आर्थिक वर्ष २०२४-२५ करीता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा अनुज्ञेय खर्च भागविण्यासाठी सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. थकीत वीज देयक, किशोर तसेच जीवन शिक्षण मासिक अंक पुरवठयापोटी देय रक्कम अदा करण्यासाठी अनुदान बाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.
प्रस्तावना:-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळासाठी भौतिक, शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षाच्या वेतन खर्चाच्या ४ टक्केपर्यंत सादिलवार खर्च करण्यास संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच, सादिलवार खर्च करावयाच्या अनुज्ञेय बाबींच्या यादीमध्ये संदर्भ क्र. (२) व (३) येथील शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे.
२. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या माहे जुलै, २०२४ पर्यतच्या कालावधीतील थकीत वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठी, किशोर मासिक अंक पुरवठ्याबाबत माहे एप्रिल, २०२४ ते माहे जून, २०२४ या कालावधीतील देय रक्कम तसेच, जीवन शिक्षण मासिक अंक पुरवठ्याबाबत सन २०२४-२५ या कालावधीतील देय रक्कम अदा करण्यासाठी सादिल अनुदान वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:-
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १६ जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या माहे जुलै, २०२४ पर्यंतच्या कालावधीतील थकीत वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठी रु.११,११,००,०००/- (रुपये अकरा कोटी अकरा लाख फक्त इतका निधी "महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांना मंजूर व अदा करण्यासाठी आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सुपूर्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
तसेच, जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमध्ये दिनांक ०१.०४.२०२४ ते दिनांक ३०.०६.२०२४ या कालावधीत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांचेकडून किशोर मासिकाचा पुरवठा करण्यात आला आहे. या कालावधीतील किशोर मासिकाची देय रक्कम रु.१२,३३,१२०/- (रुपये बारा लाख तेहतीस हजार एकशे वीस फक्त) इतकी असून सदर रक्कम "महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांना मंजूर व अदा करण्यासाठी आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
तसेच, सन २०२४-२५ या वर्षासाठी जीवन शिक्षण मासिक अंकांचा पुरवठा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या कालावधीतील जीवन प्रकाश मासिकाची देय रक्कम रु. ६०,१३.९६३/- (रुपये साठ लाख तेरा हजार नऊशे त्रेसष्ट फक्त) इतकी असून सदर रक्कम "राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे" यांना मंजूर व अदा करण्यासाठी आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
वरील बाबींचे देयक कोषागारात सादर करण्यास "शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे" यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
२. सदर निधी ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आला आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्ची टाकण्यात यावा. तसेच, सदर निधी वितरीत करण्यापूर्वी संबंधितांकडून वितरीत केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करावीत. शक्यतो यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरीत करण्यात येऊ नये.
३. उपरोक्त बाबीवर होणारा खर्च आर्थिक वर्ष २०२४-२५ करीता "मागणी क्र. ई-२, २२०२- सर्वसाधारण शिक्षण-०१-प्राथमिक शिक्षण १९६, जिल्हा परिषदांना सहाय्य (०१) प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांना सहाय्य (०१) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८२ अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने (२२०२-०१७३) ३१. सहायक अनुदान (वेतनेतर)" या लेखाशिर्षाखाली मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.
४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.११८१/व्यय-५. दिनांक २३ ऑक्टोंबर, २०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४११२८१२१२०५५४२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(डॉ. स्मिता देसाई)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 21 मार्च 2024 रोजी आर्थिक वर्ष सन 2023 24 करिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा अनुज्ञेय खर्च भागविण्यासाठी सादिल अनुदान मंजूर व वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत तसेच अनुदान निर्धारण पूर्ण झालेल्या शाळांना अनुदान तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांसाठी भाड्याने घेतलेल्या जागेचे भाडे अदा करण्यासाठी अनुदान वितरित करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
वाचा :- १) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. पीआई-१०९४/७०४ (दोन)/प्राशि-१, दिनांक १४ नोव्हेंबर, १९९४.
(२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. उमाशा-२०२०/प्र.क्र.१३/ एसएम-४, दिनांक ०४ जून, २०२०.
(३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. उमाशा-२०२०/प्र.क्र.१३/ एसएम-४, दिनांक २९ नोव्हेंबर, २०२१
(४) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्र. अर्थसं २०२३/प्र.क्र.४०/अर्थ-३, दिनांक १२ एप्रिल, २०२३
(५) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, समक्रमांक, दिनांक २२ नोव्हेंबर, २०२३, दिनांक २३ जानेवारी, २०२४ व दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४
प्रस्तावना:-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळासाठी भौतिक, शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षाच्या वेतन खर्चाच्या ४ टक्केपर्यंत सादिलवार खर्च करण्यास संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच, सादिलवार खर्च करावयाच्या अनुज्ञेय बाबींच्या यादीमध्ये संदर्भ क्र. (२) व (३) येथील शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आली आहे.
२. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरीता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांच्या माहे मार्च-२०२३ ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीतील थकीत वीज देयकाची रक्कम भागविण्यासाठी संदर्भ क्र. (५) येथील दिनांक २२ नोव्हेंबर, २०२३ च्या शासन निर्णयानुसार रु.६,७८,७३,३३३/- इतकी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. तसेच, दिनाक २३ जानेवारी, २०२४ च्या शासन निर्णयानुसार किशोर मासिकाची एप्रिल, २०१९ ते मार्च, २०२३ (करोना कालावधीतील अंक पुरविण्यात न आलेला कालावधी वगळून) रु.१,७२,६३,८८५/- इतकी रक्कम वितरीत करण्यात आलेली आहे. तसेच संदर्भ क्र. (५) येथील दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ च्या शासन निर्णयानुसार वीज देयकाची थकबाकी अदा करण्यासाठी रु. ११,०३,००,०००/- व अनुदानाचे निर्धारण पूर्ण झालेल्या जिल्हा परिषदांना सादिल अनुदान वितरीत करण्यासाठी रु.१, ६७,६८,०००/- इतकी रक्कम वितरीत करण्यात आलेली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या सुधारीत अंदाजाच्या मर्यादेत आता (१) अनुदानाचे निर्धारण पूर्ण झालेल्या जिल्हा परिषदांना सादिल अनुदान अदा करण्यासाठी व (२) जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांसाठी भाड्याने घेतलेल्या जागेचे थकीत भाडे अदा करण्यासाठी अनुदान वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय -:
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात अनुदानाचे निर्धारण पूर्ण केलेल्या ठाणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, सांगली, नाशिक व धुळे या जिल्हा परिषदांना संदर्भ क्र. (२) व (३) येथील शासन निर्णयान्वये अनुज्ञेय केलेल्या बाबींवरील खर्च भागविण्यासाठी रु. ८,५५,६५,७८२/- (रुपये आठ कोटी पंचावण्ण लक्ष पासष्ट हजार सातशे ब्याऐंशी फक्त) इतका निधी संबंधितांना वितरीत करण्यासाठी आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सुपूर्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
तसेच, जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांसाठी भाडयाने घेतलेल्या जागेचे थकीत भाडे अदा करण्यासाठी रु.१,३३,१७,०००/- (रुपये एक कोटी तेहतीस लक्ष सतरा हजार फक्त) इतका निधी संबंधितांना वितरीत करण्यासाठी आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या सुपूर्द करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
वरील बाबींचे देयक कोषागारात सादर करण्यास "शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे" यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
२. सदर निधी ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आला आहे, त्याच प्रयोजनासाठी खर्ची टाकण्यात यावा. तसेच, सदर निधी वितरीत करण्यापूर्वी संबंधितांकडून वितरीत केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करावीत. शक्यतो यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरीत करण्यात येऊ नये.
३. उपरोक्त बाबीवर होणारा खर्च आर्थिक वर्ष २०२३-२४ करीता "मागणी क्र. ई-२, २२०२- सर्वसाधारण शिक्षण-०१-प्राथमिक शिक्षण १९६, जिल्हा परिषदांना सहाय्य (०१) प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांना सहाय्य (०१) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८२ अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने (२२०२-०१७३)
३), सहायक अनुदान (वेतनेतर)" या लेखाशिर्षाखाली सुधारीत अंदाजानुसार मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.
४). सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३८४/व्यय-५, दिनांक १९ मार्च, २०२४ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०३२११७४३२३४८२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(प्रमोद कदम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन
वरील संपूर्ण शासनादेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments