Teachers Seniority Update - शिक्षक सेवाजेष्ठतेबाबत शिक्षण संचालक यांचे अधिकचे महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण परिपत्रक

 शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिनांक 27 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम 1977 महाराष्ट्र शाळांची कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील अनुसूचित परीक्षेत दोन मध्ये केलेल्या दुरुस्तीबाबत आणखी स्पष्टता होणे बाबत पुढील प्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे.


संदर्भ : १) महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, दि. २५ मार्च २०२३, असाधारण क्रमांक ९९, शालेय शिक्षण विभाग, दि. २४ मार्च २०२३ अन्वये प्रसिद्ध केलेली अधिसूचना.

२) या कार्यालयाचे परिपत्रक क्र.१८४७, दि.१३.४.२०२३ व क्र.४४३०, दि.२९.८.२०२३.

३) शासन पत्र क्र.संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३९/टिएनटी-१, दि.१.२.२०२४.

४) संचालनालयाचे क्र.१३२०, दि.१२.३.२०२४ चे परिपत्रक.


५) शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांचे ना.क्र. सिउर्स/को/मावि-३/२०२४/२६६५, दि.२०.३.२०२४. ६) शिक्षण उपसंचालक, नागपूर यांचे जा.क्र.सिउर्स/माध्य-अ/२२६७/२०२४, दि.२१.३.२०२४.

प्रस्तुत प्रकरणी संचालनालयाचे संदर्भीय पत्र क्र.४ संबंधी आणखी स्पष्टता होणे आवश्यक असलेबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर व विभागीय शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी संचालनालयास विनंती केली आहे.

२/- शासन अधिसूचना दि.२४.३.२०२३ अन्वये महाराष्ट्र खाजगी शाळांतील (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील अनुसूची फ, परिच्छेद २ मध्ये बदल करण्यात आलेला आहे. सदरील अधिसूचने संबंधी संदर्भीय पत्र क्र.२ अन्वये विस्तृत सूचना अधिनस्त कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. तथापि संदभीय पत्र क्र.५ व ६ च्या अनुषंगाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र शासन राजपत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दि.२४.३.२०२३ मधील तरतूदी (टीपा व तळटीपांसह) व मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल याचिका क्र.११२४३/२०२३ मधील दि.१८.१.२०२४ रोजीच्या अंतरिम आदेशानुसार शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी.

तुलभ संदर्भाकरिता शासन राजपत्र दि. २४.३.२०२३ ची प्रत व मा. उच्च न्यायालयाचा दि.१८.१.२०२४ रोजीचा अंतरिम आदेश सोबत संलग्न करण्यात येत आहे.


संपत सुर्यवंशी 

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-१.


प्रत : मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१. प्रत : श्री द.छ.शिंदे, कक्ष अधिकारी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांना शासनाचे संदर्भ क्र.४ वरील पत्रास अनुसरुन माहितीस्तव अग्रेषित



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

4 Comments

  1. ह्या संदर्भात 12.03.24 चे पत्र असल्यास ते पण चॅनल वर महितिस्तव द्यावे. धन्यवाद

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.