महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ कार्यालयातून दिनांक 14 मार्च 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार सर्व मान्यता प्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मंडळाच्या विभागीय सचिवांनी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
पेनु. मार्च २०२४ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अंर्तगत आपले महाविद्यालयातील परीक्षक / नियामक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तरपत्रिकासंकलनाचा दिनांक निहाय तक्ता सर्व नियुक्त परीक्षक / नियामक यांना देण्यात आलेला आहे तथापि आतापर्यंत एकाही नियामकांनी उत्तरपत्रिका संकलन केंद्रात जमा केलेल्या नाहीत त्यामुळे आपणांस सूचित करण्यात येते की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकालाचे काम ४५ दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक असल्याने आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीचे काम हे वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टिने संबंधीत परीक्षक / नियामकांना परीक्षण व नियमन करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे. त्यादरम्यान परीक्षण/नियमनाचे काम बाधीत होईल असे कोणतेही काम संबंधितांस देण्यात येवू नये. तसेच सदर परीक्षक/नियामक यांना आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या कामातून तूर्तास शिथिल करण्यात यावे. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षक/नियामक यांच्यामुळे मंडळाच्या निकाल प्रक्रीयेस विलंब झाल्यास कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख म्हणून सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.
(डॉ. सुभाष बोरसे)
विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments