रंगोत्सव व समृद्धी स्पर्धा संदर्भात ऑनलाईन मार्गदर्शन सत्र (मुख्याध्यापक, शिक्षक,केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती यांचेसाठी you tube link)

रंगोत्सव व समृद्धी स्पर्धा संदर्भात ऑनलाईन मार्गदर्शन सत्र

( मुख्याध्यापक , शिक्षक,केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती यांचेसाठी you tube  link)


प्रति,

1. उपसंचालक,प्रादेशिक विद्याप्राधिकरण,अमरावती,छत्रपती संभाजी नगर ,मुंबई,नाशिक,नागपूर. 

2. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

3. शिक्षण प्रमुख मनपा (सर्व)

4. प्रशासन अधिकारी ( सर्व मनपा)

5. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक  ),जि. प. (सर्व)

6. शिक्षण निरीक्षक (पश्चिम,दक्षिण व उत्तर ) मुंबई.

7. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व).

7. प्रशासन अधिकारी ( न.पा ) (सर्व).


           विषय : - प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम (सन २०2४-2५) आयोजनाच्या अनुषंगाने आयोजित 

 ऑनलाईन मार्गदर्शन सत्रास उपस्थित राहणे बाबत...

      *संदर्भ* :  १. मा. राज्य प्रकल्पसंचालक,म.प्रा.शि.प.,मुंबई यांचे निधी मान्यतेचे कार्यालयीनआदेश जा.क्र. मप्राशिप/सशि/लेखा/Rangotsav/ELE-REC/SCERT/२०२४-२५/२676 , दि.06 /०९/२०२४.  

 २. मा.संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे यांचे पत्र                  जा.क्र.मराशैसंप्रप/कलाक्रीडा/रंगोत्सव-समृद्धीप्रस्ताव/२०२४-२५/०५६६१,              दि.०३/१२/२०२४.

 ३. मा.संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र,पुणे यांचे पत्र                  जा.क्र.मराशैसंप्रप/कलाक्रीडा/रंगोत्सव,समृद्धी/२०२४-२५/०५६६२           दि.०३/१२/२०२४.


                             उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार, शाळांतील इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या विद्यार्थी/शिक्षकांसाठी राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रम  आयोजित करण्यात येत आहे. सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या शाळांसाठी खूला आहे.  तसेच समृद्धी कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी च्या शाळांसाठी खूला आहे. 

       उपरोक्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी,केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती,मुख्याध्यापक, शिक्षक यांना सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्रात सविस्तर माहिती दिली जाणार आहे.  सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्र यु- ट्युब  वर लाईव स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे.  सदर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता करण्यात  आले आहे.  


 सदर मार्गदर्शन सत्राची you tube लिंक पुढील प्रमाणे -


https://youtube.com/live/mA8yZI3X1cE?feature=share


       तदनुषंगाने शिक्षक , मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती यांना वरील लिंक द्वारे युट्युब वर live प्रक्षेपण पाहण्यासाठी join होणे बाबत आदेशित करण्यात यावे . 


संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, 

महाराष्ट्र, पुणे



प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम (सन २०२४-२५) आयोजनाच्या अनुषंगाने ऑनलाईन मिटिंगला उपस्थित राहणे बाबत  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयातून दिनांक 16 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित आदेशानुसार पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.




संदर्भ: १. मा. राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई यांचे निधी मान्यतेचे कार्यालयीन आदेश जा.क्र. मप्राशिप/सशि/लेखा/Rangotsav/ELE-REC/SCERT/२०२४- २५/२६७६, दि.०६/०९/२०२४.

२. GOI, MOE, Dept. Of School Education & Literacy, Samagra Shiksha PAB Minutes F.No.१०-१/२०२४-IS.१, Dated ५ March २०२४.

३. मा. राष्ट्रीय समन्वयक, कला उत्सव व समृद्धी कार्यक्रम, NCERT NEW DELHI, यांचे पत्र जा.क्र. F.No.१०-१/DEAA/SAMRIDDHI/१८६५, दि. २१ नोव्हेंबर २०२४.

४. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा.क्र. मराशैसंप्रप/कलाक्रीडा/रंगोत्सव-समृद्धीप्रस्ताव/२०२४-२५/०५६० दि.०३/१२/२०२४.

५. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा.क्र. मराशैसंप्रप/कलाक्रीडा/रंगोत्सव, समृद्धी/२०२४-२५/०५६६२, दि.०३/१२/२०२४.


उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार, शाळांतील इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या विद्यार्थी/शिक्षकांसाठी राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनुभवात्मक शिक्षणाच्या द्वारे (Experiential Learning) शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा,

स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या शाळांसाठी खुला आहे. तसेच समृद्धी कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी च्या शाळांसाठी खुला आहे.

उपरोक्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी, शिक्षक यांना सदर ऑनलाईन मिटिंग द्वारे सविस्तर माहिती दिली जाणार आहे. शिवाय माहितीचे सत्र यु ट्युब वर लाईव स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन मिटिंगचे आयोजन दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता करण्यात आले आहे. सदर ऑनलाईन मिटिंगची (Zoom meeting) लिंक पुढील प्रमाणे आहे https://zoom.us/i/94302998651 (Meeting ID 94302998651, Pass Code-675140) या लिंक वर क्षेत्रीय अधिकारी यांनी जॉईन व्हावे. तसेच यु ट्युब द्वारे लाईय स्ट्रीमिंगला मुख्याध्यापक (प्राथमिक/माध्यमिक) व शिक्षक (प्राथमिक/माध्यमिक) यांनी जॉईन व्हावे. सदर यु ट्युब द्वारे लाईव स्ट्रीमिंगची लिंक पुढील प्रमाणे 

https://youtube.com/live/mA8yZ13X1cE?feature=share आहे.

तरी उपरोक्त ऑनलाईन मिटिंगला आपण स्वतः उपस्थित राहावे व आपल्या अधिनस्त सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक (प्राथमिक/माध्यमिक) यांना सदर ऑनलाईन मिटिंगला उपस्थित राहणेबाबत आपलेस्तरावरून आदेशित करण्यात यावे.


16.12.24 (डॉ. माधुरी सावरकर)

 उपसंचालक

कला व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०



प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी रंगोत्सव कार्यक्रम व माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समृद्धी कार्यक्रम (सन २०२४-२५) आयोजन करणे बाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

शाळांतील इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या विद्यार्थी/शिक्षकांसाठी राज्यस्तर रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनुभवात्मक शिक्षणाच्या द्वारे (Experiential Learning) शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा, स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या शाळांसाठी खुला आहे. 




तसेच समृद्धी कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी च्या शाळांसाठी खुला आहे.

तदनुषंगाने रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत अनुभवात्मक अध्ययन (Experiential Learning) आधारित उत्कृष्ट कृती राज्यस्तरावर सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थी व शिक्षकांना प्राप्त होणार आहे. शाळांनी Arts Integration, Sports Integration, Toy Based Pedagogy, व Story Telling या चार मुद्द्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांनाचे विविध उत्कृष्ट कृर्तीचा समावेश असलेले व्हिडीओची लिंक व आवश्यक माहिती 

https://forms.gle/nPyWRFzD9sBKpWRC

 या लिंकमध्ये भरून पाठविणे आवश्यक आहे. तसेच तयार केलेल्या व्हिडीओबी लिंक दिलेल्या गुगल फॉर्मवर

https://forms.gle/nPyWRFzDqsBKpWBC

पेस्ट करावयाचे आहे.

तसेच माध्यमिक स्तरावर समृद्धी स्पर्धा हा राष्ट्रीय स्तरावरील कला उत्सव कार्यक्रमचाच विस्तारीत कार्यक्रम आहे की जो राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने सन २०२४-२५ मध्ये प्रथमच आयोजित केला आहे. या अंतर्गत शिक्षकांना माध्यमिक स्तरावरील (इयत्ता नववी ते बारावी) अभ्यासक्रमाच्या क्षेत्रांवर सर्वोत्तम कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धती (best art integrated pedagogical practices) यावर आधारित सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृतींच्या सादरीकरणाची संधी मिळते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP- २०२०) आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-२०२३) या नुसार अभ्यासक्रमीय अध्ययनामध्ये कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणाऱ्या शिक्षकांचे योगदान ओळखणे आणि प्रोत्साहित करणे हा आहे.

कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीची ठळक वैशिष्ट्ये -

१. वर्गातील उपक्रम, कृती यांचा थेट संबंध अध्ययनाशी असला पाहिजे.

२. अध्ययन अनुभवांमध्ये आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन असावा ज्याद्वारे एका अध्ययन अनुभवाचा सहसंबंध दुसऱ्या अध्ययन अनुभवाशी सहज जोडता येईल.

३. अध्ययन अनुभवांमध्ये चिकित्सक विचार व २१ व्या शतकातील कौशल्ये याचाही विचार असावा.

४. अभ्यासक्रमीय ध्येये साध्य करण्यासाठी अध्यापनात स्वदेशी हस्तकला, कला, खेळणी आणि स्थानिक संसाधने यांचे एकीकरण करून अध्ययन अनुभव दिले पाहिजे.

५. सुलभक विविध सर्जनशील अध्यापनशास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यासाठी विविध वर्ग एकत्र करून व वर्गात विविध संघ तयार करून विविध अध्ययन अनुभवांची योजना करू शकतात.

६. सुलभक आनंददायी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार करण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रवृत्त करू शकतात.

७. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये कलेचा उत्पादन म्हणून नव्हे तर अध्ययनाची एक प्रक्रिया म्हणून विचार केला जावा.

८. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये सर्वसमावेशक शिक्षणासाठी वातावरण तयार करणे अपेक्षित आहे.

९. वर्गातील विविध अध्ययन अनुभव, कृती व उपक्रमांमध्ये स्थानिक संसाधनांच्या वापरास प्रोत्साहन दिले पाहिजे.

१०. कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीनुसार विद्यार्थ्यांमध्ये एकात्मिक कला प्रकार आणि शिकवले जाणारे विषय किंवा संकल्पना या दोन्हीमध्ये अध्ययन उद्दिष्टांची संपादणूक झाली असली पाहिजे,

समृद्धी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची पात्रताः-

१. शासकीय, शासकीय अनुदानित किंवा केंद्रीय अथवा राज्य बोर्डाची संलग्न अशा कोणत्याही खाजगी शाळेतील इयत्ता नववी ते बारावी या इयत्ताना अध्यापन करणारे शिक्षक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

२. अन्य शासकीय संस्थांचे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा उदाहरणार्थ तिबेटियन शाळा व्यवस्थापन, NCERT, Railways schools, KGBV किंवा Cantonment Board Schools सदर समृद्धी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

३. समृद्धी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शिक्षकांना किमान दोन वर्षाचा अनुभव असला पाहिजे.

माध्यमिक स्तरावर समृद्धी कार्यक्रमासाठी कला एकात्मिक अध्यापनशास्त्रीय पद्धतीमध्ये शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांनाचे विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओची ड्राईव लिंक व आवश्यक माहिती 

 https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQ8

या लिंकमध्ये भरून पाठविणे आवश्यक आहे. तसेच तयार केलेल्या व्हिडीओची लिंक दिलेल्या गुगल फॉर्मवर https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQ8 पेस्ट करावयाचे आहे.

रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासंदर्भात करावयाची कार्यवाही :-

सदर रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमाच्या सूचना शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक, शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर मुंबई यांनी आपले कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना निर्गमित करावेत. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत सादरीकरणाच्या व्हिडीओची गुगल ड्राईव वरील लिंक, https://forms.gle/nPiyWRFzD9sBKpWB८ या गुगल लिंकवर पेस्ट करणे आवश्यक आहे, तसेच आवश्यक माहिती सदर लिंक वर भरणे बाबतही शाळांना सूचित करावे. तसेच समृद्धी कार्यक्रमासाठी २० मिनिटांचा व्हिडीओ व पाठाचा ५०० शब्दांच्या मर्यादेत प्रकल्प आराखडा https://forms.gle/BLXY23hUQW3uirNQ8 या गुगल लिंक वर अपलोड करावा, तसेच समृद्धी कार्यक्रमाची माहिती ही या https://forms.gle/BLXY23hUQW3uirNO8 

लिंकवर भरावी, असेही आपल्या कार्य क्षेत्रातील शाळा व शिक्षक यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांनी सूचित करावे. सदर प्रकल्प आराखडा NCERT, नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार केवळ हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये अपलोड करायचा आहे. रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम मुदत दि.२९ डिसेंबर २०२४ सायंकाळी ठीक ६.०० वाजे पर्यंत असेल, हे सुद्धा सूचित करण्यात यावे. तथापि सदर कार्यक्रमांत सहभाग घेणाऱ्या शिक्षकांनी सादर केलेल्या व्हिडीओला अक्सेस देणे आवश्यक आहे, असेही आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे.

उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांचे मार्फत रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमाच्या सूचना शालेय स्तरावर निर्गमित होत असल्याची खातरजमा करावी. तसेच उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्राचार्य डायट यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई व गट साधन केंद्र यांचा आढावा रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रम संदर्भात घ्यावा.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना राज्यस्तरावरून रंगोत्सव व समृद्धी उपक्रमाच्या प्राप्त व्हिडीओ जिल्हानिहाय वर्गीकरण करून पाठविण्यात येतील. जिल्हास्तरावर जिल्हानिहाय प्राप्त व्हिडीओचे आपले अधिकारी यांचे मार्फत अथवा अन्य शिक्षणतज्ज्ञ परीक्षक यांचे मार्फत परीक्षण करून रंगोत्सव कार्यक्रमाचे ०५ उत्कृष्ट अध्ययन कृतींचा व समृद्धी कार्यक्रमाच्या ०३ उत्कृष्ट अध्ययन कृर्तीचा समावेश असलेल्या व्हिडीओची लिंक आपल्या विभागातील RAA/ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना पाठवावेत.

तद्नंतर राज्यातील प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावती, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर, लातूर, नाशिक, पुणे यांना सदर रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमांतर्गत प्राप्त व्हिडीओचे विभागस्तरावर जि.शि.व प्र.सं मधील वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्यात यांचे मार्फत किंवा आवश्यक असल्यास परीक्षक नियुक्त करून परीक्षण करावयाचे आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी रंगोत्सव कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागातून ०३ उत्कृष्ट विद्यार्थी व शिक्षक यांचे संघ आणि समृद्धी कार्यक्रमासाठी प्रत्येक विभागातून एक उत्कृष्ट संघ अशी नामनिर्देशने परिषदेतील कला व क्रीडा विभागाच्या arts.sportsdept@maa.ac.in या ई मेल आय डी वर दि. ०३/०१/२०२५ पर्यंत पाठवावयाचे आहेत.

राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (SCERTM) येथे रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत आठ विभागाकडून प्राप्त २४ उत्तम अध्ययन कृतींच्या शिक्षक व विद्यार्थी यांच्या संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल. तसेच राज्यस्तरावर SCERTM येथे समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरावर आत विभागाकडून प्राप्त ०८ उत्तम अध्ययन कृतींच्या शिक्षक संघांना सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात येईल.

जिल्हास्तरावर व विभागस्तरावर व्हिडीओचे परीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या परीक्षक यांचे मानधन, प्रवास भत्ता व अल्पोपहार सेवापूर्व विभाग, प्रस्तुत कार्यालय मार्फत Teacher Education Annual Grant मधून वितरीत केलेल्या आर्थिक तरतुदीमधून करण्यात यावा. या बाबत मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार.

रंगोत्सव व समृद्धी राज्यस्तरावरील कार्यक्रमचे आयोजन दि.११ व दि.१२ जानेवारी २०२५ या कालावधीत करण्यात येईल. रंगोत्सव कार्यक्रम राज्यस्तरापर्यंतच मर्यादित आहे. तथापि समृद्धी कार्यक्रमांतर्गत राज्य स्तरावरील सादरीकरण करणाऱ्या उत्कृष्ट एका संघास राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नामनिर्देशित केले जाईल.

राज्यस्तरावर रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमांतर्गत सादरीकरणासाठी उपस्थित राहणाऱ्या संघांना / विद्यार्थी व शिक्षक यांना प्रवासभत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येईल.

उपरोक्त सविस्तर माहिती आपल्या अधिनस्त सर्व कार्यालये व शाळांना देण्यात यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील याची दक्षता घेण्यात यावी.

रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व्हिडीओ राज्यस्तरावरून दिलेल्या लिंकवर पेस्ट करणे संबंधित मार्गदर्शक सूचना व अनुषंगिक प्रपत्रे सोबत जोडले आहेत त्याचे अवलोकन करून, त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी या संदर्भात सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचे सनियंत्रण करावे, पाठपुरावा करावा. या संदर्भात अधिक माहितीसाठी रंगोत्सव व समृद्धी कार्यक्रमाच्या सोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करण्यात यावे.

सोबत :- १. रंगोत्सव कार्यक्रम मार्गदर्शक सूचना व जिल्हास्तर, विभागस्तर मूल्यमापन तक्ता. २. समृद्धी कार्यक्रम मार्गदर्शक सूचना (मराठी, हिंदी, इंग्रजी) व जिल्हास्तर, विभागस्तर मूल्यमापन तक्ता. ३. समृद्धी कार्यक्रमासाठी सदर करावयाचा पाठचा प्रकल्प आराखडा नमुना (इंग्रजी, हिंदी)


(मा. संचालकांच्या मान्यतेनुसार)

(डॉ. माधुरी सावरकर)

 उपसंचालक

कला व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे-३०

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


अ). रंगोत्सव :- मार्गदर्शक सूचना-२०२४-२५

सर्वसाधारण सूचना -

१. एका शाळेतून एका वेळी एकच संघ सहभागी होऊ शकेल.

२. इयत्ता ३री ते ८वी चे विद्यार्थी सहभागी होतील.

३. एका संघामध्ये ०६ ते ०८ विद्यार्थी व २ शिक्षक (१ पुरुष व १ महिला) यांचा समावेश असेल.

४. संघ हा पूर्ण मुलांचा/मुलींचा किंवा मुलामुलींचा एकत्र असा असेल.

५. मोबाईलवर चित्रण केलेला व्हिडीओ चालेल.

६. सादरीकरण कालावधी ५ मिनिटाचा राहील.

७. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात सदर कार्यक्रमात राज्यस्तरावर सहभाग घेतलेल्या शाळा व संबंधित शिक्षक यांना सहभाग घेता येणार नाही.

८. सादरीकरण करण्यात येणाऱ्या व्हिडीओचे या पूर्वी राज्यस्तरावर सादरीकरण झालेले नसावे.

९. खालील विषयावर व्हिडीओ पाठविण्यात यावे..

i..Arts integration.

ii. Sports integration.

iii. Toy Based Pedagogy.

iv. Story Telling


या सर्व विषयांनुसार शिक्षकांनी आपल्या कोणत्याही अध्यापन विषयानुसार वर्गात अध्यापन करतांनाचा ५ मिनिटांचा व्हिडीओ व सदर व्हिडीओची गुगल लिंक या लिंक https://forms.gle/nPiyWRFzD1sBKpWR8 वर पेस्ट करावी.

१०. शिक्षक वर्गात अध्यापन करत असताना सर्व समावेशक अध्ययन अध्यापन कृती, त्याला विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त व शाब्दिक प्रतिसाद आदि बाबींचा समावेश वर्ग अध्यापनात असावा व त्याचे चत्रीकरण करून सदर व्हिडीओची गुगल लिंक या 

https://forms.gle/nPiyWRFzD1sBKpWR8 

गुगल फॉर्म वर पेस्ट करावी. तसेच व्हिडीओचा एक्सेस (access) प्रस्तुत विभागाला देण्यात यावा.


व्हिडीओंसंबंधी निकष :-

१) व्हिडीओ आडवा मोबाईल धरून शूट केलेला असावा.

२) उपरोक्त पैकी कोणत्याही ही एका विषयावर व्हिडीओशूट केलेला असावा.

३) व्हिडीओचा दर्जा उत्तम असावा.

४) व्हिडीओ पाठवतांना सदरील व्हिडिओची google drive लिंक पाठवावी.

५) व्हिडीओ मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेतील असावा.


ब). समृद्धी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक सूचना

१. समृद्धी कार्यक्रमात दोन शिक्षकांचा एक गट सहभागी होऊ शकतो. यामध्ये एक शिक्षक माध्यमिक स्तरावर इयत्ता ९ वी ते १२ वी या इयत्तांना अध्यापन करणारे असावेत आणि दुसरे शिक्षक दृश्य कला, संगीत, नृत्य, नाट्य शिक्षक यांना अध्यापन करणारे असावेत.

२. समृद्धी कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या शिक्षकांना कोणत्याही शाखेतील इयत्ता नववी ते बारावीतील विज्ञान, भाषा, गणित, मानव्यविद्या किंवा अन्य अभ्यासक्रमातील अन्य कोणत्याही विषयावर पाठाचा प्रकल्प आराखडा अगोदर सादर करावा लागेल. सदर पाठाचा प्रकल्प आराखडा तयार करताना कोणत्याही ललित कला प्रकारांचा एकात्मिकपणे वापर केला जावा. तसेच सदर प्रकल्प आराखडा कलात्मक अभिव्यक्तीच्या सौंदर्यशास्त्राशीही एकात्म असावा. प्रकल्प आराखडा संदर्भात सोबत जोडलेल्या व NCERT नवी दिल्ली यांच्यावतीने निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करण्यात यावे. सदर मार्गदर्शक सूचनांमध्ये प्रकल्प आराखडा संदर्भात नमुना ही दिला आहे त्याचे अवलोकन व्हावे. शिवाय पत्रासोबत तो स्वतंत्र ही जोडला आहे.

३. सदर प्रकल्प आराखडा हा वर्गातील अध्ययन अध्यापन कृती (classroom practice यांच्याशी संबंधित असावा. सदर प्रकल्प आराखडा सादर करताना शाळेचा शिक्का व मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असलेले प्रमाणपत्र ही सोबत जोडावे.

४. दृश्यकला, संगीत, नृत्य, नाट्य या कलांचाही सादरीकरणांमध्ये एकात्मिक वापर केला जावा.

५. सादरीकरणात माहिती व तंत्रज्ञानाचा (ICT) वापर करता येईल.

६. सदर प्रकल्प आराखड्याचा write up किमान ५०० शब्दांच्या मर्यादेत असावा. सदर आराखड्यामध्ये अध्ययन अध्यापन कृतींची संपूर्ण प्रक्रिया व सदर सादरीकरणातील ठळक बाबी अधोरेखित केलेले असाव्यात. तसेच सदर आराखड्यामध्ये अध्ययन अध्यापनातील कृतींची छायाचित्रे व व्हिडिओच्या ड्राईव्ह लिंक्स सुद्धा नमूद करता येतील. सदर संशोधन आराखडा सादर करताना इंग्रजी भाषेतील Times New Roman या फॉन्टचा वापर केला जावा. Font size १२ असावी.

६. सदर प्रकल्प आराखड्याचे व सादरीकरणाचे माध्यम हिंदी किंवा इंग्रजी भाषा असेल.

७. सादरीकरणांमध्ये जे अध्ययन अध्यापन साहित्य वापरले जाणार आहे त्याचा उल्लेख सदर प्रकल्प आराखड्यामध्ये असला पाहिजे.

८. विद्यार्थी सहभागाचा स्तर सुद्धा स्पष्टपणे नमूद करण्यात यावा.

९. राष्ट्रीय स्तरावर सादरीकरणासाठी वीस मिनिटांचा कालावधी व परीक्षकांशी प्रश्नोत्तरासाठी पाच मिनिटांचा कालावधी असेल असा एकूण २५ मिनिटाचा कालावधी असेल.

१०. राष्ट्रीय स्तरावरील समृद्धी स्पर्धेच्या पूर्वी किमान पंधरा दिवस आधी राज्य नोडल अधिकारी यांनी राष्ट्रीय नोडल अधिकारी यांना राज्यस्तरावर समृद्धी स्पर्धेत पात्र सर्व नामनिर्देशने प्रमाणित करून प्रकल्प आराखडे सादर करावे.

११. समृद्धी कार्यक्रमाची संबंधित सर्व मार्गदर्शक सूचना, परिपत्रके, विविध फॉर्मस कला उत्सव च्या kalautsav.ncert.gov.in. या कार्यालयीन संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत केले जातील. त्याचे वेळोवेळी अवलोकन व्हावे. पारितोषिक :-

१. राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघास २५००० रुपये, द्वितीय क्रमांकाच्या संघास २०००० रुपये, तृतीय क्रमांकाच्या संघास १५००० रुपये पुरस्कार स्वरुपात देऊन सन्मानित करण्यात येईल. सदर पुरस्कार रक्कम विजेत्या संघातील दोन्हीं सदस्यास समानतेने विभागून देण्यात येईल. सदर रक्कम विजेत्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

रंगोत्सव व समृद्धी मार्गदर्शक सूचना व गुणदान प्रपत्र pdf 

Download


 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम २०२३-२४ आयोजन करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे. 


रंगोत्सव कार्यक्रमात, सादरीकरण करण्याच्या दृष्टीने शाळांतील इयत्ता ३री ते इयत्ता ८वी च्या विद्यार्थ्यांसाठी/शिक्षकांसाठी राज्यस्तरावरील रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. अनुभवात्मक शिक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग, स्वयं-पुढाकार, स्वयं-दिशा, स्वयं-शिस्त, संघ भावना, जबाबदारी, एकता व देशाभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे, विविध शारीरिक कृती, साहस आणि प्रेरणा यांचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे, तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी खुला आहे. रंगोत्सव कार्यक्रमांतर्गत शाळांनी Arts Integration, Sports Integration, Toy Based Pedagogy, व Story Telling या चार मुद्द्यांच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन-अध्यापन करतांना विविध उत्कृष्ट कृतींचा समावेश असलेले व्हिडीओ

 https://forms.gle/xHJA1X9TbBpbV3Ji6 या लिंकमध्ये माहिती भरून अपलोड करावयाचे आहेत.

राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई आणि प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांनी आपल्या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी (प्राथ.) व शिक्षण निरीक्षक (पश्चिम, दक्षिण व उत्तर) मुंबई यांचे सहकार्याने सर्व शाळांना याबाबतचे परिपत्रक काढून परिषदेकडील पत्रात दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आणि व्हिडीओची लिंक पेस्ट करणे याबाबत सूचित करावयाचे आहे. दि. ७ मार्च २०२४ ही जिल्ह्यातून नोंदणी पाठविण्याची अंतिम तारीख आहे. आपल्या जिल्ह्यांतील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार उपरोक्त लिंकमध्ये माहिती भरून वरील ४ प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या एक किंवा प्रत्येक प्रकारातील एक या प्रमाणे व्हिडीओची लिंक दि. ७ मार्च २०२४ पर्यंत लिंकवर पेस्ट करणे हे करणे अपेक्षित आहे.

तद्नंतर लिंकवर प्राप्त व्हिडीओंचे परीक्षण करण्यासाठी राज्यस्तरावर ३ परीक्षकांची एक समिती गठीत करून उत्कृष्ठ व्हिडीओंची निवड करण्यात येऊन दि. १८ व १९ मार्च रोजी राज्यस्तरावर प्रत्यक्ष सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाईल.

राज्यस्तरावर प्रथम प्रत्येक प्रकारातील एका गटास, विविध उत्कृष्ट कृर्ती पैकी उत्तम सादरीकरण, उत्तम परिणामकारकता, गटातील एकसंघ भावना इत्यादी करिता प्रमाणपत्र देण्यात येतील तसेच सर्व सहभागी गटांना प्रमाणपत्रे दिली जातील. राज्यस्तरावर उपस्थित राहणाऱ्या संघांना प्रवासभत्ता, निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येईल.

यासाठी आपल्या अधिनस्त सर्व कार्यालये व शाळांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील असे पाहावे. रंगोत्सव कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व्हिडीओ राज्यस्तरावरून दिलेल्या लिंकवर पेस्ट करणेसंबंधित मार्गदर्शक सूचना सोबत जोडल्या आहेत. त्यानुसार कार्यवाही करावी.


सोबत- १. मार्गदर्शक सूचना

मा. संचालकांच्या मान्यतेनुसार


 (डॉ. माधुरी सावरकर)

 उपसंचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ३०




वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.