महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 11 मार्च 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
संदर्भ
: १) शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्र. संकिर्ण -२०२३/प्र.क्र. १७४/टिएनटि-१, दि. ६ मार्च, २०२४
२) शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२३/ १७४/टिएनटि-१, दि. २१.६. २०२३
३) या विभागाचे शासन पत्र क्र. क्र.आंजिब-२०२३/प्र.क्र.११७/ आस्था-१४, दिनांक ४ जानेवारी, २०२४.
महोदय/महोदया,
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्याआधारे (पवित्र पोर्टलद्वारे) विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्यात आली असून, सदर भरती प्रक्रियेतील शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी संदर्भ क्र. २ मधील शासन निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.
(पो.द. देशमुख)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
शिक्षण विभागाने दिलेल्या परिपत्रकानुसार व केलेल्या विनंतीनुसार ग्रामविकास विभागाने आज दिनांक 11 मार्च 2024 रोजी तात्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना आदेशित करून भरती प्रक्रियेपूर्वीच जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया राबवणे बाबत सांगितले आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments