PM Poshan Update - प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांनी ऑनलाईन भरलेल्या उपस्थिती माहितीची पडताळणी करणेबाबत.

 प्राथमिक शिक्षण संचालनातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत निर्गमित दिनांक 26 मार्च 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांनी ऑनलाईन भरलेल्या उपस्थिती माहितीची पडताळणी करणेबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती राज्यामधील प्रत्येक जिल्हयातील शाळांनी शासनाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. शाळांनी दैनंदिन नोंदविलेली उपस्थितीची माहिती केंद्र शासनाच्या Automated Monitoring System प्रणालीवर दर्शविण्यासाठी पाठविण्यात येते. सदर प्रमाणे भरलेल्या माहितीचे केंद्र शासनाद्वारे दैनंदिन तपासणी केली जाते. तथापि, जिल्ह्यातील सर्व शाळांद्वारे सदर प्रमाणे माहिती नियमितपणे भरली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या दैनंदिन AMS अहवालामध्ये राज्यातील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.


त्यानुषंगाने सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, सदर योजनेंतर्गत लाभ दिलेल्या विद्यार्थीची दैनंदिन माहिती विहीत कालावधीत त्याच दिवशी भरण्याबाबत सर्व मुख्ययाध्यापक/शाळाप्रमुखांना आपल्या स्तरावरुन सूचना द्याव्यात. तसेच प्रस्तुत बाबतचे सनियंत्रण करणेबाबत गटशिक्षणाधिकारी / अधीक्षक यांना सूचना देणेत याव्यात. सदरप्रमाणे माहिती विहित कालावधीत न भरल्यास जबाबदार असणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी. 

सोबत : ऑनलाईन माहिती पाहावयाचे मॅन्युअल

(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक)



वरील संपूर्ण परिपत्रक ऑनलाईन माहिती पहावयाच्या मॅन्युअल सहित पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.