Sanch Manyata 2024-25 Update - संच मान्यता सन 2024-25 बाबत शिक्षण संचालकांच्या महत्त्वाच्या सूचना!

महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना संचमान्यता सन 2024 25 बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


संदर्भ: शासन पत्र क्रमांक न्यायाप्र-२०२४/प्र.क्र.१६७/टिएनटी-२, दिनांक १२.०७.२०२४


उपरोक्त विषयी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथील रिट याचिका क्रमांक २८२२/२०२४ व रिट याचिका क्रमांक ५४७२/२०२४ मधील दिनांक १२.०६.२०२४ रोजीच्या आदेशान्वये मा. न्यायालयाने रिट याचिका क्रमांक २८९६/२०२४ मधील दिनांक १५.०३.२०२४ रोजीच्या आदेशातील परिच्छेद ५ मधील निर्देशाच्या अनुषंगाने संदभर्भीय पत्रान्वये शासनाने निर्देश निर्गमित केलेले आहेत.


२/- शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. तसेच शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत. ३/- सदरच्या शासन निर्णयान्वये दिनांक ३०.०९.२०२४ रोजीच्या आधार वैध पट विचारात घेवून संचमान्यता व समायोजन करण्याची कार्यवाही करण्यासाठी विहित कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तरी, सन २०२४- २०२५ च्या संचमान्यता विहित कालावधीत करण्यासाठी 'सरल' प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक ३०.०९.२०२४ पुर्वी पूर्ण करुन घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावेत. 'सरल' प्रणालीतील विद्याथी प्रमोशन शाळा प्रोफाईलची माहिती, कार्यरत पदांची माहिती, 'सरल' प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती, विद्यार्थ्यांचे आधार वैधता व इतर आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावेत. यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जवाबदार राहतील यांची नोंद घेण्यात यावी.


(शरद गोसावी) 

शिक्षण संचालक,

प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-१.





 संच मान्यता सन 2023-24 बाबत महत्वाची सूचना


सर्व मुख्याध्यापकांना सूचना आहे की, आपल्या शाळेची सन 2023-24 ची संच मान्यता  (दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी कार्यरत असलेले शिक्षक व शिक्षकेतर) Online School Portal मधील संच मान्यता प्रणाली मध्ये Working Teaching Staff व Non Teaching staff सन 2023 - 24 ची माहिती प्राधान्याने व काळजीपूर्वक भरावी.


आपल्या शाळेतील माहिती संच मान्यता प्रणाली मध्ये भरताना संच मान्यता पोर्टल लॉगिन केल्यानंतर डाव्या बाजूला Home, School Information आणि Working Post असे 3 पर्याय दिसतील. यापैकी प्रथम Working Post मध्ये Working Staff Teaching वर Click करावे. त्यानंतर प्रथम Medium Select करून काळजीपूर्वक माहिती भरून प्रथम Update करावी. Update केल्यानंतर तपासून भरलेले सर्व कार्यरत शिक्षक माहिती अचूक असल्याची खात्री करून Finalize करावी. त्यानंतर Working Staff Non-Teaching वर Click करून कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी माहिती भरावी. Update करावी. माहिती अचूक असल्याची खात्री करून नंतरच Finalize करावी.

काही शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत नसल्याने अशा शाळा शिक्षकेतर माहिती भरत नाहीत. परंतु अशा शाळांनी Non Teaching staff मध्ये शून्य टाकून Update व Finalize करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. दोन्ही माहिती म्हणजेच Teaching आणि Non Teaching कार्यरत कर्मचारी माहिती भरल्याशिवाय संच मान्यता Generate होत नाही याची सर्व शाळांनी नोंद घ्यावी.


education.maharashtra.gov.in

Sanch manyata

2023-24

 

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.