महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 8 जानेवारी 2019 रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार राज्य शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वैद्यकीय तपासणी धोरण शासन शुद्धिपत्रक पुढीलप्रमाणे.
प्रस्तावनाः
उपरोक्त वाचा येथील संदर्भिय शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष ४० ते ५० या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपसणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरीता रु.५०००/- या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे. तसेच प्रपत्र "अ" येथे नमूद चाचण्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त आरोग्य संस्थांमार्फत करण्यास मान्यता दिली आहे. तसेच यापैकी काही चाचण्या उपरोक्त आरोग्य संस्थामध्ये उपलब्ध नसल्यास सदर चाचण्या बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली आहे. उपरोक्त शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या चाचण्या महसूल विभाग निहाय खाजगी रुग्णालयात निर्धारित केलेल्या दराने गृह विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी लागू करण्याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने शासन शुध्दीपत्रक निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शासन शुध्दीपत्रकः
वर्ष ४० ते ५० या वयोगटातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वय वर्ष ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपसणी अनुज्ञेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरीता रु.५०००/- या प्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती गृह विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा
करण्याबाबत या शासन निर्णयान्वये "अपवादात्मक बाब म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक ०८.१२.२०२२ च्या प्रपत्र "अ" येथे नमूद करण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयाद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
०२. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यकता असल्यास विहीत कार्यपद्धती निश्चित करण्याची कारवाई गृह विभागामार्फत करण्यात यावी. तसेच उपरोक्त वाचा येथील शासन निर्णयातील सर्व बाबी लागू राहतील.
०३. सदर शासन निर्णय गृह विभागाची नस्ती क्र. कल्याण-०१२३/प्र.क्र.०४/पोल-७ वर मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या मान्यतेनुसार शासन शुध्दीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०१०५११०८५७६८१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अशोक आत्राम
महाराष्ट्र शासनाचे सह सचिव
वरील संपूर्ण शासन आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments