नेट परीक्षा आता पीएचडी एंट्रन्स टेस्ट म्हणून देखील ग्राह्य! आता आता सर्व विद्यापीठांसाठी एकच पीएचडी एंट्रन्स UGC चा मोठा निर्णय

 आता NET स्कोअरच्या आधारे Phd ला मिळणार प्रवेश; UGC चा मोठा निर्णय 

आता Phd अभ्यासक्रमाच्या (Phd courses) प्रवेशासाठी उमेदवारांना विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेला (University entrance exam) बसावे लागणार नाही. शैक्षणिक सत्र 2024-25 (Academic Session 2024-25) पासून नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) स्कोअरच्या आधारे Phd  ला देखील प्रवेश मिळणार आहे,विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे याबाबत घोषणा करण्यात आली आहे.  


दिनांक 27 मार्च 2024 रोजी युजीसी ने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार आता सर्व विद्यापीठांसाठी पीएचडी अभ्यासक्रमासाठी नेट परीक्षा पीएचडी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा असणार आहे! 

UGC कौन्सिलच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)-2020 अंतर्गत पीएचडी प्रवेशासाठी नवीन नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. या नियमांनुसार आता NET पात्रताधारक  तीन श्रेणींसाठी पात्र असतील. NET मध्ये सर्वाधिक गुण असलेले विद्यार्थी श्रेणी-1 मध्ये असतील. ते पीएचडी प्रवेश आणि फेलोशिपसह जेआरएफ, असिस्टंट प्रोफेसरशिपसाठी देखील पात्र असतील. त्यांना पीएचडी प्रवेशासाठी मुलाखत द्यावी लागेल, जी यूजीसी नियमन-2022 वर आधारित असेल.


त्यानंतर अधिक टक्के असलेले विद्यार्थी दुसऱ्या श्रेणित येतील. हे विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक आणि Phd प्रवेशासाठी पात्र मानले जातील. परीक्षेत उत्तीर्ण पण कमी टक्केवारी असलेले विद्यार्थी श्रेणी-3 मध्ये असतील. ते फक्त पीएचडी प्रवेशासाठी पात्र असतील. निकालाच्या प्रमाणपत्रात उमेदवाराची श्रेणी दिली जाईल.

उमेदवारांच्या टक्केवारी आणि गुणांमध्ये प्रसिद्ध केला जाईल.

पीएचडी प्रवेशासाठी, श्रेणी-2 आणि श्रेणी-3 मधील उमेदवारांची निव्वळ टक्केवारी 70 टक्के वेटेजमध्ये ग्राह्य धरली जाईल आणि  मुलाखतीला 30 टक्के वेटेज असेल. या दोन्ही श्रेणींमध्ये NET स्कोअर फक्त एक वर्षासाठी वैध असेल. जर ते या कालावधीत पीएचडी प्रोग्राममध्ये नावनोंदणी करू शकले नाही तर त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. उमेदवाराला पुन्हा NET उत्तीर्ण व्हावे लागेल.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.