शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक ६ मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार उपसचिव ग्रामविकास विभाग मंत्रालय यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविणे बाबत निर्देश देण्याची विनंती केली आहे.
शासन निर्णय दि.२१.०६.२०२३ अनुसार जिल्हाअंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वी पासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छूक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी, अशी तरतूद आहे. नवीन शिक्षक भरती सुरु झाली असून जे शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छूक आहेत त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबविण्यास आदेशित करावे, अशी मागणी उक्त निवेदनान्वये करण्यात आलेली आहे. याअनुषंगाने नमूद करण्यात येते की, शासन निर्णय दिनांक २१.०६.२०२३ मधील अ.क्र.२ अनुसार कार्यवाही होत नसल्याबाबत या विभागास अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबतच्या सुधारित अटी ग्राम विकास विभागाच्या सहमतीने दिनांक २१.०६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या आहेत. सदर शासन निर्णयामधील नमूद अ.क्र. २ अनुसार आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावरुन निर्देश देण्यात यावेत, ही विनंती.
आपला,
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
अर्थात वरील आदेश हा मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांना दिलेला नसून ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना आदेशित करावे अशी विनंती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ग्राम विकास विभागाला केली आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments