सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता जिल्हयांतील आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करणेबाबत शिक्षण संचालक प्राथमिक यांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत..
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ नुसार सुधारित नियम नमूद केलेले आहेत. पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन दिनांक ६/०३/२०२४ ते दिनांक १८/०३/२०२४ या कालावधीमध्ये करण्याबाबत संचालनालयाचे दिनांक ०६.०३.२४ अन्वये निर्देश देण्यात आलेले होते.
तथापि काही जिल्हयांचे पुर्ण शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे याव्दारे दिनांक २२.०३.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत पात्र असलेल्या शाळांचे १०० टक्के रजिस्ट्रेशन विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी. यापूढे कसल्याही परिस्थीतीत मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.
प्रत माहितीस्तव सविनय सादर :
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे. प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर वरिष्ठ तांत्रिक संचालक, एनआयसी पुणे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments