प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत अंडी व केळी करीता शाळांना / केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था अनुदान वितरण करणे करीता अनुदान मागणी नोंदविणे बाबत प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना (स्वतंत्र कয়)प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य कार्यालयातून निर्गमित दि १३ डिसेंबर २०२४ च्या आदेशा नुसार पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यातील इ १ ली ते ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत शाळास्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत सन २०२३-२४ या कालावधीमध्ये माहे नोव्हेंबर, २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीकरीता आठवड्यातील एक दिवस अंडी या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. तसेच सन २०२४-२५ या कालावधीमध्ये त्रिस्तरीतय आहार रचनेप्रमाणे दोन आठवड्यातून एक वेळेस अंडा पुलाव या स्वरुपात अंडी या पदार्थाचा लाभ विद्यार्थ्यांना देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
राज्यातील अनेक जिल्हे आणि केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांना अंडी व केळी अनुदान देणे प्रलबित असून याकरीता वेळावेळी संचालनायाकडे अनुदान मागणी करण्यात येत आहे. सबब सर्व जिल्ह्यांना खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
१. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२३-२४ व २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये योजनेंतर्गत योजनेस पात्र सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना अंडी/केळी या पदार्थांचा लाभ दिले असलेची खात्री संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांचेकडून प्रमाणित करुन घेण्यात यावी.
२. माहे नोव्हेंबर, २०२३ ते एप्रिल, २०२४ या कालावधीकरीता अदा करावयाच्या रकमेची परिगणना मुद्दा क्रमांक १ मध्ये नमूद केलेनुसार शाळा अथवा केंद्रीय स्वयंपकागृहाकरीता आवश्यक अनुदान आणि शाळांना यापूर्वी वितरीत अग्रीम रक्कम व उर्वरित अदा करावयाची फरकाची रक्कम याची परिगणना करुन त्यानुसार अनुदान मागणी संचालनालयाकडे नोंदविण्यात यावी.
३. फरक रकमेची मागणी शाळांनी प्रत्यक्ष अंडी या पदार्थाचा लाभ दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संखेच्या प्रमाणात करण्यात यावी, केळी अथवा इतर फळांचा लाभ दिला असल्यास अंडी करीता निर्धारित फरकाच्या रकमेची मागणी करण्यात येऊ नये.
४. केंद्रीय स्वयंपाक्क्रगृह संस्थांकडील शाळांमधील लाभार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात आवश्यक अनुदान मागणी मुद्दा क्रमांक २ मधील दरानुसार निर्धारित दिवसांच्या संखेनुसार व प्रत्यक्ष लाभ दिला असल्याची खात्री करुनच अनुदान मागणी करण्यात यावी.
५. सन २०२४-२५ या कालावधीकरीता त्रिस्तरीय आहाराचा लाभ संबंधित शाळांनी तसेच केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांनी विद्यार्थ्यांना दिला असल्याची खात्री करण्यात यावी व तसे मुख्याध्यापक यांचे मार्फत प्रमाणित करुन घेण्यात यावे. जिल्हास्तरावर केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांकडील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक यांचे प्रमाणपत्र दफ्तरी ठेवण्यात यावेत तसेच आवश्कतेनुसार सदरची माहिती संचालनालयास सादर करण्यात यावी.
६. शाळांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिलेल्या नियमित आहाराची माहिती एम. डी. एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. फरकाची रक्कम वितरण करताना अनुदान मागणी करण्यात आलेल्या सर्व शाळा नियमितपणे एम.डी.एम पोर्टलवर दैनंदिन उपस्थितीची माहिती नोंदवित असल्याची खात्री तालुक्यामार्फत करुन घेण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे -१
प्राथमिक शिक्षण संचालनालयातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना स्वतंत्र कक्षातून निर्गमित दिनांक 26 मार्च 2024 रोजी च्या परिपत्रकानुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अंडी/केळी उपलब्ध करुन देणेकरीता अनुदान मागणी करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी / केळी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संचालनालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत येणाऱ्या शाळांकरीता रक्कम रु. ५/- प्रति आठवडा याप्रमाणे अंडी व केळी उपलब्ध करुन देण्याकरीता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे. माहे जानेवारी, २०२४ पासून नॅशनल एग्ज कोऑर्डिनेशन कमिटी यांचे संकेतस्थळावरील सरासरी दरानुसार अंडी दर जानेवारी, २०२४ व फेब्रुवारी, २०२४ या दोन महिन्यांकरीता निश्चित केलेले आहेत.
अंडी/केळी अनुदान मागणी करतांना संदर्भ २ मधील पत्रामध्ये विस्तृत सूचना देण्यात आलेल्या आहेत, तथापि आपल्या कार्यालयाने सादर केलेल्या मागणीमध्ये १०० टक्के पटसंखेच्या प्रमाणात अंडी आणि केळी करीता रक्कम रु. ६.००/- या प्रमाणे अनुदान मागणी करणेत आलेली आहे, सदरची बाब वस्तुनिष्ठ आढळून येत नाही. याअनुषंगाने आपणास खालील अधिकची माहिती सादर करणेचे निर्देश देण्यात येत आहे.
१. संचालनालयाकडील संदर्भिय निर्देश पत्रामध्ये नमूद मुद्दा क्रमांक २ आणि ३ नुसार प्रत्यक्ष लाभार्थी संख्या आणि अंडी अथवा केळी कोणत्या आठवड्यामध्ये दिली आहेत, याप्रमाणे संबंधित मुख्याध्यापक यांचेकडून प्रमाणित करुन घेतलेबाबतचा अहवाल.
२. संचालनालयाकडील संदर्भिय निर्देश पत्रामध्ये नमूद मुद्दा क्रमांक ५ अन्वये, केवळ अंडी उपलब्ध करुन दिलेल्या दिवसांची परिगणना रक्कम रु. ६/- प्रमाणे करावयाची आहे, केळी अथवा इतर फळ दिले असल्यास परिगणना रु. ५/- या प्रमाणे करण्यात यावी.
३. संचालनालयाकडील संदर्भिय निर्देश पत्रामध्ये नमूद मुद्दा क्रमांक ६ नुसार अनुदानाची मागणी केलेल्या शाळांनी दैनंदिन उपस्थितीची माहिती एमडीएम पोर्टलवर भरले असलेबाबतची खात्री केली आहे किंवा कसे, तसेच याचा तपशिल सोबत जोडण्यात यावा. उक्त नमूद मुद्द्यांनुसार आपण केलेल्या मागणीची पुनश्च पडताळणी करुन मागणी फेरसादर करणेत यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे -१.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments