पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. १८ फेब्रुवारी, २०२४ अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची PDF Download

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या दिनांक 6 फेब्रुवारी 2024 च्या प्रसिद्धी पत्रकानुसार पूर्व उच्च प्राथमिक म्हणजेच इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता आठवी रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी झाली होती सदर परीक्षेची अंतरीम म्हणजेच तात्पुरती उत्तर सूची परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केली आहे. 


प्रसिध्दीपत्रक

रविवार दि. १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :-

१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.

२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक ०६/०३/२०२४ ते १३/०३/२०२४ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दि. १३/०३/२०२४ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पार्टावले जाणार नाही.

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती :-

१) विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्याथ्यांचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक ०६/०३/२०२४ ते १३/०३/२०२४ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.


ठिकाण - पुणे

दिनांक - ०६/०३/२०२४


(अनुराधा ओक)

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे - ०४



इयत्ता आठवी व पाचवी स्कॉलरशिप परीक्षेच्या अंतिम उत्तर सूची पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.