राज्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता ग्राह्य धरणार नाहीत, तर परफॉर्मन्सवर (कामकाजावर) ठरणार पदोन्नती व पगारवाढ ; बदली प्रक्रिया देखिल बंद...
राज्यात शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून केंद्र सरकारच्या नविन राष्ट्रीय धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत, यांमध्ये असणारे विविध तरतुदी राज्यात टप्याटप्याने लागु करण्यात येत आहेत. यांमध्ये प्रामुख्याने पदोन्नतीची प्रक्रिया खाजगी / कार्पोरेट सेक्टरप्रमाणे कामगिरीवर आधारीत पदोन्नती दिली जाणार आहे.
तर बदल्यांची प्रक्रिया देखिल बंद करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहेत. राज्यात केंद्र सरकारच्या नविन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी कोरोना महामारीमुळे विलंबाने पुढील वर्षांपासून लागु करण्यात येत आहेत. येत्या जुन महिन्यांपासून नविन शैक्षणिक धोरण लागु करण्यात येणार असून, यानुसार इ.5 वी व 8 वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे .
मागील धोरणांनुसार 8 वी पर्यंत नापास करता येणार नसल्याची तरतुद आता काढून टाकण्यात येणार आहे, तर इ.5 वी व 8 वी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची संधी लगेच मिळणार आहे. जर परत नापास झाल्यास, परत त्या विद्यार्थ्यांस त्याच वर्गात बसावे लागेल.
पदोन्नती / बदली संदर्भात विशेष तरतुद : यांमध्ये शिक्षकांच्या पदोन्नती संदर्भात विशेष तरतुद नमुद असून, खाजगी तसेच कार्पोरट क्षेत्रांमध्ये जसे पदोन्नती कामगिरीच्या ( परफॉर्मन्स ) आधारावर करण्यात येते, त्याच धर्तीवर राज्यातील शिक्षकांची पदोन्नती ही सेवाज्येष्ठता ऐवजी कामगिरीच्या आधारावर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहेत. तर बदली प्रक्रिया देखिल बंद करण्यात येणार आहेत.
कारण नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ( New Education Policy ) च्या प्रकरण मुद्दा क्र.15 ते 21 यांमध्ये या संदर्भात सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे. यांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत, कि चांगले ( उत्कृष्ट ) कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले पाहिजे, अशा उत्कृष्ट शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली पाहिजे. तसेच चांगली कामगिरी बजावणाऱ्यांना पगार वाढ देखिल देण्यात यावेत, अशी तरतुदी आहे.
यामुळे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांच्या गुणवत्तेच्या आधारावर तसेच त्यांचे योग्य मापदंड, योग्य प्रकारे मुल्यांकन करुन शिक्षकांना पगारवाढ तसेच पदोन्नती दिली जाणार आहे. यांमध्ये पगारवाढ, पदोन्नतीसाठी कार्यकाळ तसेच वरिष्ठता यांच्या आधारावर पदोन्नती तसेच पगारवाढ हा मुद्दा यापुढे अवलंबुन राहणार नाही.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments