माहे फेब्रुवारी २०२४ चे वेतन देयके ७ वा वेतन आयोग ४ था हप्ता (राहिलेला १, २ व ३ रा) हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने पारीत करणेबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक

 शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य या कार्यालयातून दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार माहे फेब्रुवारी 2024 चे वेतन देयके सातवा वेतन आयोग चौथा हप्ता व राहिलेला पहिला दुसरा व तिसरा हप्त्यासह ऑनलाइन पद्धतीने पारित करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. 


दि. १३/०२/२०२४ रोजीच्या व्हीसी मध्ये दिलेल्या निर्देशानुसार लेखाशीर्ष क्र. २२०२०४४२, २२०२०४७८, २२०२३३६१, २२०२३३७९, २२०२०५११, २२०२०४६९, २२०२०५०२, २२०२१९०१, २२०२१९४८, २२०२एच९७३ मध्ये मयत, सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे ७ वा वेतन आयोगाचा (१,२, ३ हप्ता राहिला असल्यास) चौथा हप्ता माहे फेब्रुवारी २०२४ चे वेतन देयकासोबत ऑनलाईन पद्धतीने यथानियम अदा करावे.

भविष्यात सातवा वेतन आयोग पहिला, दुसरा, तिसरा व चौथा हप्त्याबाबत तक्रारी निर्माण झाल्यास संबंधित शिक्षणाधिकारी व अधीक्षक, वेतन पथक (माध्यमिक) यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात यईल याची नोंद घ्यावी. उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादेत खर्च होईल या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.

मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.


(दिपक चवणे)

शिक्षण उपसंचालक

(अंदाज व नियोजन)


वरील आदेशामुळे खाजगी अनुदानित व इतर सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाकी असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या पहिला दुसरा व तिसऱ्या तसेच चौथा हप्ता माहे फेब्रुवारी 2024 च्या वेतनासह मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


संपूर्ण परिपत्रकाची पीडीएफ प्रिंट करण्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.