विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ - पोस्टल बेलेट / EDC बाबत महत्वाचे अपडेट..

पोस्टल बेलेट / EDC बाबत महत्वाचे अपडेट..

यावेळी निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचाऱ्यांना इलेक्शन ट्रेनिंग च्या ऑर्डर सोबतच कर्मचाऱ्याची माहिती भरलेला Prefilled छापील फॉर्म नं 12 / 12 अ ची प्रत मिळालेली आहे, त्यात कर्मचाऱ्याचे नाव, त्याचा मतदानाचा मतदार संघ , यादी भाग क्र, अनुक्रमांक, इत्यादी माहिती भरलेली आहे..

तथापि पहिल्या निवडणूक प्रशिक्षणाला जातांना खालील महत्वाच्या गोष्टी चे पालन करा व काळजी घ्या..

1)फॉर्म नं 12.. 

पोस्टल बेलेट मागणी साठी आपणास मिळालेल्या फॉर्म नंबर 12 वरील आपली माहिती एकदा काळजीपूर्वक तपासून घ्यावी.. 

 ( https://electoralsearch.eci.gov.in/ )

कारण काही ठिकाणी असेही निदर्शनास आले आहे की त्यात नमूद कर्मचाऱ्यांच्या मतदानाच्या मूळ विधानसभा मतदारसंघाचे नाव त्याचा क्रमांक चुकलेला आहे.. 

2) फॉर्म 12 अ

शक्यतो अश्या महिला कर्मचारी की ज्यांची इलेक्शन ड्युटी त्यांचं मतदान असलेल्या मतदारसंघात असेल केवळ त्यांनाच फॉर्म नं 

*12 अ* मिळालेला आहे.. त्यांना EDC मिळेल , ज्यात ते नियुक्त मतदान केंद्रावर EVM वर मतदान करू शकतील.. त्यांनी देखील आपली माहिती तपासून घ्यावी.. (मात्र ज्या महिला कर्मचाऱ्यांचे मतदान कार्यरत विधानसभा मतदारसंघा बाहेर असेल त्यांनी फॉर्म 12 च भरून द्यायचा आहे.. )

 3) छापील तपशील बरोबर आढळून आल्यास फॉर्म 12 / 12अ वर सही करावी. 

● तथापि विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्र किंवा अ.क्र. या तपशिलात चूक असल्यास छापलेली माहिती रद्द करणेसाठी सदर अंकाला / नावाला स्पष्ट round करून त्याच्यावर सुधारित माहिती पेनाने नमूद करावी..

 फॉर्म वर प्रत्येक चुकलेल्या ठिकाणी बदल करणे आवश्यक आहे.


4) फॉर्म नंबर 12 किंवा 12 अ सोबत जोडवायचे कागदपत्रे:-

१) मतदान कार्ड ची xerox

२) निवडणूक आदेशाची प्रत


वरील दोन्ही कागदगपत्र जोडणे बंधनकारक आहे, अन्यथा आपली पोस्टल बेलेट / EDC ची मागणी नाकारली जाईल..  

5) निवडणूक आदेशात आणि फॉर्म 12 किंवा 12 अ वर mobile क्रमांक दिलेले आहेत, सदर क्रमांक प्रत्येकाने तपासावा, योग्य नसल्यास पहिला क्रमांक खोडून खरा Mobile क्रमांक अचूक नमूद करावा.

●अश्या पद्धतीने तपासलेला डेटा अचुक असल्याची खात्री करून व सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म 12 / 12 अ प्रथम प्रशिक्षणाच्या वेळी हजेरीच्या टेबलवर जमा करावा.


6) मतदान पथकांच्या मानधन वाटपासाठी त्यांच्या बँक खात्याचा अचूक तपशील आवश्यक असल्याने सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी प्रथम प्रशिक्षणास येताना बँक पासबुकच्या पहिल्या पानाची Xerox सोबत आणणे अनिवार्य आहे.


थोडक्यात..

पहिल्या प्रशिक्षणास येताना आणायची आवश्यक कागदपत्रे👇🏻

1.नमुना 12/ 12 अ

2.निवडणूक आदेश

3.मतदार ओळखपत्र

4.बँक पासबुक पहिले पान


कृपया या सूचना प्रत्येक कर्मचारी यांचे पर्यंत पोहचवा..

चला 100% कर्मचाऱ्यांनी मतदान करूया, लोकशाही बळकट करूया..


मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित आदेशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्यासाठीची कार्यपद्धती पुढील प्रमाणे.

निवडणूक संचालन नियम, १९६१ च्या नियम १८, १८ए तसेच नियम २० (१) नुसार निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे (Postal Ballot Papers) मतदान करण्याबाबत तरतूदी करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या दि.३१.१०.२०२३ च्या पत्रातील परि.१४ अन्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ मध्ये राज्यात पाच टप्यामध्ये मतदान घेण्यात आले. त्या वेळी सुविधा केंद्राद्वारे मतदान केलेल्या अन्य विधानसभा मतदार संघांच्या मतदारांच्या टपाली मतपत्रिकांची आदानप्रदान करण्याच्या संदर्भात अनेक अडचणी आल्या होत्या. काही टप्यांमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या त्या मतदार संघांसाठी केंद्रीय समन्वय केंद्र (Centralized Clearing Centres) विभागस्तरावर केली होती व त्या द्वारे अर्ज तसेच टपाली मतपत्रिकांचे आदानप्रदान करण्यात आले होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ कमी टप्प्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात मतदार असलेल्या मात्र निवडणूक कर्तव्यार्थ अन्य मतदार संघात नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकेसाठी प्रपत्र-१२ भरुन देण्याची शक्यता असल्याने निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या टपाली मतपत्रिकांची संख्या जास्त प्रमाणात असण्याची शक्यता आहे.

वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन प्रपत्र-१२ तसेच टपाली मतपत्रिकांच्या आदानप्रदानांच्या योग्य समन्वयासाठी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ करीता जिल्हा समन्वय केंद्र तसेच राज्यस्तरीय

समन्वय केंद्र तयार करुन त्या द्वारे टपाली मतपत्रिकांच्या आदानप्रदाना बाबतची कार्यवाही करण्याबाबत कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली असून ती सोबत पाठविण्यात येत आहे. सदर कार्यपद्धती अवलंबून टपाली मतपत्रिकांच्या आदानप्रदान तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांच्या मतदानाची कार्यवाही करण्यात यावी.

टपाली मतपत्रिकाद्वारे मतदान करु इच्छिणाऱ्या तसेच निवडणूक कर्तव्यार्थ प्रमाणपत्राद्वारे (EDC) मतदान करु इच्छिणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांकरिता अनुक्रमे प्रपत्र-१२ व १२अ NIC मार्फत DEO Login वर pre-filled उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ संदर्भातील निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेल्या दिनांकापासून

DEO Login वर उपलब्ध करून देण्यात आलेले अनुक्रमे प्रपत्र-१२ व १२अ निवडणूक निर्णय अधिकारी यांनी Download करुन घ्यावे व प्रपत्र-१२ व १२अ यांचे निवडणूक कतव्यार्थ नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्ती पत्रासोबत वाटप करण्यात यावे. तसेच, प्रथम प्रशिक्षणाच्या वेळी जास्तीतजास्त प्रमाणात संबंधित कर्मचाऱ्यांनी सही केलेले प्रपत्र १२ व १२अ तसेच त्यांच्या मतदार ओळखपत्राची प्रत (EPIC) उपलब्ध करुन घ्यावी.

तनंतर उपरोक्त कार्यपद्धती (SOP) मध्ये नमूद केल्याप्रमाणे विधानसभा मतदार संघाच्या टपाली मतपत्रिकेबाबत नियुक्त केलेल्या समन्वय अधिकाऱ्याने आयोगाच्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे त्याच्याकडे प्राप्त झालेल्या प्रपत्र-१२ चे वर्गीकरण विधानसभा मतदारसंघ निहाय करावे व आपला मतदार संघ वगळता इतर मतदारसंघामध्ये मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रपत्र १२, कर्मचाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश व मतदार ओळखपत्राची प्रत स्कॅन करुन ऑनलाईन पद्धतीने (upload करुन) NIC च्या Software मार्फत संबंधित कर्मचारी ज्या विधानसभा मतदार संघाचा मतदार असेल त्या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उपलब्ध करुन देण्यात यावे. ही प्रक्रिया दररोज करावयाची असून त्या सोबत आयोगाच्या पत्रात नमूद केलेल्या जोडपत्र-४ मधील यादी सुद्धा पाठवायची आहे. तद्नंतर टपाली मतपत्रिकांच्या आदानप्रदानाच्या वेळी उपरोक्त कर्मचाऱ्यांचे मूळ प्रपत्र-१२ सुद्धा संबंधित समन्वय अधिकाऱ्याकडे उपलब्ध करुन द्यावयाचे आहे. अन्य सर्व कार्यवाही भारत निवडणूक आयोगाच्या पत्रातील निर्देश तसेच या कार्यालयाने निश्चित करुन दिलेल्या कार्यपद्धतीनुसार करण्यात यावी.

केंद्रिय समन्वय केंद्राचे (State Clearance Centre) स्थळ स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल. त्याचप्रमाणे निवडणूक कर्तव्यार्थ नेमण्यात आलेले पोलीस कर्मचारी तसेच अशासकीय कर्मचारी यांना न भरलेले प्रपत्र १२/१२-अ संबंधित समन्वय अधिकाऱ्यामार्फत उपलब्ध करुन देण्यात यावेत व उर्वरित प्रक्रिया आयोगाच्या निर्देशाप्रमाणे करण्यात यावी.

NIC सॉफ्टवेअर संदर्भात काही अडचणी/समस्या निर्माण झाल्यास त्या संदर्भात आपल्या जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यांच्या मार्फत NIC यांच्याशी संपर्क करण्यात यावा.


(म.रा.पारकर)

उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी

वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचा-पाना टपाली मतपत्रिकेद्वारे (Postal Ballot Paper) मतदान करण्यासाठीची कार्यपद्धती


निवडणूक संचालन नियम, १९६१ तसेच भारत निवडणूक आयोगाच्या पत्राद्वारे दिलेल्या सूचना. निवडणूक संचालन नियम-१९६१ चे नियम १८. १८-९, २०,

भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. ५२/२०२३/SDR/Vol.IV dated ३९" October, २०२४,

निवडणूक संचालन नियम, १९६१ च्या नियम १८ नुसार टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करणाऱ्या व्यक्तिंचे प्रवर्ग निश्चित करण्यात आले असून त्यानुसार निवडणूक कर्तव्यार्थ नेमणात आलेल्या कर्मचाऱ्यांना हो सुविधा उपलब्ध आहे. सदर नियमातील नियम २०(१) नुसार निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त मतदाराला टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करावयाचे असल्यास संबंधित मतदारास संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मतदानाच्या किमान ०७ दिवस आधी प्रपत्र-१२ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे व त्या नंतर संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याकडून पडताळणी करुन संबंधित मतदाराला टपाली मतपत्रिका देण्यात येते.

उपरोक्त नियमांमध्ये दि.२३.०८.२०२३ रोजी नियम १८-ए नव्याने अंतर्भूत करण्यात आला असून वरील प्रयोजनार्थ प्रपत्र-१२ मध्ये अर्ज केलेल्या निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचान्याने मतदानाकरिता उभारण्यात आलेल्या सुविधा केंद्रामध्ये मतदान करणे आवश्यक आहे. पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठविण्याची पद्धत बंद करण्यात आलेली आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दि.३१.१०.२०२३ च्या पत्रान्वये लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक निवडणूकांकरिता टपाली मतपत्रिकेद्वारे करावयाच्या मतदाना संदर्भात सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत, त्यामध्ये परि. १४ मध्ये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त मतदाराच्या मतदाना संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूका २०२४ मध्ये राज्यात पाच टप्प्यामध्ये मतदान घेण्यात आले. त्या वेळी सुविधा केंद्राद्वारे मतदान केलेल्या अन्य विधानसभा मतदार संघांच्या मतदारांच्या टपाली मतपत्रिकांची आदानप्रदान करण्याच्या संदर्भात अनेक अडचणी आल्या होत्या, काही टप्प्यांमध्ये संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्या त्या मतदार संघांसाठी केंद्रीय समन्वय केंद्र (Centralized Clearing Centres) विभागस्तरावर केली होती व त्या द्वारे अर्ज तसेच टपाली मतपत्रिकांचे आदानप्रदान करण्यात आले होते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ कमी टप्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात मतवार असलेल्या मात्र निवडणूक कर्तव्यार्थ अन्य मतदार संघात नियुक्तो दिलेल्या कर्मचा-यांकडून टपाली मतपत्रिकेसाठी प्रपत्र-१२ भरुन देण्याची शक्यता असल्याने निवडणूक फर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या कर्मचान्यांना द्यावयाच्या टपालो मतपत्रिकांची संख्या जास्त प्रमाणात असण्याची शक्यता आहे.

वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन प्रपत्र-१२ तसेच टपाली मतपत्रिकांच्या आदानप्रदानांच्या योग्य समन्वयासाठी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-२०२४ करीता जिल्हा समन्वय केंद्र तसंच राज्यस्तरीय सम्मन्वय केंद्र तयार करुन त्या द्वारे टपाली मतपत्रिकांच्या आदानप्रदाना बाबतची कार्यवाही करण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे.





विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 पोस्टल बॅलेट संदर्भाने  सूचना



महाराष्ट्र विधानसभा निवडणुक तारीख

 20 नोव्हेंबर ला

एकाच टप्प्यात मतदान मुळे जवळपास सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे पोस्टल बेलेट पेपर वर च वोटिंग होईल.. 


सर्व कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम आपले व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे मतदान होईल याची काळजी व तजवीज आजच करून ठेवा... 


त्यासाठी..👇🏻

2.निवडणूकीच्या पहिल्या ट्रेनिंग ला जातांना पोस्टल बेलेट मागणीसाठी फॉर्म नं 12 भरून सोबत न्या.. त्यासोबत आपली निवडणूक ऑर्डर व मतदार ओळखपत्र xerox प्रत जोडा..


यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना पोस्टल बेलेट मिळेल तथापि काही 2 ते 3% जे कर्मचारी स्थानिक लेवल ला साहित्य जमा करायला असतील व ज्यांचे मतदान त्याच तालुक्यात असतील किंवा काही महिला कर्मचारी ज्यांची इलेक्शन नेमणूक स्वतः च्या शाळेच्या/ कार्यालय कार्यक्षेत्रांतील मतदारसंघात असेल अश्याच महिला कर्मचाऱ्यांना पोस्टल ऐवजी EDC मिळू शकते त्यासाठी त्यांना फॉर्म 12A भरावा लागेल व त्यांचे मतदान EVM वर संबंधित इलेक्शन ड्युटी सेंटर वर होईल..


   ( मात्र 95 % कर्मचारी नेहमीप्रमाणे बाहेरील तालुक्यात इलेक्शन ड्युटी ला जातात त्यामुळे अश्या कर्मचाऱ्यांना फॉर्म नंबर 12 भरून पोस्टल बेलेट पेपर ची मागणी करावी लागते, ती त्यांनी करावी. )


जे पोस्टल बेलेट पेपर साठी फॉर्म भरतील त्यांना दुसऱ्या ट्रेनिंग पर्यंत किंवा शेवटच्या ट्रेनिंग पर्यंत ( मतदान च्या एक दिवस आधी) बेलेट पेपर मिळतील, आणि मिळालेले पोस्टल बेलेट पेपर संबंधित दुसऱ्या / अंतिम ट्रेनिंग सेन्टर वरच निवडणूक तारखे च्या एक दिवस आधीपर्यंत जमा होतील..


 3. सोबतच आपल्या घरात 85 + वयाचे वयोवृद्ध किंवा दिव्यांग मतदार असतील तर यांना मागणीनुसार पोस्टल बेलेट वर होणार आहे, त्यामुळे सर्वांनी आपापल्या घरातील, कुटूंबातील 85 + वय असलेल्या वयोवृद्ध व दिव्यांग फॅमिली मेम्बर साठी फॉर्म नं 12 D भरून BLO कडे ते देऊन त्यांच्यासाठी पोस्टल बेलेट ची मागणी करा, ते चालू फिरू शकत नाही हे BLO ला / पडताळणी साठी आलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना समजावून सांगा जेणेकरून ते पोस्टल बेलेट ची मागणी नाकारणार नाहीत..

85 + व दिव्यांग मतदार जोडले तर आपला vote (for ops) चा पोस्टल बेलेट चा आकडा / टक्केवारी वाढणार आहे ..


सदर पोस्ट सोबत फॉर्म नं.12 , 12 A आणि 12 D  पाठवत आहोत..

कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेट अर्ज पीडीएफ डाउनलोड

Download


इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट EDC साठी अर्ज

Download


85 + व दिव्यांग मतदार साठी पोस्टल बॅलेट अर्ज.

Download


चला लोकशाही बळकट करूया, 100% मतदान करूया.. आपल्या मुद्द्यावर मतदान करूया...

  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत निवडणूक नेमणूक आदेश प्राप्त झाले/होणार आहेत. ज्यांची निवडणूक ड्युटी लागली असेल त्यांनी पोस्टल  बॅलेट  साठी पुढील सूचनेनुसार कार्यवाही करावी.


1) यावर्षी  पोस्टल बॅलेट  पोस्टाने पाठवणे  बंद झाल्यामुळे व वैयक्तिक वितरित केले जाणार नाहीत.


2) त्यामुळे आपल्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे पहिल्या प्रशिक्षणास येतेवेळी आपण आपल्या आदेशाची एक झेरॉक्स प्रत व आपल्या अद्यावत EPIC क्रमांक असलेले मतदान ओळखपत्र व आपले मतदार यादीतील सध्याचा यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक यासह उपस्थित रहावे.


3) पहिले प्रशिक्षणाचे दिवशी नमुना क्रमांक 12 मिळणार असून तो लगेच अचूक भरून तेथेच आपल्या आदेशाची व ओळखपत्राची झेरॉक्स प्रत जोडून त्याच दिवशी सादर करायची आहे. कारण दुसऱ्या प्रशिक्षणासाठी आपण वेगळ्या LAC मध्ये जावे लागणार असल्याने आपणास पीबी पासून वंचित रहावे लागेल याची नोंद घ्यावी.

माहितीस्तव


मतदान यादीतील आपला क्रमांक शोधण्यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल.

https://voters.eci.gov.in/signup


https://electoralsearch.eci.gov.in/



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.