०८/२०२४ असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे.

सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी, निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनस्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक ०७/०९/२०२४ पर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील.

पवित्र पोर्टल वरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच, निवड केलेल्या उमेदवारांना संस्थास्तरावरून प्रत्यक्ष नियुक्त आदेश निर्गमित करता येतील.

"मुलाखतीसह" या प्रकारातील "मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीच्या नोंदी दिनांक ०७/०९/२०२४ नंतर व्यवस्थापनस्तरावरून करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.




खाजगी संस्थांतील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकाराकरीता शिक्षक पदासाठी निवड करताना (Standard Operating Procedure) खालीलप्रमाणे ठरविण्यात येत आहे:-


१) शासन निर्णय क्र.संकीर्ण २०२३/प्र.क्र.३०२/टीएनटी-१, दि.०६.०७.२०२३ मधील मुद्दा क्र. (आ) नुसार मुलाखतीकरीता देण्यात येणाऱ्या ३० गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात यावी.


अ) उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व (एकूण गुण ५) -

(i) पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा -

(ii) पर्यावरणाची जाणीव -

(iii) सामाजिक भान, इत्यादी


ब) उमेदवारांचे सामान्यज्ञान (एकूण गुण ५) --

(i) चालू घडामोडी

(ii) महाराष्ट्राचा भूगोल / इतिहास

(ii) राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय समस्या, इत्यादी


क) उमेदवारांचे विषयज्ञान (एकूण गुण १०)

(i) शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान -

(ii) शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान-

iii) शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता (Application ability) ज्ञान-

ड) उमेदवाराचे पाठनिरीक्षण (एकूण गुण १०) --

(i) पाठाची पूर्वतयारी -

(विषयानुरूप नियोजन, वेळेचे नियोजन इत्यादी.)

(ii) पाठादरम्यान विषयाची मांडणी -

(अनुरूप प्रस्तावना, विविध विषयाची सांगड, मुख्य विषयाकडे प्रवेश) iii) पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर - (

(गरजेनुरूप शैक्षणिक साहित्य वापर, शैक्षणिक तंत्रज्ञान वापर, फलक लेखन इत्यादी)

(iv) पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग / प्रतिसाद-

(वर्ग नियंत्रण, चैतन्यमय वातावरण, विद्यार्थी सहभाग इ.)

(v) पाठाचे यशस्वी पुनरावलोकन (Review)

(शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण, उद्दिष्टनिहाय मूल्यमापन, अध्यापनाची परिणामकारकता इत्यादी.)

२. गुणदान प्रक्रीयेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास, यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील


प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावे:-

१. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील.

२. समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अनु क्र.१ नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे.

३. वरील अनु क्र. १ व २ या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता (इ.१२ वी/पदवी/पदव्युत्तर पदवी, डीएड/बीएड/समकक्ष) यामधील जास्त गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावेत.

३. निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरीता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यांवरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष/वर्गखोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन जतन करुन ठेवण्यात यावेत.

४. निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करुन त्यांचे जतन करुन ठेवण्यात यावेत.






दिनांक १०/०८/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


मुलाखतीसह शिक्षक भरती संदर्भात सविस्तर सूचना व्यवस्थापनांना तसेच अभियोग्यताधारकांना देण्यात आलेल्या आहेत. काही मंडळी त्यातील काही सूचनाचा विपरित अर्थ लावून खोडसाळपणाने अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात अधिक स्पष्टता देण्यासाठी पुढील मुद्दे नमूद करण्यात येत आहे...

कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असेल आणि खुल्या जागांच्या निकषांची पूर्तता करीत असेल तर त्यांचा समावेश खुल्यात होणार आहे.

गुणवत्तेनुसार खुल्या जागासाठी पात्र असल्यास खुल्या जागेवर व तसे पात्र नसल्यास आरक्षित प्रवर्गातील जागेवर नियुक्ती होणार आहे. त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागा व आरक्षित प्रवर्गातील जागा या दोन्ही प्रकारातील जागा उपलब्ध होणार आहेत.

२०१९ मधील पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीसह पदभरतीच्यावेळी देखील वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे व त्यानुसारच त्यावेळी भरती झाली आहे.

काही व्यक्ती अर्धवट तरतूद नमूद करून अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा खोडसाळपणापासून सावध राहावे.

शिक्षक वअभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर १:१० या प्रमाणात उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पाठविण्यात येत आहे. याचबरोबर प्रत्येक अभियोग्यताधारकास देखील कमाल दहा संस्था निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. उमेदवारांना १० प्राधान्यक्रम आणि संस्थांनाही प्रत्येकी १० उमेदवार उपलब्ध करून द्यायचे असल्याने शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या ही जागांचे दहापट येणे अपेक्षितच नाही. तसे झाल्यास एकूण उमेदवारापैकी केवळ १०% उमेदवार निवडले जातील व ९०% उमेदवारांना या प्रक्रियेतून काहीही लाभ होणार नाही. पूर्वीच्या भरतीमध्ये देखील अशाच प्रकारची कार्यपद्धती अनुसरली गेलेली आहे.

एखाद्या उमेदवाराची एकापेक्षा अनेक पदांवर मुलाखतीसह या निवड प्रक्रियेत निवड झाल्यास संबंधित व्यवस्थापनास गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देता येईल. त्यामुळे कोणाचाही अधिकार डावलला जाणार नाही व पदेही रिक्त राहणार नाहीत.

व्यवस्थापनामार्फत होणाऱ्या ३० गुणदानाबाबतचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) प्रथमच करण्यात आलेले असून, त्यातील तरतुदी विचारात घेता भरतीमध्ये एकसूत्रपणा व पारदर्शकता राहून गुणवत्तापूर्ण भरती होईल याची खात्री वाटत असल्याची भावना अनेक अभियोग्यताधारकांकडून तसेच शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

• न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.



शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


दिनांक ०७/०८/२०२४

यादी पाहण्यासाठी अधिकृत पोर्टल लिंक

https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx

पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पद भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील १६७९९ या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

आता 'मुलाखतीसह' पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९ मध्ये एकूण ३० गुणांची तरतूद करण्यात आली आहे. पात्र उमेदवाराची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थास्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबिण्यात येते. अशा परिस्थितीत शिक्षक पदभरतीमध्ये एकसुत्रता (Uniformity) राखण्याच्यादृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा (SOP_Standard Operating Procedure) अवलंब करणेत येत असून यासाठी शासन पत्र दिनांक

०६/०८/२०२४ अन्वये मानक कार्यपद्धती (SOP Standard Operating Procedure) निश्चित केली आहे. 'मुलाखतीसह पदभरती मध्ये इयत्ता पहिली ते पाचवी / इयत्ता सहावी ते आठवी / इयत्ता नववी ते दहावी/ इयत्ता अकरावी ते बारावी या गटातील शिक्षणसेवक/शिक्षकांच्या ४८७९ रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. १०९६ व्यवस्थापनातील ४८७९ रिक्त पदांसाठी

७८०५ उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जास्तीतजास्त १० प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आली आहे.

नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती, परंतु विविध कारणास्तव ११ शैक्षणिक संस्थांच्या एकूण ४३ पदासाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही. अशा शैक्षणिक संस्थातील सदर कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीस देण्यात येत आहे.

सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन मा. उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा, निवडप्रक्रियेबाबत जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना सविस्तर सूचना देण्यात येत आहेत.

जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवडप्रक्रिया पार पाडण्याचे दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

निवडप्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

निवडप्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांचेकडे अर्ज करता येईल, उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्र सोबत जोडावेत. शिक्षणाधिकारी यांनी अशा तक्रार अर्जाची शहानिशा तातडीने करावी व तीन दिवसात याबाबत संयुक्तिक निर्णय संबंधितांना कळवावा. संबंधित शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यांसह व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारअर्जासह अपील अर्ज दाखल करता येईल. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तीन दिवसात अशा अपीलावर शहानिशा करून यथोचित निर्णय द्यावा व प्रचलित नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी.

ही सर्व प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व पारदर्शक रित्या पार पडेल यासाठी सर्वच घटकांनी सर्वकष प्रयत्न करावेत. कोणत्याही बाह्य दबावास, प्रलोभनास बळी पडू नये शिक्षक पदभरतीच्या मुलाखतीसह' या प्रकारातील सर्व साधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरीदेखील या संदर्भात अभियोग्यता धारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती (Grievance Redressal and Correction Committe) कडे pavitra2022grcc@gmail.com या ई-मेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कुणीही ग्रुप ई-मेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत. विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच

अन्य मागाँनी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये.

मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा.

• न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.



दिनांक ३०/०७/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


. 'पवित्र प्रणाली' अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या त्या सामाजिक आरक्षणातील 'सर्वसाधारण' मध्ये रूपांतरित करून दिनांक २५/०६/२०२४ व दिनांक ११/०७/२०२४ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. त्या मध्ये अनुक्रमे ३,१५० व १५६ अशा एकूण ३,३०६ रिक्त पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शासन निर्णय दिनांक ०६/०८/२००१ व ०७/१२/२००१ मधील तरतुदी विचारात घेऊन शासन पत्र दिनांक १४/०३/२०२४ नुसार 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील 'उर्दू' माध्यमातील समांतर आरक्षण/सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी दिनांक १२/०७/२०२४ ते १५/०७/२०२४ या कालावधीत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.

. सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन मा. उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सदर यादीमध्ये एकूण ८७२ रिक्त पदांकरिता उमेदवारांनी त्यांच्या स्व-प्रमाणपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडीकरिता शिफारशी होत आहेत. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी करून नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासन निर्णय दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदींनुसार समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येईल.

• उर्दू माध्यमातील रिक्त पदांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील.

शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. 'मुलाखतीसह पदभरती' या प्रकारातील निवडप्रक्रियेसाठी स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) विकसित करण्यात आली आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे. त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोग्यताधारकांची निवड संस्थांकडून करण्यात येईल. यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे.

'माजी सैनिक' या समांतर आरक्षणातील १० टक्के रिक्त ठेवलेल्या जागांसाठी 'माजी सैनिक' यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.

. न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.


दिनांक १२/०७/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


"मुलाखतीसह" पदभरती हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत, अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत.

शासन निर्णय दिनांक १३/१०/२०२३ नुसार रिक्त पदभरतीबाबत "विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल", अशी तरतूद आहे.

"मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह" पदभरतीतील दोन स्वतंत्र प्रकार असून जाहिरातीदेखील स्वतंत्र आहेत. त्यातील 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता मुलाखतीसह या प्रकारातील कार्यवाही सुरू करावयाची आहे. दोन्ही निवड प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आल्या आहेत. जाहिराती स्वतंत्र असल्याने त्यांची निवडप्रक्रियादेखील स्वतंत्रपणे होत असते.

उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास "मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह" या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत दिनांक ११/०२/२०२४ रोजीच्या शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पद भरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आलेले आहेत. त्यावेळी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-२०२२) दिलेल्या व पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेतल्यास त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वरच्या गटासाठी निवडले जातील. यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांच्या संधी नाहक हिरावल्या जातील. यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले व त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच "मुलाखतीसह" या प्रकारातील वरच्या गटातील पदांसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांची पोर्टलवर इच्छुकता घेण्यास शासनाने दिनांक २८/०६/२०२४ अन्वये मान्यता दिली आहे.

"मुलाखतीसह" पदभरती या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदापेक्षा वरच्या गटातील पदांसाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यक्रमासाठी विचारात घेता येईल.

यासाठी ज्या उमेदवारांची 'मुलाखतीशिवाय' या प्रकारात शिफारस झालेले आहे. अशा उमेदवारांना "मुलाखतीसह" निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास लॉगिनवर त्यांनी तशी इच्छुकता दर्शविणे अनिवार्य आहे. जे उमेदवार 'मुलाखतीसह' निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास कोणतीही इच्छुकता पोर्टलवर दर्शविणार नाहीत, अशा उमेदवारांचे फेब्रुवारी २०२४ मध्ये मुलाखतीसह' या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सदरची सुविधा दिनांक १२/०७/२०२४ ते १५/०७/२०२४ या कालावधीसाठी उपलब्ध राहील.

वरील प्रकारे कार्यवाही केल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार केवळ इच्छुक उमेदवारच त्याच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होईल.२) मुलाखतीसह राऊंडसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही. त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य अभियोग्यताधारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक अभियोग्यताधारकांना संधी मिळेल.

'मुलाखतीसह' या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना सविस्तर सूचना देण्यात येतील.

न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.



दिनांक १२/०७/२०२४

उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीशिवाय या प्रकाराच्या उर्दू माध्यमातील शिक्षक पदभरतीसाठीच्या जाहिरातीमधील रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत.

१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पदभरतीसाठी माहे फेब्रुवारी २०२४ मध्ये मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले होते. त्यानुसार दिनांक २५/२/२०२४ व २५/६/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

२. शासन पत्र दिनांक १४/०३/२०२४ अन्वये सदर जाहिरातीतील सामाजिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या प्रवर्गातील बिंदू अनारक्षित समजून खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारातून भरण्यात यावेत. या तरतुदी विचारात घेऊन रिक्त राहिलेल्या पदांबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानुसार वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या पदांसाठी सदर पदे खुल्या प्रवर्गात रूपांतरित केल्यानंतर पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे आवश्यक आहे.

3. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त पदांबाबत सामान्य प्रशासन विभागाने दिनांक २५/०६/२०२४ रोजी सर्व माध्यमांची राखून ठेवलेली तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पदे वगळून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित फेरीतून भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

४. सध्या पदभरतीसाठी उपलब्ध असलेल्या आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदांचा तपशील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंद करताना संबंधित व्यवस्थापनांची मूळ जाहिरात त्यानंतर विविध फेरीमध्ये शिफारस करण्यात आलेली पदे व त्यानंतर सद्यःस्थितीत पदभरतीसाठी उपलब्ध असलेली रिक्त पदे विचारात घेऊन प्राधान्यक्रम नोंद करावेत.

५. उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी पोर्टलवरील दिनांक ०१/०९/२०२३, ०५/०२/२०२४ व वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांसाठीच्या सूचनांचे अवलोकन करून प्राधान्यक्रम लॉक करावेत.

६. उमेदवारांना त्यांचे लॉगिनवर प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी दिनांक १२/०७/२०२४ ते दिनांक १५/०७/२०२४ या कालावधीत सुविधा देण्यात येत आहे. जे उमेदवार प्राधान्यक्रम विहित मुदतीत लॉक करणार नाहीत, असे उमेदवार उर्दू माध्यमातील उर्वरित रिक्त पदांसाठी विचारात घेतले जाणार नाही.

७. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

८. प्राधान्यक्रम Generate करणे, lock करणे इत्यादींबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना edupavitra२०२२@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधता येईल.



दिनांक ११/०७/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


'पवित्र प्रणाली' अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या त्या सामाजिक आरक्षणातील 'सर्वसाधारण' मध्ये रूपांतरित करून दिनांक २५/०६/२०२४ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये ३,१५० रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली आहे.


'मुलाखती शिवाय' हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक २५/०६/२०२४ रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगांमध्ये दर्शविण्यात आलेले होते व ते प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते.


. मुलाखती शिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक १८०/२०२४ व अन्य संलग्न याचिकांप्रकरणी दिनांक ०५/०७/२०२४ रोजी सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये मा. न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करणेवर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय विधीज्ञ यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे कळविण्यात आले होते.


समांतर आरक्षणातील रिक्त पदांकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत सदरची पदे, मूळ जाहिरातीतीलच असल्याने दिनांक २५/०२/२०२४ रोजी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे या समांतर आरक्षणातील रिक्त पदांच्या शिफारसीबाबत कार्यवाही करता येईल, तथापि रयत शिक्षण संस्थेस नियुक्ती न देण्याबाबत मा. उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही करता येणार नाही असे मत शासकीय विधीज्ञ यांनी व्यक्त केले आहे.


खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 'मुलाखतीशिवाय' समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मा. उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे.


न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.

-


दिनांक ०५/०७/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद भरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे या त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून दिनांक २५/०६/२०२४ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये ३१५० रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली आहे.


'मुलाखती शिवाय' हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक २५/०६/२०२४ रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगांमध्ये दर्शविण्यात आलेले होते.


मुलाखती शिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक १८०/२०२४ व अन्य संलग्न याचिका प्रकरणी आज दिनांक ०५/०७/२०२४ रोजी सुनावणी झाली. आज झालेल्या सुनावणीमध्ये मा. न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करणेवर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय अभियोग्यता यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.


• न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.


शिक्षण आयुक्त यांनी दिनांक 25 जून 2024 रोजी रूपांतर फेरीतील निवड यादीतील उमेदवारांचा कागदपत्रांच्या पडताळणी बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी, तसेच 'शिक्षण सेवक' पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्यादृष्टीने 'अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) -२०२२' यामध्ये प्राप्त असलेले गुण, बिंदुनामावलीनुसार शिल्लक आरक्षण, जाहिरातीनुसार अध्यापनाचे उर्वरित विषय तसेच उमेदवाराने स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व लॉक केलेले प्राधान्यक्रम या सर्व बाबी एकत्रित विचारात घेवून सर्वसाधारण गुणवत्तायादी पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन तयार करून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२२ मध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्व-प्रमाणित करण्याची, तसेच त्यांची शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली होती. यास्तरावरून उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही. आपल्या स्तरावरून उमेदवारांच्या सर्व संबंधित कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची पडताळणी करावयाची आहे.

निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्त्या देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदांकरिता उमेदवारांची पात्रता तपासून ते पात्र असल्यासच त्यांच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्व-प्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रे आपल्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

याबाबत स्पष्ट करण्यात येते की, उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेली आहे. परिणामी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेसाठीच्या मूळ कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे/प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्रांशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरविता येणार नाही, याची कटाक्षाने नोंद घ्यावी.

मा. उच्च न्यायलय, खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक २५३४/२०२४ व २५८५/२०२४ मध्ये दि.०७/०३/२०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरती प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवागनी दिली आहे. तसेच मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक २७५२/२०२४ मधील मा. न्यायालयाचे दिनांक ०८/०५/२०२४ च्या आदेशान्वये तसेच याचिका क्रमांक २७८४/२०२४ मधील दिनांक १२/०६/२०२४ च्या आदेशान्वये याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून उमेदवारांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश आहेत.

तसेच सदर नियुक्त्या देताना मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथील दाखल अन्य याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी. यास्तव नियुक्ती आदेशामध्ये त्याप्रमाणे नमूद करावे.

नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३/प्रक्र १७४/टीएनटी-१ दिनांक २१/०६/२०२३ मधील मुद्दा क्रमांक ७ मधील तरतुदी व इतर तरतुदी विचारात घेऊन समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी.

कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीची कार्यवाही करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र क्रमांक १४०८ दिनांक २५/०२/२०२४ मध्ये (प्रल सोबत जोडली आहे) दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून आपल्या स्तरावरील पुढील कार्यवाही तात्काळ करावी.



(सूरज मांढरे भा.प्र.से.)

आयुक्त (शिक्षण)

महाराष्ट्र राज्ये, पुणे-१


वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

रूपांतरित फेरीसाठी तक्रार निवारण अर्ज

Download


रूपांतरित फेरीसाठी तक्रार निवारण अर्ज पीडीएफ डाउनलोड.. 

Download


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


दिनांक २५/०६/२०२४


पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) -२०२२ नुसार मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकारासाठी दिनांक २५/०२/२०२४ रोजी ११,०८५ उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी आज अखेर ६,१८२ शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे.

वरील प्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त आहेत. सदर रिक्त जागा त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील कार्यवाही करण्याची परवानगी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता,

शासनाकडे सादर केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन पत्र दिनांक ०७/०६/२०२४ व १४/०६/२०२४ अन्वये माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याबाबत तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याची पुन्हा पडताळणी करून पदभरतीची कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त झाले.

माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदांबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागविली. जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती सैनिक कल्याण कार्यालयाने शासनाकडे सादर केली त्या अनुषंगाने सैनिक कल्याण विभागाच्या नियंत्रक विभागाने म्हणजेच सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक २५/०६/२०२४ रोजी माजी सैनिकांची ४८४ पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे

रूपांतरित करण्यास अनुमती दिली आहे.

तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची पडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्व-प्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात शासन पत्र दिनांक १०/०६/२०२४ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

माजी सैनिक या प्रवर्गासाठी दहा टक्के जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी विचारात घेऊन एकंदरीतच विविध प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पदभरतीची निकड लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे त्या त्या सामाजिक प्रवर्गात सर्वसाधारणमध्ये रूपांतरीत करून पदभरती करण्यात येत आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित राऊंड घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तीन आठवड्यात पूर्ण करण्यात आली.

'रूपांतरित फेरीमध्ये एकूण ५,७१४ रिक्त पदांपैकी ३.१५० पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे. रिक्त राहणाऱ्या २.५६४ पदांच्या विषयांसाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत. शिफारस होत असल्याबाबतचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे.

इयत्ता पहिली ते पाचवी या गटातील इंग्रजी माध्यम-७०२, उर्दू माध्यम-९५, हिंदी माध्यम-९१, मराठी माध्यम-७६०. कन्नड माध्यम-

९. अशी एकूण- १,६५७ रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे.

इयत्ता सहावी ते आठवी या गटातील सर्व माध्यमांची गणित-विज्ञान/ गणित/ विज्ञान- १.३८२, सामाजिक शाख ३. भाषा-९८ अशी एकूण-१,४८३ रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे.


वर्ग १ ते ५ निवड यादी मराठी माध्यम प्राथमिक शिक्षक

Download


वर्ग ६ ते ८ निवड यादी मराठी माध्यम विषय शिक्षक

Download


इयत्ता नववी ते दहावी या गटातील सर्व माध्यमांतील १० रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे. मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथील याचिका क्रमांक २५३४/२०२४ व २५८५/२०२४ मध्ये दिनांक ०७/०३/२०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तदनंतर, मा. उच्च न्यायालयात शिक्षक पदभरतीशी संबंधित याचिका दाखल आहेत. यात मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका क्रमांक २७८४/२०२४, २७५२/२०२४ व अन्य याचिका दाखल आहेत. सदरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथील दाखल याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे.

शिक्षक पद भरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरी देखील या संदर्भात अभियोग्यत्ताधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती (Grievance Redressal and Correction Committee) कडे pavitra2022grcc@gmail.com या ईमेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत उमेदवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी, संस्थांनी, संघटनांनीही या ईमेलवर मेल पाठवू नयेत, पाठविल्यास असे मेल दुर्लक्षित करण्यात येतील. याशिवाय याबाबत कोणत्याही अधिका-यांशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधू नये विहित मुदतीनंतर प्राप्त ई मेल तसेच अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणाली द्वारे होत असल्याने यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नाही त्यामुळे उमेदवारांनी याबाबत कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये.

सदरच्या पदभरती प्रक्रियेत मुलाखती शिवाय भरतीतील विविध टप्प्यांवर विविध कारणांमुळे रिक्त राहिलेली पदे, राखून ठेवलेली पदे तसेच मुलाखतीसह पदभरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे.

स्व-प्रमाणपत्रांमध्ये चुकीची/ अर्धवट / अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये झाली नसेल, अशा व अन्य उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्व-प्रमाणपत्रात योग्य त्या दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

नव्याने जाहिराती घेऊन निवडप्रक्रिया करताना स्व-प्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.

'माजी सैनिक' या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी 'माजी सैनिक' यांचेसाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.

निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे.

न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.




दिनांक २१/०६/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक २१/०६/२०२४ ची मुदत जिल्ह्यांना दिलेली होती.

त्यानुसार जिल्हांकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झाली झाली आहे. प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून, पदे त्या त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास ना हरकत पत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक २०/०६/२०२४ रोजीच्या पत्रानुसार मंत्रालयातील त्यांच्याशी संबंधित विभागाकडे सादर केला आहे.

सदर प्रस्तावास त्वरेने मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडूनही मा.अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आली आहे व त्याबाबत लवकर निर्णय अपेक्षित आहे.

रूपांतरण यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबींची तजवीज ठेवलेली आहे.

एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे.

काही मंडळी दिशाभूल करणारे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित करून अभियोग्यताधारकांमध्ये निराशेचे वातावरण तयार करीत आहेत. त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे.

बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्यावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.


दिनांक १८/०६/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


समांतर आरक्षणाबाबत शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये (समांतर आरक्षणाशिवाय) गुणवत्तेनुसार रूपांतरित करून भरण्याच्या तरतुदी आहेत, त्यानुसार कार्यवाही करण्यात येते.


माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रूपांतरित करावयाच्या जागांसाठी सैनिक कल्याण बोर्ड कडे आज दिनांक १८/०६/२०२४ रोजी आयुक्तालयातील संबंधित उपसंचालक यांनी ना हरकत प्रमाणपत्रबाबत पाठपुरावा करण्यासाठी भेट दिली आहे. तसेच आयुक्त शिक्षण यांनी देखील संचालक सैनिक कल्याण बोर्ड यांच्याशी आज चर्चा केली आहे. सैनिक कल्याण बोर्ड त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेत असून सर्व जिल्ह्यांची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक २१/०६/२०२४ ची अंतिम मुदत त्यांनी जिल्ह्यांना दिलेली आहे.


शासन पत्र दिनांक १४/०६/२०२४ नुसार उपलब्ध भूकंपग्रस्त उमेदवाराबाबत पोर्टलवरील अंतर्गत कार्यवाही तपासून पूर्ण झाली आहे.


ही रूपांतरण फेरी घेत असताना सर्व तांत्रिक बाबींची, कायदेशीर तरतुदींची पूर्तता करणे अनिवार्य असते त्यामुळे शासनाने देखील शासन स्तरावरील अन्य विभागांशी समन्वय करून या संदर्भातील आदेश दिनांक ७ जून रोजी व १४ जून रोजी निर्गमित केले आहेत. ते आदेश निर्गमित झाल्यानंतर क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाही त्या आदेशातील निर्देशांनुसार तातडीने सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात दैनंदिन पाठपुरावाही करण्यात येत आहे.


संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त होतात यादी जाहीर करण्याची कार्यवाही करण्याची तजवीज ठेवलेली आहे. बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्यावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.


दिनांक १४/०३/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


पवित्र पोर्टल द्वारे दिनांक २५.२.२०२४ रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादीसंदर्भात याचिका मा. उच्च न्यायालय मुंबई व मा. खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेल्या आहेत.

या संदर्भात मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाअंती मा. उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत. (प्राप्त दि. १२ मार्च २०२४)

न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कार्यवाही होईल.

तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जाची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळविण्यात येत आहेत.

तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यासंदर्भात नेमून दिलेल्या ई-मेल ऍड्रेस चाच वापर करावा.



 दिनांक ०७/०३/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


२०१७ च्या भरतीतील राखून ठेवलेल्या जागांच्या संदर्भात न्यायिक प्रकरण सुरू आहे. या प्रकरणात शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. या संदर्भातील वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.


तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये उचित निर्णय घेऊन संबंधिताना कळवले जातील.


प्राप्त ईमेलवर जलद कार्यवाही होण्याचे दृष्टीने पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.


• तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे विहित नमुन्यात तक्रार करण्यासाठी यापुढे pavitra2022grcc@gmail.com या ईमेल एड्रेस चा वापर करावा. या ईमेल ऍड्रेसवर विहित नमुन्यातील अर्ज व त्याला व्यवस्थित रित्या स्कॅन केलेले पुरावे जोडले असतील तर त्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करून संबंधितास कळवले जाईल या ईमेल अॅड्रेसवर अन्य कोणतेही ई-मेल पाठवू नयेत.


ज्यांनी यापूर्वी अर्ज सादर केले आहेत त्यांनी पुन्हा pavitra2022grcc@gmail.com या ई-मेल वर पाठवू नयेत, पूर्वी पाठविलेले अर्ज विचारात घेतले जात आहेत.


भरती विषयक बाबींसदर्भात अभियोग्यताधारकांनी व्यक्तिगत भ्रमणध्वनीवर कोणतेही संदेश पाठवू नयेत. त्याची दखल घेतली जाणार नाही. संपर्कासाठी केवळ वर नमूद केलेली कार्यपद्धती अनुसरावी.


पवित्र पोर्टल भरती-२०२२ चे नियमित कामकाज सुरू असून संपूर्ण भरती प्रक्रिया न्यायोचित, नियमबद्ध व पारदर्शीपणे सुरू आहे.


महत्त्वाच्या बाबींची माहिती "न्युज बुलेटीन" द्वारे यापुढे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल.






महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.