माननीय शिक्षण आयुक्त यांनी दिनांक 3 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत निर्देश दिले आहेत तसेच राज्यात विभागात कोणत्या शाळा सदर अभियानांतर्गत निवडल्या गेल्या आहे याची यादी देखील प्रसिद्ध केली आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" हे अभियान खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले असून राज्यातील १०३३१२ शाळांनी या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवलेला आहे. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम राज्यातील शाळांनी उत्स्फूर्तपणे घेतले आहेत.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानामध्ये शाळांनी केलेल्या कामगिरीचे केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यपातळीवर काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आलेले आहे.
या संदर्भातील शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे राज्य पातळीवरील, विभाग पातळीवरील व राज्याच्या राजधानी मुंबई मधील विजेत्या शाळांसाठीचा पारितोषिक वितरण समारंभ मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (वित्त), मा. उपमुख्यमंत्री (गृह) व मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ५ मार्च २०२४ रोजी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील सोबत जोडण्यात येत आहे.
तरी "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानात राज्यस्तरावर, विभाग स्तरावर राज्याच्या राजधानी मुंबईमधील व राज्यातील अ व ब महानगरपालिका क्षेत्रांमधील विजेत्या नमूद ६६ शाळांच्या पारितोषिक वितरण समारंभास या विजेत्या शाळांमधील प्रत्येकी कमाल १० व्यक्ती उपस्थित राहू शकतील.
कृपया आपण आपल्या स्तरावरून या विजेत्या शाळांना याबाबत सूचित करावे. आपणही या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती.
(सूरज मांढरें भा.प्र.से.)
आयुक्त, शिक्षण
शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा निकाल पुढीलप्रमाणे
संपूर्ण आदेश व राज्यस्तर विभागीय स्तर निकाल पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
जिल्हास्तर यादी पीडीएफ डाउनलोड राज्यातील सर्व जिल्हे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments