उत्पन्न/पगार १२ लाख असला तरी एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही, वाचा संपूर्ण हिशोब

 मार्च महिना सुरू झाला आहे. हा चालू आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्याने या महिन्याच्या अखेरीपर्यंत अनेक कामं आटोपून घेणं आवश्यक असतं. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना महत्वाचा असतो. या महिन्यात आयटीआर फाईल करणे बंधनकारक असते. कर्मचाऱ्याला त्याच्या गुंतवणुकीचा तपशीलही कार्यालयाला द्यावा लागतो. जेणेकरून टॅक्स बचतीचा पर्याय तयार करता येईल. जर तुम्ही ही माहिती दिली नाही आणि ITR फाईल केली नाही तर इन्कम टॅक्स तुमच्या घरी नोटीस पाठवते.

नियमांनुसार, जुन्या कर प्रणाली अंतर्गत ५ लाख रुपये आणि नवीन कर प्रणाली अंतर्गत ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त कक्षेत ठेवण्यात आले आहे. जुन्या कर प्रणालीमध्ये सरकारकडून काही कर सूटही दिली जातात. तुम्हाला १२ लाख रुपये पगार असला तरीही टॅक्समधून सूट मिळू शकते.

समजा तुमचा पगार १२ लाख रुपये आहे, तर तुम्ही तुमच्या रचनेत ३.६० लाख रुपये एआरए असेल. तर तुमचा एलटीए १०,००० रुपये असेल. फोनचे बिल ६,००० रुपये असेल.

तुम्हाला कलम १६ अंतर्गत पगारावर ५०,००० रुपयांची स्टॅन्डर्ड वजावट मिळेल. तुम्ही २५०० रुपयांच्या प्रोफेशन टॅक्सवर सूट मागू शकता. तुम्ही कलम १० (१३A) अंतर्गत ३.६० लाख एचआरए आणि कलम १० (५) अंतर्गत १०,००० रुपयांच्या एलटीवर दावा करू शकता. या कपातीमुळे तुमचा करपात्र पगार ७,७१,५०० रुपयांपर्यंत खाली येईल.

जर तुम्ही LIC, PPF, EPF मध्ये गुंतवणूक केली असेल किंवा तुम्ही तुमच्या मुलाची शिकवणी फी भरली असेल, तर तुम्ही कलम 80C अंतर्गत १.५० लाख रुपयांच्या अतिरिक्त कपातीचा दावा करू शकता.

ज्यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या टियर-1 योजनेत गुंतवणूक केली आहे ते कलम 80CCD अंतर्गत ५०,००० रुपयांच्या अतिरिक्त कपातीसाठी पात्र आहेत. या दोन्ही कपातीनंतर तुमचे करपात्र उत्पन्न ५,७१,५०० रुपये होईल.

सेक्शन 80D तुम्हाला आरोग्य विमा पॉलिसींवर भरलेल्या प्रीमियमसाठी कर सवलतीचा दावा करण्याची परवानगी देते. तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी आरोग्य विम्याच्या प्रीमियमसाठी २५,००० क्लेम करू शकता.

तर तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिक पालकांच्या आरोग्य पॉलिसींवर भरलेल्या प्रीमियमसाठी ५०,००० च्या अतिरिक्त सूटचा दावा करू शकता. यासह तुम्हाला ७५,००० रुपयांच्या कपातीचा लाभ मिळेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न ४,९६,५०० रुपये होईल.

जुन्या कर प्रणालीनुसार, जर तुमचे उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला त्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. म्हणजे तुम्ही शून्य करासाठी पात्र असाल.



महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.