समाज माध्यमांवर राज्य शासनाच्या वित्त विभागाचे एक प्रसिद्धी पत्रक फिरत आहे ज्यामध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतच्या दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणे तसेच सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या शासन निर्णय दि.०२.०३.२०१९ रोजीच्या शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या मा. मंत्रीमंडळ बैठकीत या विभागाच्या उपरोक्त विषयावर मा. मंत्रीमंडळाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
१. वित्त विभागाच्या दि.०१.०४.२०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दि.०१.१०.२००६ पासून लाभ देतांना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्याअनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यास मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिलेली आहे.
२. वित्त विभागाच्या दि.०२.०३.२०१९ शासन निर्णयानुसार तीन लाभाच्या (१०:२०:३०) सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत दि.०१.०१.२०१६ पासून लाभ देतांना सदर कर्मचाऱ्यांना विवक्षित सेवा कालावधीनंतर देण्यात येणारी अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतनसंरचना विचारात न घेता पदोन्नतीच्या पदाचा लाभ देण्याचे व त्याअनुषंगाने शासन निर्णयात सुधारणा करण्यास मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिलेली आहे.
या निर्णयामुळे अंदाजे रु.२२,७९,०९,११६/- (रुपये बावीस कोटी एकोणऐंशी लक्ष नऊ हजार एकशेसोळा) इतका अनावर्ती खर्च आणि अंदाजे रु.३,६१,९२,०००/- (रुपये तीन कोटी एकसष्ट लक्ष ब्याण्णव हजार) इतका वार्षिक आवर्ती खर्च अपेक्षित आहे.
वरील प्रसिद्धीपत्रकाप्रमाणे सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू झाली तर प्राथमिक शिक्षकांना लागू होणाऱ्या वरिष्ठ वेतन श्रेणी ज्यामध्ये तुटपुंजी वाढ होते यामध्ये सुधारणा होऊन प्राथमिक शिक्षकाची पदोन्नती होऊन जे पद तो धारण करतो त्या पदाची वेतनश्रेणी त्याला लागू होईल. अर्थात सदर परिपत्रक वित्त विभागाचे असल्यामुळे सध्या तरी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असल्याचे दिसून येते.
शिक्षक संवर्गासाठी अद्यापही दहा वीस तीस ही तीन लाभाची सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली नाही.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments