प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यामधील जळगाव, उस्मानाबाद, नांदेड, नंदूरबार व धुळे जिल्ह्यातील योजनेस पात्र शाळांपैकी आदिवासी व आकांक्षित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मिलेट न्यूट्रिटिव्ह बारचा शाळास्तरावर पुरवठा करण्याकरीता प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या स्तरावर ई- निविदा प्रक्रिया राबवून मे. गुनिना कमर्शिअल्स् प्रा. लि, मुंबई या संस्थेची उपरोक्त जिल्ह्यांकरीता निवड करुन उक्त संस्थेसोबत संदर्भ क्र. २ अन्वये करारनामा करण्यात आला आहे. सदर उपक्रमांतर्गत चॉकलेट मिलेट न्युट्रीटीव्ह बार विथ रागी, मिक्सड फ्रुट मिलेट न्युट्रीटीव्ह बार विथ जवार व पिनट बटर मिलेट न्युट्रीटीव्ह बार विथ बाजरा या तीन प्रकारच्या मिलेट बारचे वितरण करण्यात येणार आहे. त्याकरीता सदर क्षेत्रामधील शाळांमध्ये असलेली पटसंख्या व इतर अनुषंगिक माहिती जिल्ह्यांकडून यापूर्वीच संकलित करण्यात आली होती. त्यानुसार आदिवासी क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मिलेट न्युट्रीटीव्ह बार उपलब्ध करुन देण्याकरीता मे. गुनिना कमर्शिअल्स् प्रा. लि, मुंबई या संस्थेकडे मागणी नोंदवून पुरवठ्यापश्चात शाळास्तरावर विद्यार्थी मिलेट न्युट्रीटीव्ह बार वितरण करणेबाबत आपणास खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
अ) मिलेट न्युट्रीटीव्ह बारची मागणी नोंदवणे व शाळा स्तरावर पुरवठा करणे-
१. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेस पात्र असलेल्या आदिवासी क्षेत्रातील व आकांक्षित जिल्ह्यांमधील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या जिल्ह्यांकडून मागविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यांकडून प्राप्त झालेल्या पटसंख्येचा गोषवारा या सोबत परिशिष्ट १ मध्ये जोडण्यात आला आहे. उक्त गोषवाऱ्यामध्ये नमुद करण्यात आलेल्या पटसंख्येच्या प्रमाणात मिलेट न्युट्रीटीव्ह बारची मागणी नोंदविणे अनिवार्य राहील.
२. प्रति विद्यार्थी वितरीत करावयाच्या मिलेट न्युट्रीटीव्ह बारचे प्रमाण पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments