राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे कार्यालयातील दिनांक 25 मार्च 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक दोन आणि इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षा संदर्भात सुधारित सूचना पुढीलप्रमाणे.
नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) (संकलित मूल्यमापन २) व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेच्या आयोजनासंदर्भात सविस्तर सूचना देणेत आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सदर परीक्षांच्या बाबतीतील अधिक स्पष्टीकरणासाठी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत.
नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत (संकलित मूल्यमापन - २)
२. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका,
उत्तर पत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार आहेत.
३. संदर्भ क्र. २ नुसार दिनांक ०२.०४.२०२४ ते ०४.०४.२०२४ या कालावधीत संकलित मूल्यमापन २ घेण्याचे नियोजन कळविण्यात आलेले होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन - २ ही दि. ०४.०४.२०२४ ते ०६.०४.२०२४ या कालावधीमध्ये घेण्यात यावी. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे.
संकलित मूल्यमापन - २ चे वेळापत्रक
३. इयता ३ री, ४ थी, ६ वी व ७ वी या इयत्तांना प्रथम भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन -२ च्या प्रश्नपत्रिका वर्ग/विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे.
४. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील परंतु दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत.
५. संकलित मूल्यमापन २ अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्र. २ नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. इयता पाचवी व आठवीसाठी वार्षिक परीक्षाः
२. संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे इयता पाचवी व आठवी करिता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे. तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी.
४. याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेणेत यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका.
५. पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी. इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाना PAT अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित मूल्यमापन २ व शासन निर्णयानुसार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासना मार्फत घेण्यात येणारी PAT३ लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करावयाचे आहे.
(डॉ. शोभा खंदारे)
सहसंचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
श्री महेंद्र गणपुले (प्रवक्ता मुख्याध्यापक महामंडळ ) यांनी SCERT उपसंचालक तथा विभाग प्रमुख मा. डॉ. कमलादेवी आवटे यांच्याशी प्रत्यक्ष भेटीत केलेल्या चर्चेतून PAT परीक्षेसंदर्भात शंका निरसन करण्यात आले.
प्रश्न : तिसरी ते आठवीसाठी तीन विषयासाठी (प्रथम भाषा, तृतीय भाषा, गणित) PAT प्रश्नपत्रिका पुरवण्यात येतील का ?
उत्तर : होय..
एक चाचणी प्रथम सत्राच्या सुरुवातीला झाली, प्रथम सत्र परीक्षेच्या वेळी दुसरी चाचणी झाली,आता द्वितीय सत्र मध्ये तिसरी चाचणी होत आहे. तिसरी ते आठवीच्या सर्व वर्गासाठी निवडलेल्या (प्रथम भाषा- तृतीय भाषा- गणित ) प्रश्नपत्रिका पुरविल्या जाणार आहेत.
पाचवी आठवी वगळता इतर इयत्ता साठी अन्य विषय प्रश्न पत्रिका शाळा स्तरावर तयार कराव्यात.
प्रश्न: PAT चे गुण द्वितीय सत्र संकलित मूल्यमापनासाठी भरावाचे आहेत काय ?
उत्तर : होय (पाचवी व आठवी वगळून)
पाचवी व आठवी हे दोन वर्ग वगळून PAT गुण हेच संकलित मूल्यमापनाचे गुण म्हणून ग्राह्य धरण्यात येतील.
प्रश्न : पाचवी व आठवीच्या वर्गाची PAT ची परीक्षा होणार आहे का ?
उत्तर: होय
पाचवी व आठवीच्या वर्गाची PAT ची परीक्षा आहे परंतु पाचवी व आठवीलाही PAT तीन विषयाची प्रथम भाषा तृतीय भाषा गणित परीक्षा होणार आहे यांच्या प्रश्नपत्रिका शासनाकडून मिळतील.
पाचवी व आठवीसाठी दोनदा परीक्षा होतील तीन विषयाच्या पाचवी व आठवीसाठी PAT ची परीक्षा होईल आणि वार्षिक मूल्यमापनासाठी सर्व विषयाच्या (तीन विषयासह ) परीक्षा होईल म्हणजे प्रथम भाषा तृतीय भाषा व गणिताच्या परीक्षा दोनदा होतील. या दोन इयत्ता साठी PAT चे गुण वार्षिक मुल्यमापना साठी धारावयाचे नाहीत.
प्रश्न : पाचवी व आठवीसाठी निकाल पत्र फक्त द्वितीय सत्राचेच द्यावयाचे आहे काय ?
उत्तर: होय
पाचवी व आठवी साठी वार्षिक निकाल पत्र तयार करताना फक्त द्वितीय सत्राचेच संकलित गुण ग्राह्य धरले जातील. आकारिकचे मूल्यमापन करायचे आहे पण गुण द्वितीय सत्राच्या संकलित गुणांमध्ये धरले जाणार नाहीत. उत्तीर्णतेचे नवीन निकषानुसार निकाल तयार करावा निकाल पत्रकामध्ये गुण दिले जाणार असल्याने श्रेणी लिहिण्याची आवश्यकता नाही. पाचवी आणि आठवी साठी आकारिक मूल्यमापन करून नोंद करायची आहे तथापि उत्तीर्ण अनुत्तीर्ण साठी फक्त संकलित गुण विचारात घ्यावेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची दिलेल्या आदेशानुसार पुनर्परीक्षा घ्यावी. त्यातही अनुत्तीर्ण झाल्यास तो त्याच इयत्तेत राहील.
संकलन
प्रसाद गायकवाड पुणे विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ
वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments